india vs australia 2nd t20I india beat australia by six wickets zws 70 | Loksatta

भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका  : भारताची मालिकेत बरोबरी

ऑस्ट्रेलियाने दिलेले ९१ धावांचे लक्ष्य भारताने ७.२ षटकांत चार गडय़ांच्या मोबदल्यात गाठले.

भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका  : भारताची मालिकेत बरोबरी
कर्णधार रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात; रोहित चमकला

नागपूर : कर्णधार रोहित शर्माच्या (२० चेंडूंत नाबाद ४६ धावा) आक्रमक खेळीच्या बळावर भारताने शुक्रवारी दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून मात केली. नागपूर येथे झालेल्या या सामन्यातील विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.   

पाऊस आणि त्यानंतर मैदानातील काही भाग ओला असल्याने सामना सुरू होण्यासाठी विलंब झाला. अखेर हा सामना आठ-आठ षटकांचा करण्यात आला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५ बाद ९० अशी धावसंख्या उभारली. कर्णधार आरोन फिंच (१५ चेंडूंत ३१) आणि मॅथ्यू वेड (२० चेंडूंत नाबाद ४३) यांनी फटकेबाजी केली.

ऑस्ट्रेलियाने दिलेले ९१ धावांचे लक्ष्य भारताने ७.२ षटकांत चार गडय़ांच्या मोबदल्यात गाठले. रोहितने नाबाद ४६ धावांच्या खेळीत चार चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. अ‍ॅडम झ्ॉम्पाच्या फिरकीपुढे भारताची मधली फळी ढेपाळली. मात्र, अखेरच्या षटकात नऊ धावांची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकने एक षटकार आणि एक चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : ८ षटकांत ५ बाद ९० (मॅथ्यू वेड नाबाद ४३, आरोन फिंच ३१; अक्षर पटेल २/१३) पराभूत वि. भारत : ७.२ षटकांत ४ बाद ९२ (रोहित शर्मा नाबाद ४६; अ‍ॅडम झॅम्पा ३/१६)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : झुलन निरोपासाठी सज्ज! ; आज इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात निर्भेळ यशाची भेट देण्याचे भारताचे लक्ष्य

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2022: ब्राझीलला हरवून कॅमेरूनने रचला इतिहास, तर स्वित्झर्लंड प्री-क्वार्टर फायनलमध्ये दाखल
Video: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स
IPL 2023: ‘टॅक्टिकल सबस्टिट्युशन म्हणजे काय रे भाऊ?’ आयपीएलच्या १५व्या हंगामापासून सुरु होणार नवीन नियम
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा उत्तराधिकारी कोण असू शकतो? यावर सीएसकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा
समलैंगिक साथीदारासोबत अ‍ॅथलीट द्युती चंदचा विवाह? सोशल मीडियावर ‘तो’ फोटो व्हायरल!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मेट्रोचा पहिला टप्पा मार्चअखेरपर्यंत पूर्ण; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
Car Tips: अपघातानंतर वाहनाला आग लागल्यास ‘या’ गोष्टींमुळे वाचतील तुमचे प्राण; जाणून घ्या प्रवास करताना काय काळजी घ्यावी
रशियातही ‘पुष्पा’ फिव्हर, ‘सामी सामी’ गाण्यावर रशियन महिला थिरकल्या, चिमुकल्यांचाही भन्नाट डान्स, Video होतोय तुफान Viral
“असाच एकमेकात जीव….” राणादा-पाठकबाईंना शुभेच्छा देणाऱ्या मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
फ्रिजमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना कोणती काळजी घ्यावी? ‘या’ उपयुक्त टिप्स नेहमी लक्षात ठेवा