India vs Afghanistan 2nd T20I Highlights: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानने २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली आणि दिलेलं आव्हान १४.५ षटकांत पूर्ण करत ७ गडी राखून विजय मिळवला. यासह भारतीय संघाने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

Live Updates
22:20 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर! विजयासाठी अवघ्या इतक्या धावांची गरज

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी आता केवळ ८ धावांची गरज आहे.

22:06 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: भारतीय संघाला तिसरा धक्का

भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या ११ धावांवर माघारी परतला आहे.

21:50 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: राशिद खानने एकाच षटकात दिले २ धक्के! अभिषेकनंतर संजू परतला माघारी

भारतीय संघाला एकाच षटकात २ मोठे धक्के बसले आहेत. अभिषेक शर्मा पाठोपाठ संजू सॅमसन ५७ धावांवर माघारी परतला आहे.

21:46 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: भारतीय संघाला पहिला मोठा धक्का! अभिषेक शर्मा परतला माघारी

भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. अर्धशतकाच्या जवळ असताना अभिषेक शर्मा बाद होऊन माघारी परतला आहे.

21:42 (IST) 15 Sep 2026

IND vs ZIM Live: अभिषेक - संजूची पावरप्लेमध्ये वादळी सुरूवात!

भारतीय फलंदाजांनी पावरप्लेमध्येच वादळी सुरूवात केली आहे. संजू आणि अभिषेकने मिळून पावरप्लेमध्ये ८२ धावा जोडल्या आहेत.

21:06 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर विजयासाठी ठेवलं इतक्या धावांचं आव्हान

अफगाणिस्तानने पहिल्या डावात फलंदाजी करताना १५९ धावा केल्या आहेत. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १६० धावा करायच्या आहेत.

21:03 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: मोहम्मद नबीनंतर राशिद खान परतला माघारी! अक्षर पटेलने घेतला भन्नाट कॅच

अफगाणिस्तानने दमदार सुरूवात केली होती. त्यानंतर मधल्या षटकांमध्ये विकेट्स गेल्याने धावांची गती कमी झाली होती. शेवटी मोहम्मद नबी आणि राशिद खानने मोठे फटके खेळून संघाची १५० धावांवर पोहोचवली. पण आता दोघेही बाद होऊन माघारी परतले आहेत.

20:50 (IST) 15 Sep 2026

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'हा' रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात जसप्रीत बुमराहने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. ...सविस्तर बातमी
20:37 (IST) 15 Sep 2026

IND vs ZIM Live: अफगाणिस्तानचा सहावा फलंदाज तंबूत

अफगाणिस्तानला चांगली सुरूवात मिळाली होती. पण एकापाठोपाठ एक विकेट्स गेल्याने अफगाणिस्तानचा संघ बॅकफुटवर आहे. डार्विश २६ धावा करून माघारी परतला आहे.

20:33 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत

अफगाणिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. अजमत ओमरजई ११ धावा करत माघारी परतला आहे.

20:20 (IST) 15 Sep 2026

IND vs ZIM Live: नितीश रेड्डीचा रॉकेट बॉल आणि संजू सॅमसनचा भन्नाट कॅच; अफगाणिस्तानला चौथा धक्का

नितीश रेड्डीने अफगाणिस्तानला चौथा धक्का दिला आहे. संजू सॅमसनने घेतलेल्या झेलमुळे गुलबदीन नदीम अवघ्या १० धावा करून माघारी परतला आहे.

20:14 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: अफगाणिस्तानला तिसरा धक्का

अफगाणिस्तानचे तिसरा धक्का बसला असून टॉप ३ फलंदाज तंबूत परतले आहेत. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर सेदिक अटल १२ धावा करून माघारी परतला आहे.

20:05 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: अफगाणिस्तानला दुसरा मोठा धक्का! इब्राहिम जादरान परतला माघारी

अफगाणिस्तानला नवव्या षटकात दुसरा मोठा धक्का बसला आहे. इब्राहिम जादरान ३७ धावांवर माघारी परतला आहे.

19:58 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG: पावरप्लेमध्ये अफगाणिस्तानच्या फलंदाजांची तुफान फटकेबाजी

दुसऱ्या षटकात अफगाणिस्तानला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर इब्राहिम जादरानने २९ धावा चोपून अफगाणिस्तानची धावसंख्या ४१ धावांवर पोहोचवली आहे.

19:39 (IST) 15 Sep 2026

IND vs ZIM Live:दुसऱ्याच षटकात अफगाणिस्तानला मोठा धक्का! रहमानुल्लाह गुरबाज शून्यावर परतला माघारी

अफगाणिस्तानला दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने मोठा धक्का दिला आहे. रहमानुल्लाह गुरबाज शून्यावर माघारी परतला आहे.

19:09 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: प्लेईंग ११

भारत (प्लेइंग ११): संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, रवि बिश्नोई

अफगाणिस्तान (प्लेइंग ११): रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, गुलबदिन नायब, दरविश रसुली, अझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी

19:07 (IST) 15 Sep 2026

IND vs AFG Live: नाणेफेक

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यातही वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.

India vs Afghanistan 2nd T20I Highlights: भारत आणि अफगाणिस्तान सामन्याचे हायलाईट्स