India vs England 1st T20I Weather Prediction: भारत आणि इंग्लंड दोन्ही संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेस्टर ले स्ट्रीटच्या रिव्हरसाईड ग्राऊंडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान सामन्यादरम्यान हवामान कसं असेल? जाणून घ्या हवामानाचा अंदाज.

हा सामना चेस्टर ले स्ट्रीटच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल. तापमान २१ डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. तर पाऊस पडण्याची शक्यता ३५ टक्के इतकी असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता सुरु होणार आहे. तर स्थानिक वेळेनुसार हा सामना संध्याकाळी ५:३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना रात्री २ वाजेपर्यंत चालेल. पावसामुळे षटकं कमी होऊ शकतात. पण क्रिकेट चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळू शकतो.

इंग्लंडमध्ये ढगाळ वातावरण असेल, तर वेगवान गोलंदाजांची चांदी होते. गोलंदाजांना स्विंग आणि बाऊन्स मिळेल. त्यामुळे चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे येतील. या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांचं पारडं जड राहिलं आहे. आतापर्यंत सर्वाधिक सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या सामन्यात वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याआधी आयर्लंडविरुद्ध झालेल्या दोन्ही टी-२० सामन्यांमध्ये त्याने पदार्पणाची संधी दिली गेली नव्हती. जर वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं, तर बाहेर कोण होणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेडगे, प्रसिध कृष्णा, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई.