सेहवाग चौथ्या कसोटीत खेळण्यास तयार; BCCI ला दिली ऑफर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नऊ खेळाडू दुखापतग्रस्त

विरेंद्र सेहवाग

बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा आणि निर्णायक कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकून चषकावर कब्जा करण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरील. मात्र, भारतीय संघ दुखापतीमुळे बेजार झाला आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.   भारतीय संघातील आतापर्यंत ९ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचं समोर आलं. अशामध्ये संघ व्यवस्थापनाला भारतीय संघ निवडताना अडचण होत आहे. भारतीय संघाचा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवागनं याच संधीचा फायदा घेत एक मजेशीर ट्विट केलं आहे. यामध्ये त्यानं चौथ्या कसोटीत खेळण्याची तयारी दर्शवत बीसीसीआयला तशी ऑफर दिलं आहे.

सेहवागचं हे ट्विट सध्या तुफान व्हायरल होतं आहे. कारण, हनुमा विहारीचा पर्याय मानला जात असलेला मयांक अगरवालही नेटमध्ये सराव करत असताना जखमी झाला आहे.  त्याशिवाय सिडनी कसोटीत साडेतीन तास झुंज देणाऱ्या अश्विनलाही पाठदुखीचा त्रास वाढला आहे. राहुल, उमेश यादव आणि मोहम्मद शमी याआधीच दुखापग्रस्त झाल्यामुळे मालिकेला मुकले आहेत. या परिस्थितीवर सेहवागनं मजेशीर ट्विट केलं आहे.

काय म्हणाला सेहवाग –

सेहवागनं दुखापतग्रस्त खेळाडूंचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच फोटोवरती मजेशीर असं कॅप्शन लिहीत ट्विट केलं आहे. ‘इतके खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. जर ११ जणांची भरती होत नसेल तर ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. बीसीसीआयनं विलगीकरणाचं पाहवं.’ सेगावगचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे.

१५ जानेवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हा कसोटी सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानं दोन्ही संघ मैदानात उतरतील.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापग्रस्त झालेले खेळाडू –
मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयांक अगरवाल आणि आर. अश्विन

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs australia virendra sehwag big statement over injuring team player india tour australia nck

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या