पहिल्या कसोटीत खराब कामगिरीनंतरही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचा पृथ्वीला पाठींबा, म्हणाला…

मेलबर्नची खेळपट्टी पृथ्वीला साथ देईल !

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीत भारताचा पराभव झाल्यानंतर सर्वस्तरातून संघाच्या कामगिरीवर टीका होते आहे. पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचा डाव दुसऱ्या ३६ धावांत आटोपला. विशेषकरुन पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉचं अपयश हा चर्चेचा मुद्दा बनला. पहिल्या डावात शून्य तर दुसऱ्या डावात ४ धावा काढून पृथ्वी माघारी परतला. या कामगिरीनंतर दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शॉला संघात स्थान मिळणार नाही असे संकेत मिळत आहेत.

पृथ्वी शॉच्या या खराब कामगिरीनंतरही ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसीने मेलबर्न कसोटीसाठी पृथ्वी शॉला पाठींबा दिला आहे. “माझ्यामते पृथ्वी शॉवर थोडा विश्वास दाखवायला हवा. ही गोष्ट खरी आहे की पहिल्या कसोटीत त्याला धावा करता आल्या नाहीत. पण पहिल्या कसोटीची खेळपट्टी ही फलंदाजी करण्यासाठी थोडी अवघड होती. जो बर्न्सची स्थानिक क्रिकेटमधली कामगिरीही खराब आहे. तरीही निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला, मात्र त्यानंतर त्याला आत्मविश्वास मिळाला आणि त्याने नाबाद अर्धशतक झळकावलं.” हसी ESPNCricinfo शी बोलत होता.

पृथ्वी शॉला भारतीय निवड समितीने थोडा आत्मविश्वास देण्याची गरज आहे. तो गुणवान खेळाडू आहे. मेलबर्नची खेळपट्टी त्याला साजेशी आहे. मेलबर्नमध्ये चेंडू फारसा उसळी घेत नाही, हसीने पृथ्वीला पाठींबा दिला. २६ डिसेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे.

अवश्य वाचा – पृथ्वी शॉच्या जागी लोकेश राहुलला संधी द्या, सुनिल गावसकर यांची मागणी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs australia prithvi shaw should be backed mcg pitch will suit him a lot more says michael hussey psd

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या