India U19 Squad Announcement: भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारताचा १९-वर्षांखालील संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा १९-वर्षांखालील संघ तीन एकदिवसीय सामने आणि दोन बहु-दिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय १९-वर्षांखालील संघांची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय १९-वर्षांखालील संघ १८ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या १९-वर्षांखालील संघाविरुद्ध तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारताचा दौरा करेल. या युवा एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती, तर आता भारतीय १९-वर्षांखालील संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. यात एक विशेष बाब म्हणजे, अनेक वर्षांनंतर सेहवाग-द्रविड ही जोडी पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताच्या या अंडर-१९ संघात राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागच्या मुलांना संधी मिळाली आहे. लक्ष्य रायचंदानी यांची भारतीय १९-वर्षांखालील एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी, तर यशवर्धन चौहान याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संघात दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा ‘आर्यवीर सेहवाग’ आणि राहुल द्रविड यांचा मुलगा ‘अन्वय द्रविड’ यांची निवड करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, अनेक वर्षांनंतर चाहत्यांना पुन्हा एकदा मैदानावर ‘सेहवाग-द्रविड’ ही जोडी पाहायला मिळू शकते.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ

लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल, आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड, व्ही. यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उल्वा, चिगुरुपती व्यंकटा आणि काव्य पटेल.

ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ

केसी बार्टन, हेडन बारबुलोविक, एली ब्रेन, विल बायरोम, ब्लेक कॅटेल, जॅक जोसनेक, स्पेन्सर ग्रीन, कॉनर ग्रेगरी, चार्ली हेंडरसन, जेड हॉलिक, मॅथ्यू लफ, नील पटेल, जेकब पीट्झ, पॅट्रिक सुलिव्हन, थियो सिंगोस, थॉमस व्हॅसिओ.

भारत अंडर-१९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-१९ वनडे मालिकेचं वेळापत्रक

पहिला एकदिवसीय: १८ सप्टेंबर २०२६, सकाळी ९:३०
दुसरी वनडे: २१ सप्टेंबर २०२६, सकाळी ९:३० (IST)
तिसरी एकदिवसीय: २३ सप्टेंबर २०२६, सकाळी ९.३०