वृत्तसंस्था, अॅडलेड

भारतासाठी नेहमीच डोकेदुखी ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने साकारलेले आक्रमक शतक आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आपला दबदबा कायम राखला. अॅडलेड येथे प्रकाशझोतात (डे-नाइट) गुलाबी चेंडूसह सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावानंतर भारतीय संघ १५७ धावांनी पिछाडीवर होता. त्यानंतर दुसऱ्या डावातही भारताची पडझड झाली.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन
Will Pakistan lose hosting rights of Champions Trophy cricket tournament
चँपियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान गमावणार? भारताच्या दबावाचा किती परिणाम?
Image Of Zeenat Tigress
‘झीनत’मुळे का सुरू आहे पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये वाद? एका वाघीणीमुळे दोन राज्यांमध्ये राजकीय तणाव!
Yuvraj Singh expresses his feelings on India defeat against New Zealand sports news
न्यूझीलंडविरुद्धचा पराभव सर्वात निराशाजनक; माजी अष्टपैलू युवराज सिंगची भावना
Jayant Patil regret reaction on very small size of opposition
जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे विरोधकांचा आकार एकदम छोटा, जयंत पाटलांकडून खंत

दुसऱ्या दिवशी १ बाद ८६ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावांची मजल मारली. यात सर्वाधिक वाटा हेडचा होता. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या डावखुऱ्या हेडला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा लाभला आणि त्यानेही चाहत्यांना निराश केले नाही. त्याने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना १४१ चेंडूंत १७ चौकार आणि ४ षटकारांसह १४० धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला दीडशतकी आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांनी गुलाबी चेंडूचा पुन्हा अचूक वापर करताना भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकले. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबविण्यात आला, त्या वेळी दुसऱ्या डावात भारताची ५ बाद १२८ अशी स्थिती होती. भारतीय संघ अजून २९ धावांनी मागे आहे.

हेही वाचा >>>IND vs AUS: मोहम्मद शमीबाबत दुसऱ्या कसोटीदरम्यान मोठी अपडेट, टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल (३१ चेंडूंत २४) आणि शुभमन गिल (३० चेंडूंत २८) यांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र, त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात ते कमी पडले. केएल राहुलने (१० चेंडूंत ७) निराशा केली, तर राहुलला सलामीला खेळता यावे यासाठी मधल्या फळीत खेळणाऱ्या कर्णधार रोहित शर्मालाही (१५ चेंडूंत ६) फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. या दोघांना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेच माघारी धाडले.

पहिल्या कसोटीतील शतकवीर विराट कोहली (२१ चेंडूंत ११) या वेळी फारशी चमक दाखवू शकला नाही. ऋषभ पंतने (२५ चेंडूंत नाबाद २८) काही थक्क करणारे फटके मारून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची लय बिघडविण्याचा प्रयत्न केला. यात त्याला यशही मिळाले. दिवसअखेर त्याच्यासह नितीश कुमार रेड्डी (१४ चेंडूंत नाबाद १५) खेळपट्टीवर होता.

हेही वाचा >>>VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे

संक्षिप्त धावफलक

● भारत (दुसरा डाव) : २४ षटकांत ५ बाद १२८ (ऋषभ पंत नाबाद २८, शुभमन गिल २८, यशस्वी जैस्वाल २४, पॅट कमिन्स २/३३, स्कॉट बोलँड २/३९, मिचेल स्टार्क १/४९)

● भारत (पहिला डाव) : १८०

● ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ८७.३ षटकांत सर्वबाद ३३७ (ट्रॅव्हिस हेड १४०, मार्नस लबूशेन ६४, नेथन मॅकस्वीनी ३९; जसप्रीत बुमरा ४/६१, मोहम्मद सिराज ४/९८)

Story img Loader