India Squad for Zimbabwe T20I Series: बीसीसीआयने झिम्बाब्वेविरूद्ध टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. श्रेयस अय्यर संघाचं नेतृत्त्व करणार असून तिलक वर्मा उपकर्णधार आहे. दरम्यान या संघातील सर्वात मोठा बदल म्हणजे भारताला टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून देणाऱ्या संजू सॅमसनला भारताच्या टी-२० संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे. तर संघात नव्या चेहऱ्याला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संधी दिली आहे.

भारत सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेसाठी संजू सॅमसन भारताच्या टी-२० संघात आहे. पण आयर्लंड मालिकेतील २ सामने आणि इंग्लंड मालिकेतील दोन सामने मिळून ४ सामन्यांमध्ये अपयशी पडल्यानंतर त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली आहे. दरम्यान आता पुढील टी-२० मालिकेतून तर संजू सॅमसनला संघाबाहेर केलं आहे. तर या मालिकेसाठी हर्षित राणाला विश्रांती देण्यात आली आहे.

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यीय संघ निवडला आहे. तीन सामन्यांची ही टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका हरारेमध्ये खेळवली जाईल. वैभव सूर्यवंशी व्यतिरिक्त, या संघात अभिषेक शर्मा, इशान किशन, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. तर रिंकू सिंहला टी-20 संघात पुन्हा संधी मिळाली आहे. याशिवाय टी-20 मालिकेसाठी संपूर्ण गोलंदाजी विभागाचा चेहरामोहरा बदलला आहे. हर्ष दुबे, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव या नव्या गोलंदाजांचा समावेश केला आहे. प्रभसिमरन सिंगला दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात घेतलं आहे.

झिम्बाब्वेविरूद्ध मालिकेसाठी भारताचा टी-२० संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंह, हर्ष दुबे, वरूण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा, मयंक यादव, प्रभसिमरन सिंग

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड समितीने संघात बदल केला आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीच्या जागी शिवम दुबेचा भारतीय एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवड समितीने संघात बदल केला आहे. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीच्या जागी शिवम दुबेचा भारतीय एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सुधारित भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार आणि शिवम दुबे.