India vs Afghanistan Test: भारतात सध्या आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध एकमात्र कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण मुख्य बाब म्हणजे हा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग नसणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकूनही भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत गुण दिले जाणार नाही. दरम्यान या मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल यांना विश्रांती दिली जाऊ शकते.
हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा भाग नसणार आहे. त्यामुळे सामना जिंकूनही गुण मिळणार नाहीत. त्यामुळे भारताचा नंबर १ गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संघाचा कर्णधार शुबमन गिलला या कसोटीत विश्रांती दिली जाऊ शकते. दोघांना विश्रांती देण्याचं एकमेव कारण म्हणजे, दोघेही २ महिने आयपीएल स्पर्धा खेळणार आहेत. त्यामुळे दोघेही थकलेले असतील. हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला काही महत्वाच्या वनडे मालिका देखील खेळायच्या आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारा कसोटी सामना ६ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी कोणाला संधी मिळणार, हे कोणता संघ प्लेऑफ फेरी गाठणार यावर अवलंबून असेल. जर मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला नाही, तर त्याला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळेल. त्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान दिले जाऊ शकते. पण जर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, तर बुमराहला विश्रांती दिली जाऊ शकते. बुमराहला विश्रांती दिल्यानंतर एखाद्या युवा खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.
आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर लगेच एका आठवड्यानंतर हा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे निवड समिती आणि संघ व्यवस्थापक खेळाडूंवर कुठलाही ताण येणार नाही, याची काळजी घेतील. हा कसोटी सामना झाल्यानंतर, तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये मर्यादीत षटकांच्या मालिकेचा थरार देखील रंगणार आहे. हा कसोटी सामना जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुण मिळणार नाहीत. त्यामुळे खेळाडूंचं वर्कलोड मॅनेज करण्यासाठी निवड समिती प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊ शकते.
