England T20I Sqaud For India vs England T20I Series: भारतीय संघ टी-२० आणि वनडे मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंडविरूद्ध २ टी-२ सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १ जुलैला खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी युवा खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे.

भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठीही इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी हॅरी ब्रूककडे सोपवण्यात आली आहे. यासह काही खेळाडूंना पुरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. साकीब महमूद, सनी बेकर आणि जॉर्डन कॉक्स हे खेळाडू या मालिकेत पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघातील प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे. जोफ्रा आर्चर, आदील रशिद, जोफ्रा आर्चर या खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलं आहे.

भारत- इंग्लंड टी-२० मालिकेचं वेळापत्रक

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १ जुलैला चेस्टर ले स्ट्रीटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर दुसरा टी-२० सामना जुलैला मॅन्चेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील तिसरा सामना ७ जुलैला ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील चौथा सामना ९ जुलैला ब्रिस्टलमध्ये खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना ११ जुलैला साऊथॅम्प्टनमध्ये खेळवला जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेासामने येणार आहेत. या दोन्ही मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ:

हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, साकिब महमूद, आदील रशिद, फिल सॉल्ट, जोश टंग, ल्यूक वुड