IND vs BAN Men’s T20 Match Highlights: भारत वि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यात टी-२० क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २९७ धावा केल्या आहेत. यासह भारताने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या संघाविरूद्ध सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले तर सूर्यकुमार यादवने शानदार ७५ धावा केल्या. सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनने उत्कृष्ट भागीदारी रचत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. यानंतर हार्दिक पंड्या ४७ धावा आणि रियान पराग ३४ धावा यांनी भारताचा डाव पुढे नेला. तर रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला २९७ धावांवर नेऊन ठेवले. त्यानंतर बांगलादेशचा संघ १३३ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट घेतले. संजू सॅमसनला सामनावीर आणि हार्दिक पंड्याला संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
India vs Bangladesh 3rd T20 Match Highlights : भारत वि बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स
भारताने बांगलादेशवर १३३ धावांनी मोठा विजय मिळवत ३-० च्या फरकाने मालिका जिंकली आहे. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले तर फलंदाजीत संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी चमकदार कामगिरी केली.
बांगलादेशकडून तौहिद ह्रदयने सावध फलंदाजी करत षटकार लगावत ३५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. बांगलादेशने अशारितीने १८ षटकांत ७ बाद १५० धावा केल्या आहेत.
१८व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने रिशाद हुसैनला सीमारेषजवळ अभिषेक शर्माने झेलबाद केले. यासह रवी बिश्नोईने त्याच्या स्पेलमधील ३ षटकांत ३ विकेट घेतल्या आहेत.
नितीश रेड्डीच्या १७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नुकत्याच आलेल्या मेहदी हसन मिराजला झेलबाद करत भारताला सहावी विकेट मिळवून दिली आहे. बांगलादेशला विजयासाठी अजूनही १६० धावांची गरज आहे. तर मैदानात तौहिद ह्रदय ४५ धावांवर खेळत आहे.
१५व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर महमुदुल्लाहने चौकार लगावला तर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारायला गेला अन् सीमारेषेजवळ रियान परागने त्याला झेलबाद केले. यासह महमुदुल्लाहने अखेरचा टी-२० सामना खेळला आहे. त्याने भारताविरूद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते.
रवी बिश्नोईच्या १२व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या तिलक वर्माने सीमारेषेजवळ शानदार झेल टिपत लिटन दासला बाद केले. अशारितीने बांगलादेशच्या प्रत्युत्तरात चांगली धावसंख्या उभारण्याच्या आशा संपवल्यी आहेत. लिटन दासने २५ चेंडूत८ चौकारांसह ४२ धावा केल्या. यासह बांगलादेशने १२ षटकांत ४ बाद ११२ धावा केल्या आहेत.
बांगलादेशने १० षटकांत ३ बाद ९४ धावा केल्या आहेत. तौहिद १९ धावा तर लिटन दास ३७ धावांवर खेळत आहे. बांगलादेशला विजयासाठी ६० चेंडूत २०४ धावांची गरज आहे.
रवी बिश्नोईच्या सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार नजमुल हसन शांतोला बाद करत भारताला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली आहे. शांतो १४ धावा करत बाद झाला. यासह भारताने ३ बाद ५९ धावा केल्या आहेत.
लिटन दासने नितीश रेड्डीच्या षटकात ५ चौकार लगावले. यासह बांगलादेशला थोडा दिलासा मिळाला आहे. यासह बांगलादेशची धावसंख्या २ बाद ५९ धावा आहे.
वॉशिंग्टन सुंदरच्या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर तन्झीद हसनला झेलबाद केले. वरूण चक्रवर्तीने उत्कृष्ट झेल टिपक भारताला दुसरी विकेट मिळवून दिली. ४ षटकांनंतर बांगलादेशची धावसंख्या २ बाद ३९ धावा आहे.
मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर बांगलादेशचा सलामीवीर परवेजला बाद केले. रियान परागने उत्कृष्ट झेल टिपत पहिली विकेट मिळवून दिली. बांगलादेशने पहिल्या षटकात १ बाद ५ धावा केल्या आहेत. तर बांगलादेशने परवेजबरोबर तन्झीद हसनला सलामीसाठी पाठवले होते. तर परवेज बाद झाल्यानंतर लिटन दास फलंदाजीसाठी आला आहे. पहिल्याच चेंडूवर विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तो सामील झाला आहे. ज्यामध्ये भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या हे गोलंदाज आहेत.
भारताने दिलेल्या २९८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशतडून परवेज आणि तन्झीदची जोडी मैदानात आली आहे. भारताकडून मयंकने गोलंदाजीला सुरूवात केली.
भारताने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. भारताने बांगलादेशविरूद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद २९७ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने ७५ धावा तर संजू सॅमसनने १११ धावा केल्या. या दोघांनीही सर्वात मोठी भागीदारी रचत भारताच्या नावे हा विक्रम नोंदवला आहे. तर सूर्या-संजूनंतर हार्दिकने १७ चेंडूत ४७ धावा करत बाद झाला. भारताने यापूर्वी श्रीलंकेविरूद्ध ५ बाद २६० धावा केल्या होत्या.
२० षटकांतील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर तन्झीमने हार्दिक पंड्या आणि नुकत्याच आलेल्या नितीश रेड्डीला झेलबाद करत सलग दोन विकेट घेतले आहेत.
तस्कीन अहमदच्या १९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर १३ चेंडूत ३४ धावा करत बाद झाला. रियान आणि हार्दिकला एकेकदा जीवदान मिळालं तर भारताची तुफानी फटकेबाजी पाहून बांगलादेशचे गोलंदाजही बिथरले.
भारताने १७ षटकांत २५० धावांचा टप्पा गाठला आहे. १७ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद २५२ धावा आहे. हार्दिक पंड्या २३ धावा तर रियान पराग २५ धावांवर खेळत आहे.
सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनच्या विक्रमी १७३ धावांच्या भागीदारीसह भारताने १५ षटकांत ३ बाद २१३ धावांचा टप्पा गाठला आहे. सध्या मैदानात रियान पराग आणि हार्दिक पंड्याची जोडी मैदानात आहे.
१५व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव झेलबाद झाला. सूर्याने बाद होण्यापूर्वी ३५ चेंडूत ५ षटकार आणि ८ चौकारांसह ७५ धावा केल्या आहेत.
१४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर संजू सॅमसनच्या वादळी फलंदाजीला ब्रेक लागला आहे. संजूने ४७ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकारांसह १११ धावा करत बाद झाला.
संजू सॅमसनने टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावले आहे. यासह त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडित काढला आहे. संजूने ८ षटकार आणि ९ चौकारांसह आपले शतक झळकावले.
संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने आतापर्यंत ५९ चेंडूत १५९ धावांची भागीदारी रचली आहे. भारताकडून कोणत्याही संघाविरूद्ध केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे.
सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत आपले २९ अर्धशतक झळकावले आहे. भारताची धावसंख्या अशारितीने ११ षटकांनंतर १ बाद १६६ धावांवर जाऊ धडकली आहे.
संजू सॅमसनने १० व्या षटकात सलग पाच षटकार लगावत आपला क्लास दाखवून दिला आहे. संजूने अवघ्या ३५ चेंडूत ९२ धावांचा टप्पा गाठला आहे. संजू सॅमसनने वादळी फलंदाजी करत बांगलादेशच्या गोलंदाजांची बेदम धुलाई केली आहे.
संजू सॅमसनने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावत बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. सूर्या-संजूच्या भागीदारीसह भारताने पॉवरप्लेमध्ये ८२ धावा केल्या. यात संजू सॅमसनचे मोठे योगदान आहे. संजूने ८ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावा केल्या आहेत. संजू सॅमसनने बांगलादेशविरूद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे.
भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये १ बाद ८२ धावा केल्या आहेत. भारताच्या टी-२० मधील पॉवरप्लेमधील सर्वाधिक धावा आहेत. संजूने १३ चेंडूत ३५ धावा तर सूर्या १९ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे.
संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादवने चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या ५ षटकांत १ बाद ६३ धावा केल्या आहेत. संजूने एका षटकात चौकारांचा चौकार लगावला. तर सूर्यकुमार संधी मिळेल तिथे मोठे फटके लगावत आहे. सूर्या २१ धावा तर संजू ३७ धावांवर खेळत आहे.
भारताला तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पहिला धक्का बसला. तन्झीमच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळताना अभिषेक शर्मा पुन्हा एकदा बाद झाला आहे. या मालिकेत अभिषेक शर्माला मोठी खेळी करता आलेली नाही आणि पुन्हा एकदा सारख्याच पद्धतीने बाद झाला. यासह भारताने पहिल्या विकेटनंतर चांगलं पुनरागमन केलं आणि सूर्याने येताच षटकाराने आपलं खातं उघडलं.
भारत वि बांगलादेश तिसऱ्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली असून भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची जोडी फलंदाजीसाठी उतरली आहे. तर मेहदी हसन मिराजने गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्याच षटकात अभिषेकने चौकार मारत ७ धावा धावफलकावर लावल्या आहेत.
परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (यष्टीरक्षक), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झिद हसन, तौहिद हृदयॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मयंक यादव
India vs Bangladesh 3rd T20 Match Highlights: भारत वि बांगलादेशमधील तिसरा टी-२० सामना भारताने मोठमोठे विक्रम मोडत १३३ धावांनी जिंकला.