अल खोर (कतार) : पहिल्या दोनही साखळी सामन्यांत पराभव पत्करावा लागलेल्या भारतीय संघाला ‘एएफसी’ आशिया चषक फुटबॉल स्पर्धेतील आपले आव्हान शाबूत राखायचे झाल्यास आज, मंगळवारी होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या साखळी सामन्यात सीरियाविरुद्ध विजय अनिवार्य आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय संघाची आगेकूच निश्चित नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> Glenn Maxwell : पब पार्टीत मॅक्सवेलची तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सुरू केला तपास

भारतीय फुटबॉल संघ क्रमवारीत आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकांवरील संघांविरुद्ध खेळताना चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो हे वारंवार दिसून आले आहे. या स्पर्धेतही भारतीय संघाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. भारतीय संघ अजूनही आपल्या पहिल्या विजयाच्या आणि गोलच्या शोधात आहे. भारताला पहिल्या दोन साखळी सामन्यांत अनुक्रमे ऑस्ट्रेलिया (०-२) आणि उझबेकिस्तान (०-३) या संघांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ब-गटात भारतीय संघ तळाला असून अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाचे ६, उझबेकिस्तानचे ४, तर सीरियाच्या खात्यावर एक गुण आहे.

हेही वाचा >>> ICC T20 Team : आयसीसीचा २०२३ मधील सर्वोत्कृष्ट टी-२० संघ जाहीर, सूर्यकुमार यादव कर्णधार तर ‘या’ खेळाडूंना मिळाले स्थान

जागतिक क्रमवारीत भारत सध्या १०२व्या, तर सीरिया ९१व्या स्थानावर आहे. मात्र, भारतीय संघाने यापूर्वी सीरियाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. भारताने २००७, २००९ आणि २०१२च्या नेहरु चषकात सीरियावर विजय नोंदवले होते. उभय संघांतील अखेरचा सामना २०१९मध्ये झाला होता. या सामन्यात भारताने सीरियाला १-१ असे बरोबरीत रोखले होते. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही भारतीय संघ आत्मविश्वासानिशी मैदानात उतरेल. भारताला विजय मिळवायचा झाल्यास कर्णधार आणि तारांकित आघाडीपटू सुनील छेत्रीला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

वेळ : सायं. ५ वा. ’ थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा, स्पोर्ट्स १८-३ 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to play match against syria in asia cup football zws
First published on: 23-01-2024 at 01:30 IST