भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला आहे. त्याठिकाणी संघाला आशिया चषकापूर्वी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच संघात समावेश झालेला वॉशिंग्टन सुंदर जखमी झाला आहे. त्यामुळे तो मालिकेत खेळू शकणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुंदरच्या जागी एका इंजिनिअरचा संघात समावेश केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयने अष्टपैलू शाहबाज अहमदचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात समावेश केला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणाऱ्या शाहबाजला पहिल्यांदाच भारतीय संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे सध्या क्रिकेटपटू असलेला शाहबाज अभियंता आहे. वडिलांच्या हट्टापायी त्याने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळवलेली आहे.

शाहबाज २०२० पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील आणि आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. २७ वर्षीय शाहबाज अहमदने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४७.२८ सरासरीने धावा केल्या आहेत. तर, त्याची गोलंदाजी सरासरी ३९.२० इतकी आहे.

हेही वाचा – “….अन्यथा एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट होईल लुप्त”! कपिल देव यांचे वक्तव्य चर्चेत

शाहबाजने आयपीएलमध्ये २९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १८.६ च्या सरासरीने आणि ११८.७२च्या स्ट्राईक रेटने २७९ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने १३ बळी मिळवलेले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of zimbabwe engineer turned cricketer shahbaz ahmed replaces injured washington sundar vkk
First published on: 16-08-2022 at 18:51 IST