scorecardresearch

Premium

IND vs AUS 2nd ODI: दुखापतीनंतर श्रेयस अय्यरचे शानदार कमबॅक! टीका करणाऱ्यांना दिलं चोख प्रत्युत्तर, शुबमन गिलही शतकवीर

IND vs AUS 2nd ODI Match Updates: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. त्याचबरोबर दोघांनी भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

IND vs AUS 2nd ODI Match Updates
शुबमन गिल आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

India vs Australia 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळला जात आहे. हा सामना जिंकून संघ भारत मालिका जिंकू इच्छित आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारुन देताना आपापली शतकं झळकावली.

प्रथम श्रेयस अय्यरने झळकावले शतक –

भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही फॉर्ममध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ८६ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे आणि एकूण चौथे शतक होते. वनडे व्यतिरिक्त श्रेयसने कसोटीतही शतक झळकावले. तो शतकानंतर १०५ धावा काढून बाद झाला. त्याने ९० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.

IND vs AUS: Babar actually thanked Dravid for giving Shubman a break Know the truth about viral posts
Babar Azam: बाबर आझमने शुबमन गिलला विश्रांती दिल्याने राहुल द्रविडचे मानले आभार, काय आहे सत्य? जाणून घ्या
After the series win against Australia K.L. Rahul's big statement Said Choosing playing XI will be headache for Rohit-Dravid
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका विजयानंतर के.एल. राहुलचे सूचक विधान; म्हणाला, “प्लेईंग-११ निवडणे रोहित-द्रविडसाठी…”
IND vs AUS 2nd ODI Match Updates
IND vs AUS 2nd ODI: हिटमॅनला मागे टाकत शुबमन गिल बनला २०२३ चा सिक्सर किंग, जाणून घ्या किती मारलेत षटकार?
Ishan challenged all teams in World Cup Said If anyone scores two runs against me I will run out
Ishan Kishan: इशानने वर्ल्डकपमधील सर्व संघांना दिले आव्हान; म्हणाला, “माझ्याविरुद्ध कोणी दोन धावा काढल्या तर मी…”

दुसऱ्या विकेटसाठी २००धावांची भागीदारी –

मार्चमध्ये पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस क्रिकेटपासून दूर होता. यानंतर त्याने नुकतेच आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन केले, मात्र दोन सामने खेळल्यानंतर त्याला पुन्हा दुखापत झाली. मात्र, आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात आणि या मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला विशेष काही करता आले नाही. श्रेयसने शुबमनसोबत दुसऱ्या विकेटसाठी २००धावांची भागीदारी केली.

शुबमन गिलनेही झळकावले शतक –

श्रेयस अय्यरनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शुबमन गिलची जादू पाहायला मिळाली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक आणि एकूण नववे शतक ९२ चेंडूत झळकावले. वनडेतील सहा शतकांव्यतिरिक्त त्याने कसोटीत दोन शतके आणि टी-२० मध्ये एक शतक झळकावले आहे. ३३ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २३० धावा आहे. शुबमन ९२ चेंडूत १०० धावा तर केएल राहुल ९ धावांवर फलंदाजी करत आहे. तत्पूर्वी, श्रेयस अय्यर ९० चेंडूत १०५ धावा करून बाद झाला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs australia 2nd odi match updates shreyas iyer and shubman gill scored centuries vbm

First published on: 24-09-2023 at 16:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×