..तरीही भारताचे आव्हान शाबूत

मुसळधार पावसामुळे सोमवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचा फक्त १६ षटकांचा खेळ होऊ शकला.

मुसळधार पावसामुळे सोमवारी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याचा फक्त १६ षटकांचा खेळ होऊ शकला. त्यामुळे या सामन्यातून दोन गुण जमा झाल्याने तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेतील भारताचे आव्हान शाबूत राहिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने भारताला प्रथम फलंदाजी दिली आणि मग पाहुण्या संघाची २ बाद ६९ अशी अवस्था केली. शिखर धवन (८) पुन्हा अपयशी ठरला. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर पहिल्या स्लिपमध्ये झेल देऊन तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायुडूला (२३) मिचेल मार्शने बाद केले.
भारताचा साखळीतील अखेरचा सामना शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. पर्थ येथे होणारा हा सामना भारताने बोनस गुणासहित जिंकल्यास धावगती सरस होईल आणि १५ तारखेला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम फेरीसाठी ते पात्र होऊ शकतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India still preserved challenge to remain in tri series