इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या तळाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. या खेळीमुळे इंग्लंडचा गोलंदाजांनी नेहमीप्रमाणे खुसपटं काढण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने नवव्या गड्यासाठी संयमी भागीदारी केली. नवव्या गड्यासाठी इंग्लंडमधील भारतीय जोडीची आतापर्यंत सर्वोत्तम खेळी आहे. यापूर्वी कपिल देव आणि मदन लाल यांनी १९८२ मध्ये ६६ धावा केल्या होत्या.

लॉर्डच्या मैदानावर बुमराह आणि शमीला तग धरून राहणं सोपं नव्हतं. बुमराहच्या डोक्यावर बाउंसर चेंडू आदळला. त्यानंतर दुसऱ्या डावाच्या ९२ व्या षटकात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज मार्क वूडने बुमराहला डिवचलं आणि बुमराहने त्याला उत्तर दिलं. त्यानंतर जोस बटलरने बुमराहला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बुमराह नाराज झाला होता. मात्र तरीही त्याने धीर सोडला नाही. इंग्लंडचा कर्णधार जो रुटनेही बुमराहचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करून बुमराहने सडेतोड उत्तर दिलं.

Ind vs Eng : धागा खोल दिया..! इंग्लिश फिरकीपटूला षटकार ठोकत मोहम्मद शमीचं अर्धशतक

जसप्रीत बुमराहने कसोटी कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या या सामन्यात केली आहे. यापूर्वी बुमराहने ३० डावात २ च्या सरासरीने ४३ धावा केल्या आहेत. मात्र या मालिकेत त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने २८ धावा केल्या होत्या. ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम खेळी होती. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात तो खातं खोलू शकला नाही. या डावात जसप्रीत बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश आहे.