भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला. या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी होणार आहे.

१४९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या. दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईमदेखील मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. पण शिखर धवनने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले. पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर सौम्या सरकार आणि मुश्फिकुर रहीम यांनी बांगलादेशला सावरले.

सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकार त्रिफळाचीत झाला. १ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी खलीलने त्याचा त्रिफळा उडवला. त्याने मुश्फिकुरने सगळा भार आपल्या खांद्यावर घेत तडाखेबाज खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ८ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ६० धावा केल्या. मुश्फिकुर ३६ चेंडूत ३८ धावांवर असताना क्रुणाल पांड्याने त्याचा झेल सोडला होता. त्याचा फटका भारताला बसला. भारताकडून चहर, चहल आणि खलीलने १-१ बळी टिपला.

त्याआधी, भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत रोहितने दोन चौकार लगावले. पण शेवटच्या चेंडूवर मात्र तो पायचीत झाला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर मैदानात आलेला लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतला. चेंडूचा अंदाज न आल्याने त्याने मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या.

IND vs BAN : ‘हिटमॅन’ने केला धमाकेदार पराक्रम; धोनीला टाकले मागे

सुरुवातीपासूनच दमदार फटकेबाजी करणारा श्रेयस अय्यर मोठा फटका खेळताना बाद झाला. अमिनुल इस्लामच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याचा सीमारेषेवर झेल टिपण्यात आला. त्याने १ चौकार आणि २ षटकारांसह १३ चेंडूत २२ धावा केल्या. शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यात चांगली भागीदारी होत असतानाच मैदानात त्या दोघांमध्ये धाव घेण्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे शिखर धवनला धावबाद व्हावे लागले. धवनने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या.

Video : धवन-पंतमध्ये धाव घेताना गोंधळ अन्… ; चुक कोणाची तुम्हीच ठरवा

भारतीय संघातून आपला पदार्पणाचा टी २० सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबेही केवळ एक धाव करून बाद झाला. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीचा अंदाज न आल्याने तो बाद झाला. दिल्लीकर ऋषभ पंत घरच्या मैदानावर फारशी कमाल करू शकला नाही. २६ चेंडूत ३ चौकार लगावत त्याने २७ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या टप्प्यात मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. भारतीय फलंदाजांना आपल्या गोलंदाजीत जखडून ठेवलेल्या बांगलादेशला शेवटच्या टप्प्यात गोलंदाजीत थोडासा मार खावा लागला. क्रुणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी शेवटच्या टप्प्यात केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. पांड्या ८ चेंडूत १५ धावा , तर सुंदर ५ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून शफिउल आणि अमिनुल इस्लाम यांनी प्रत्येकी २-२ तर अफीफ होसेनने १ बळी टिपला.

Live Blog

22:39 (IST)03 Nov 2019
मुश्फिकुरचा भारताला तडाखा; बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

भारताविरूद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान अनुभवी मुश्फिकुर रहीमच्या तडाखेबाज अर्धशतकाच्या बळावर बांगलादेशने सहज पूर्ण केले. या विजयासह बांगलादेशने भारताविरूद्ध टी २० इतिहासातील पहिला सामना जिंकला. या आधीच्या ८ सामन्यात भारताने बांगलादेशला धूळ चारली होता. मालिकेतील दुसरा सामना गुरूवारी होणार आहे.

22:11 (IST)03 Nov 2019
सौम्या सरकार त्रिफळाचीत; सामन्यात 'ट्विस्ट'

सामना रंगतदार अवस्थेत असताना खेळपट्टीवर स्थिरावलेला सौम्या सरकार त्रिफळाचीत झाला. १ चौकार आणि २ षटकार खेचत त्याने ३५ चेंडूत ३९ धावा केल्या. पण मोक्याच्या क्षणी खलीलने त्याचा त्रिफळा उडवला.

21:59 (IST)03 Nov 2019
सरकार-रहीमने बांगलादेशला सावरले; सामना रंगतदार अवस्थेत

पहिले दोन गडी लवकर बाद झाल्यानंतर सौम्या सरकार आणि मुश्फिकुर रहीम यांनी बांगलादेशला सावरले. त्यामुळे आता सामना रंगतदार अवस्थेत आला आहे.

21:26 (IST)03 Nov 2019
मोहम्मद नईम बाद; बांगलादेशला दुसरा धक्का

दमदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नईम मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. २ चाैकार आणि १ षटकार लगावत त्याने २८ चेंडूत २६ धावा केल्या. पण शिखर धवनने त्याचा झेल टिपत त्याला माघारी धाडले. 

21:00 (IST)03 Nov 2019
बांगलादेशला पहिल्याच षटकात पहिला धक्का

पहिल्याच चेंडूवर चौकार लगावणारा लिटन दास पहिल्या षटकात माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ७ धावा केल्या.

20:49 (IST)03 Nov 2019
IND vs BAN : ‘हिटमॅन’ने केला धमाकेदार पराक्रम; धोनीला टाकले मागे

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात केली कामगिरी

20:41 (IST)03 Nov 2019
पांड्या-सुंदरची फटकेबाजी; बांगलादेशपुढे १४९ धावांचे लक्ष्य

भारतीय फलंदाजांना आपल्या गोलंदाजीत जखडून ठेवलेल्या बांगलादेशला शेवटच्या टप्प्यात गोलंदाजीत थोडासा मार खावा लागला. क्रुणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी शेवटच्या टप्प्यात केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. पांड्या ८ चेंडूत १५ धावा , तर सुंदर ५ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला.

20:32 (IST)03 Nov 2019
ऋषभ पंत बाद; भारताला सहावा धक्का

दिल्लीकर ऋषभ पंत घरच्या मैदानावर फारशी कमाल करू शकला नाही. २६ चेंडूत ३ चौकार लगावत त्याने २७ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या टप्प्यात मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला.

20:21 (IST)03 Nov 2019
नवखा शिवम दुबे एक धाव करून माघारी

भारतीय संघातून आपला पदार्पणाचा टी २० सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबे हा केवळ एक धाव करून बाद झाला. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीचा अंदाज न आल्याने तो बाद झाला.

20:12 (IST)03 Nov 2019
मैदानात गोंधळ; शिखर धवन धावबाद

चांगली भागीदारी होत असताना मैदानात शिखर धवन आणि ऋषभ पंत यांच्यात धाव घेण्यावरून गोंधळ झाला. त्यामुळे शिखर धवनला धावबाद व्हावे लागले. धवनने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या.

19:51 (IST)03 Nov 2019
श्रेयस अय्यर झेलबाद; भारताला तिसरा धक्का

सुरुवातीपासूनच दमदार फटकेबाजी करणारा श्रेयस अय्यर मोठा फटका खेळताना बाद झाला. अमिनुल इस्लामच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याचा सीमारेषेवर झेल टिपण्यात आला. त्याने १ चौकार आणि २ षटकारांसह १३ चेंडूत २२ धावा केल्या.

19:37 (IST)03 Nov 2019
के एल राहुल स्वस्तात बाद; भारताला दुसरा धक्का

रोहित बाद झाल्यावर मैदानात आलेला लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतला. चेंडूचा अंदाज न आल्याने त्याने मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या.

19:32 (IST)03 Nov 2019
'पॉवर-प्ले' मध्ये बांगलादेश भारतावर भारी

टी २० क्रिकेटमधील 'पॉवर-प्ले' म्हणजेच पहिल्या ६ षटकात बांगलादेशचा संघ भारतावर भारी पडला. भारताला केवळ ३५ धावा करता आल्या.

19:11 (IST)03 Nov 2019
कर्णधार रोहित पहिल्याच षटकात माघारी

भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत रोहितने दोन चौकार लगावले. पण शेवटच्या चेंडूवर मात्र तो पायचीत झाला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या.

18:44 (IST)03 Nov 2019
भारताकडून युवा शिवम दुबेला संधी

टीम इंडियाकडून युवा खेळाडू शिवम दुबे याला प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी २० पदार्पणाची कॅप दिली आणि त्याचे संघात स्वागत केले. भारताचे प्रतिनिधित्व करणारा शिवम हा ८२ वा टी-२० क्रिकेटपटू ठरला आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

18:40 (IST)03 Nov 2019
नाणेफेक जिंकून बांगलादेशची गोलंदाजी

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शाकिबच्या अनुपस्थितीमध्ये मोहमदुल्लाहकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.