भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिली कसोटी गॉल इथे होणार आहे. ही कसोटी भारतीय संघाची ६००वी विक्रमी कसोटी असणार आहे. एवढे कसोटी सामना खेळणारा भारत केवळ तिसरा संघ ठरणार आहे. १०९७ कसोटी सामने खेळणारा इंग्लंडचा संघ या यादीत पहिल्या स्थानी आहे. ८८२ कसोटीसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघाने ५९९ कसोटीत, १८६ विजय मिळवले आहेत. १८८ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. २२४ सामने अर्निणित झाले आहेत. एकमेव सामना टाय झाला आहे. भारतीय संघाची सामने जिंकण्याची टक्केवारी ३१ टक्के आहे.

भारतीय संघाने पहिला कसोटी सामना १९३२ साली क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स इथे खेळला. सी.के.नायडू या सामन्यात भारताचे कर्णधार होते. भारतीय संघाचा या सामन्यात मोठ्या फरकाने पराभव झाला. या कसोटीत मोहम्मद निस्सार यांनी डावात ५ विकेट्स पटकावण्याची किमया केली.

पुढच्याच वर्षी भारतात पहिलीवहिली कसोटी खेळवण्यात आली. मुंबईतल्या बॉम्बे जिमखान्याच्या मैदानावर हा सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या लाला अमरनाथ यांनी ११८ धावांची खेळी केली. भारतासाठी कसोटी प्रकारात शतक झळकावणारे ते पहिले फलंदाज ठरले.

१९५२ मध्ये भारताने कसोटीतला पहिलावहिला विजय मिळवला. चेन्नईत झालेल्या या कसोटीत भारताने इंग्लंडवर विजय मिळवला. विनू मंकड यांनी घेतलेल्या ८ विकेट्सच्या बळावर भारताने इंग्लंडचा डाव २६६ धावांतच गुंडाळला. पंकज रॉय, पॉली उम्रीगर यांच्या शतकी खेळींच्या बळावर भारताने ४५७ धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडचा दुसरा डाव १८३ धावांतच आटोपला. जॅक रॉबर्टसनने सर्वाधिक ६५ धावा केल्या. गुलाम अहमद आणि विनू मंकड यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या. भारतीय संघाने एक डाव आणि ८ धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.

याचवर्षी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नमवत भारतीय संघाने मालिका विजय साजरा केला.

कसोटी प्रकारात भारतासाठी सर्वाधिक धावा (१५९२१) सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. सर्वाधिक विकेट्स(६१९) अनिल कुंबळेच्या नावावर आहेत.

भारतीय संघाची देशनिहाय कामगिरी

देशसामने विजयहारअनिर्णितटाय
भारत २९९१२३६०११५
पाकिस्तान २६१७
श्रीलंका२४
बांगलादेश१०
ऑस्ट्रेलिया५७१०३४१४
न्यूझीलंड २५१०१०
वेस्ट इंडिज ५३१०१६२७
दक्षिण आफ्रिका २५ १३
झिम्बाब्वे