India Under 19 vs Afghanistan Under 19 Highlights: आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा सामना भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानने ३१० धावांचा डोंगर उभारला. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना २ फलंदाजांनी शतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून आरोन जॉर्जने दमदार शतकी खेळी केली. तर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेने अर्धशतक झळकावलं. या दमदार खेळीच्या बळावर भारतीय संघाने दिलेलं आव्हान ५३ चेंडू शिल्लक ठेवून आणि ७ गडी राखून पूर्ण केलं. यासह स्पर्धेतील अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: आरोन जॉर्जचं दमदार शतक! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
सलामीला आलेल्या आरोन जॉर्जने ९५ चेंडूत शतक झळकावलं आहे. भारतीय संघाला विजयासाठी ३१ धावांची गरज आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का! अर्धशतक झळकावून आयुष म्हात्रे परतला माघारी
दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर आयुष म्हात्रे ६२ धावा करून माघारी परतला आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: आरोननंतर आयुष म्हात्रेचंही दमदार अर्धशतक! भारतीय संघ मजबूत स्थितीत
आरोन नंतर आयुष म्हात्रेनेही दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. भारतीय संघाला विजयासाठी १२० धावा करायच्या आहेत.
IND U-19 vs AFG U-19 Live: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का! वैभव सूर्यवंशी परतला माघारी
वैभव सूर्यवंशीने डावाची सुरूवात करताना दमदार सुरूवात करून दिली. पण तो ६८ धावा करून माघारी परतला आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: वैभव सूर्यवंशीचं वादळ! अवघ्या २४ चेंडूत झळकावलं अर्धशतक
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून वैभव सूर्यवंशीने अवघ्या २४ चेंडूत दमदार अर्धशतकी खेळी केली आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: टीम इंडियाची दमदार सुरूवात! वैभव – आरोनची तुफान फटकेबाजी
या सामन्यात ३११ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून आरोन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशीने दमदार सुरूवात करून दिली आहे. दोघांनी ४ षटकात ३१ धावा केल्या आहेत.
IND U-19 vs AFG U-19 Live: अफगाणिस्तानच्या २ फलंदाजांनी झळकावलं शतक! टीम इंडियासमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
अफगाणिस्तानकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना फैजल शिनोजादाने ११० आणि उजैरुल्लाहने नाबाद १०१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ५० षटकांअखेर ४ गडी बाद ३१० धावा केल्या आहेत.
IND U-19 vs AFG U-19 Live: अफगाणिस्तानला तिसरा मोठा धक्का! शतकवीर फैजल शिनोजादा परतला माघारी
अफगाणिस्तानला तिसरा मोठा धक्का बसला आहे. शतकवीर फैजल शिनोजादा माघारी परतला आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: फैजल शिनोजादाचं दमदार शतक! अफगाणिस्तान मजबूत स्थितीत
अफगाणिस्तानचा स्टार फलंदाज फैजल शिनोजादाने ८६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: अफगाणिस्तान मजबूत स्थितीत! संघाच्या २०० धावा पूर्ण
अफगाणिस्तानचा संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. अफगाणिस्तानने ४१ व्या षटकात २०० धावांचा पल्ला गाठला आहे.
IND U-19 vs AFG U-19 Live: अफगाणिस्तानला दुसरा धक्का! सलामी जोडी परतली माघारी
अफगाणिस्तानला दुसरा धक्का बसला आहे. ओस्मान सदत ३९ धावा करून माघारी परतला आहे.
IND 19 vs AFG U19: अफगाणिस्तानला पहिला धक्का!
अफगाणिस्तानला पहिला मोठा धक्का बसला आहे. खलिद अहमदजाई बाद होऊन माघारी परतला आहे.
IND U19 vs AFG U19: अफगाणिस्तानच्या फलंदाजांची सावध सुरूवात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी ६ षटकात २४ धावा केल्या आहेत.

