भारताच्या अंकिता भाकट, अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठून जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेतील वैयक्तिक पदकाच्या आशा जिवंत राखल्या आहेत.

कंपाऊंड प्रकारामधील महिला आणि मिश्र गटाची अंतिम फेरी गाठून भारताने दोन पदकांची आधीच निश्चिती केली आहे. वैयक्तिक रीकव्‍‌र्ह गटात २३ वर्षीय अंकिताने कोरियाच्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील कँग शाई-यंगचा ६-४ (२९-२८, २८-२८, २७-२७, २४-२९, २९-२८) अशा फरकाने पराभव केला. अभिषेकने स्लोव्हाकियाच्या जोझेफ बोसॅन्स्कीला १४५-१४२ (२९-२८, ३०-२७, २८-२९, ३०-२९, २८-२९) असे नमवले. ज्योतीने कोरियाच्या चाईवॉन सो हिचा

१४६-१४२ (३०-२९, २९-२९, २८-३०, २९-२९, २६-२९) पराभव केला.

जागतिक तिरंदाजी स्पर्धा