Premium

तिरंदाजीत भारताची तीन पदके निश्चित

महाराष्ट्राचा जगज्जेता ओजस देवताळे आणि अभिषेक वर्मा या भारतीयांमध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारातील पुरुष विभागाची अंतिम लढत रंगणार आहे.

ojas devtale
(ओजस देवताळे)

हांगझो : महाराष्ट्राचा जगज्जेता ओजस देवताळे आणि अभिषेक वर्मा या भारतीयांमध्येच आशियाई क्रीडा स्पर्धेत कम्पाऊंड प्रकारातील पुरुष विभागाची अंतिम लढत रंगणार आहे. त्याच वेळी महिला वैयक्तिक प्रकारात ज्योती सुरेखा वेन्नम अंतिम फेरीत पोहोचली असून, महाराष्ट्राची पहिली महिला जागतिक विजेती आदिती स्वामी कांस्यपदकाची लढत खेळणार आहे. यामुळे भारताची तिरंदाजी प्रकारातील तीन पदके निश्चित झाली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापूर्वी भारताने २०१४ आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तीन पदकांची कमाई केली होती. या कामगिरीशी या वेळी बरोबरी झाली आहे. या प्रकारात या वेळी अजून सात प्रकार शिल्लक असल्यामुळे हांगझो येथे भारतीय तिरंदाजीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवणार यात शंका नाही. या वेळी भारताचे तिरंदाज एकूण १० प्रकारांत पदकांच्या शर्यतीत असून, यातील चार पदके वैयक्तिक प्रकारातील आहेत.

हेही वाचा >>>Asian Games 2023: बजरंग पुनियासाठी पदकाचा मार्ग झाला खडतर, कुस्तीचे सामने ग्रीको-रोमन प्रकाराने होणार सुरू

दोन महिन्यांपूर्वी जागतिक विजेतेपद मिळवल्यानंतर ओजसची पुन्हा एकदा कोरियाच्या सातव्या मानांकित यांग जाएवोनशी उपांत्य फेरीत गाठ पडली होती. मात्र, या वेळीदेखील ओजसने प्रतिस्पर्धी यांगला संधीच दिली नाही. साताऱ्यात सराव करणाऱ्या ओजसने आपल्या १५ संधीपैकी प्रत्येक संधीवर १० गुणांचा वेध घेत कोरियन प्रतिस्पर्धीवर १५०-१४६ असा विजय मिळवला. ओजसची सुवर्ण लढत भारताच्याच अभिषेक वर्माशी होणार आहे. अभिषेकनेदेखील कोरियाच्या अग्रमानांकित जू जाएहूनचा १४७-१४५ असा पराभव केला.

महिलांच्या वैयक्तिक प्रकारात ज्योतीने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावून आपलीच सहकारी साताऱ्याची आदिती स्वामीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. ज्योतीला आता आपल्या पदकाचा रंग सोनेरी करण्याची संधी निर्माण झाली आहे. ज्योतीची गाठ कोरियाच्या सो चाएवोनशी पडणार आहे. त्याच वेळी आदिती इंडोनेशियाच्या रैथ झिलिझाटी फाधलीशी कांस्यपदकाची लढत खेळेल.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India three medals in archery confirmed asian game competition amy

First published on: 04-10-2023 at 00:11 IST
Next Story
World Cup 2023: १२ वर्षांनंतर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा उचलणार वर्ल्डकप ट्रॉफी, ICCच्या ग्लोबल अ‍ॅम्बेसेडरपदी झाली नियुक्ती