India U19 vs Zimbabwe U19: आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. स्पर्धेतील सहावा सामना भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५२ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेचा डाव अवघ्या १४८ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना २०४ धावांनी आपल्या नावावर केला आहे.
IND vs ZIM Live: गोलंदाजीतही आयुष म्हात्रेची हवा! एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स
आयुष म्हात्रे फलंदाजीत हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. पण गोलंदाजीत त्याने एकाच षटकात २ विकेट्स मिळवून दिल्या आहेत.
IND vs ZIM Live: झिम्बाब्वेचा निम्मा संघ तंबूत! लीरॉय चिवाउलाच्या दमदार खेळीचा शेवट
झिम्बाब्वेचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. संघातील प्रमुख फलंदाज लीरॉय चिवाउला ६२ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs ZIM Live: अखेर विकेट मिळाली! क्यान ब्लायनॉट परतला माघारी
क्यान ब्लायनॉटने झिम्बाब्वेचा डाव सांभाळला होता. पण तो ३७ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs ZIM Live: झिम्बाब्वेला दुसरा धक्का!
झिम्बाब्वेला दुसरा मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज ध्रुव पटेल बाद होऊन माघारी परतला आहे.
IND vs ZIM Live: टीम इंडियाची दमदार सुरूवात! पहिल्याच षटकात झिम्बाब्वेचा सलामीवीर परतला माघारी
झिम्बाब्वेला पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर मोठा धक्का बसला आहे.
IND vs ZIM Live: विहान मल्होत्राचं दमदार शतक! वैभव सूर्यवंशीचं वेगवान अर्धशतक; भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
भारतीय संघाने झिम्बाब्वे संघासमोर विजयासाठी ३५३ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विहान मल्होत्राने दमदार शतकी खेळी केली. तर वैभव सूर्यवंशी आणि अभिज्ञान कुंडूने अर्धशतकी खेळी केली.
IND vs ZIM Live: विहान मल्होत्राचं दमदार शतक! टीम इंडियाची धावसंख्या ३०० पार
या सामन्यात फलंदाजी करताना विहान मल्होत्राने १०४ चेंडूत दमदार शतकी खेळी केली आहे. दरम्यान भारतीय संघाने ३३५ धावा केल्या आहेत.
IND vs ZIM Live: टीम इंडिया मजबूत स्थितीत
भारतीय संघाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. पण अभिज्ञान कुंडू आणि विहान मल्होत्राने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला आहे. दोघांनी शतकी भागीदारी केली. यासह भारताने २०० हून अधिक धावा केल्या आहेत.
IND vs ZIM Live: भारतीय संघाला एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के
भारतीय संघाला एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के बसले. आधी आयुष म्हात्रे आणि त्यानंतर वैभव सूर्यवंशी देखील बाद होऊन माघारी परतला आहे.
IND vs ZIM Live: वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली! २०० हून अधिकच्या स्ट्राइक रेटने झळकावलं अर्धशतक
या सामन्यात फलंदाजी करताना भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या २४ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.
