scorecardresearch

Premium

IND VS ENG 3rd ODI Highlights : भारताचा मालिकेवर कब्जा; ऋषभ पंतची शानदार शतकी खेळी

India vs England 3rd ODI Live Cricket Score : तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

India vs England 3rd ODI Live Today
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे लाइव्ह मॅच अपडेट

India vs England ODI Update, 17th July : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेवर भारताने कब्जा केला आहे. निर्णायक तिसऱ्या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियमवर झालेला हा सामना जिंकून भारताने २-१ अशी मालिका जिंकली आहे. ऋषभ पंतचे शानदार शतक आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताला विजय मिळवणे शक्य झाले. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी २६० धावांचे आव्हान ठेवले होते.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: डेव्हिड वॉर्नरने विश्वचषकात रचला इतिहास, सचिन-डिव्हिलियर्सला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम
Cricket World Cup 2023 SA vs SL Match Updates
World Cup 2023, SA vs SL: क्विंटन डी कॉकचा पहिल्या सामन्यातच मोठा धमाका! शतकी खेळी करत केला खास पराक्रम
England vs New Zealand Highlights One Day World Cup 2023
World Cup 2023, ENG vs NZ Highlights: रचिन रवींद्र- डेव्हॉन कॉनवेची तुफानी शतके! न्यूझीलंडने इंग्लंडचा नऊ विकेट्सने उडवला धुव्वा
IND vs NED: Warm-up match between India and Netherlands, after 12 years both the teams will face each other in ODI
IND vs NED Warm up: भारत आणि नेदरलँड यांच्यातील सराव सामना, १२ वर्षांनंतर दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यात येणार आमनेसामने
Live Updates

IND VS ENG 3rd ODI Live : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्याचे सर्व लाइव्ह अपडेट्स

22:39 (IST) 17 Jul 2022
ऋषभ पंतचे धमाकेदार शतक

ऋषभ पंतने धमाकेदार शतक झळकावले आहे. त्याने १०६ चेंडूंमध्ये १०० धावा पूर्ण केल्या. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक ठरले

22:17 (IST) 17 Jul 2022
हार्दिक पंड्याच्या रुपात भारताचा पाचवा गडी बाद

हार्दिक पंड्याच्या रुपात भारताचा पाचवा गडी बाद झाला आहे. ब्रायडन कार्सच्या चेंडूवर बेन स्टोक्सने त्याचा झेल टिपला. पंड्याने ५५ चेंडूंत ७१ धावांची खेळी केली.

22:12 (IST) 17 Jul 2022
३५षटकांमध्ये भारताच्या चार बाद १९७ धावा

ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने भारतीय डावाला आकार दिला आहे. दोघांच्या अर्धशतकांच्या बळावर ३५षटकांमध्ये भारताच्या चार बाद १९७ धावा झाल्या आहेत.

21:59 (IST) 17 Jul 2022
हार्दिक आणि ऋषभची शतकी भागीदारी

संकटात सापडलेल्या भारतीय संघाला हार्दिक पंड्या (६१) आणि ऋषभ पंतने (५७) आधार दिला आहे. दोघांनी १०१ चेंडूमध्ये शतकी भागीदारी करून भारतीय डावाला आकार दिला आहे.

21:53 (IST) 17 Jul 2022
हार्दिक पाठोपाठ ऋषभचेही अर्धशतक

ऋषभचे पंतने ७१ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. भारताला १९ षटकांमध्ये विजयासाठी १०१ धावांची आवश्यकत आहे.

21:48 (IST) 17 Jul 2022
हार्दिक पंड्याचे अर्धशतक

हार्दिक पंड्याने संयमी खेळ करत अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ४३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले.

21:32 (IST) 17 Jul 2022
पंत आणि पंड्याची अर्धशतकीय भागीदारी

पंत आणि पंड्याने संकटाच्या स्थितीमध्ये भारताचा डाव सावरला आहे. दोघांनी अर्धशतकीय भागीदारी केली आहे.

21:12 (IST) 17 Jul 2022
२१व्या षटकात भारताचा धावफलक शंभरी पार

२१व्या षटकात भारताचा धावफलक शंभरी पार गेला आहे. भारताला विजयासाठी आणखी १६० धावांची आवश्यकता आहे.

21:10 (IST) 17 Jul 2022
२० षटकांमध्ये भारताच्या चार बाद ९५ धावा

२० षटकांमध्ये भारताच्या चार बाद ९५ धावा झाल्या आहेत. ऋषभ पंत (२६) आणि हार्दिक पंड्या (१५) डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

20:53 (IST) 17 Jul 2022
सूर्यकुमार यादवच्या रुपात भारताला चौथा धक्का

भारतीय फलंदाजी ढेपाळली आहे. सूर्यकुमार यादवच्या रुपात भारताला चौथा धक्का बसला. त्याने २८ चेंडूत १६ धावा केल्या. भारताची अवस्था चार बाद ७२ अशी झाली आहे.

20:39 (IST) 17 Jul 2022
१३ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद ५६ धावा

भारताला १३ षटकांमध्ये ५६ धावा करणे शक्य झाले आहे. सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

20:19 (IST) 17 Jul 2022
विराट कोहलीची पुन्हा एकदा निराशा

विराट कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे. रॉस टॉपलीने त्याला १७ धावांवर बाद केले. भारताची अवस्था तीन बाद ३८ अशी झाली आहे.

20:06 (IST) 17 Jul 2022
कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी

भारताचा कर्णधार कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला आहे. रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. रोहितने १७ धावा केल्या. भारताची अवस्था दोन बाद २१ धावा ,अशी झाली आहे.

19:59 (IST) 17 Jul 2022
चार षटकांमध्ये भारताच्या एक बाद १६ धावा

भारताच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. भारताचा सलामीवीर शिखर धवन स्वस्तात बाद झाला. पहिल्या चार षटकांमध्ये भारताच्या एक बाद १६ धावा झाल्या आहेत.

19:53 (IST) 17 Jul 2022
भारताला पहिला धक्का

भारताचा सलामीवीर शिखर धवन अवघी एक धाव करून माघारी परतला आहे. रीस टॉपलीच्या चेंडूवर जेसन रॉयने त्याचा झेल घेतला. भारताची अवस्था एक बाद १३ अशी आहे.

19:43 (IST) 17 Jul 2022
भारताच्या फलंदाजीला सुरुवात

इंग्लंडने विजयासाठी दिलेले २६० धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरले आहेत. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली.

19:15 (IST) 17 Jul 2022
२५९ धावांत आटोपला इंग्लंडचा डाव

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव ४५.५ षटकांमध्येच आटोपला. भारताला विजयासाठी २६० धावांचे आव्हान मिळाले आहे.

19:11 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचा नववा गडी तंबूत

क्रेग ओव्हरटनच्या रुपात इंग्लंडचा नववा फलंदाज माघारी परतला आहे. युझवेंद्र चहलने त्याला बाद केले. इंग्लंडच्या नऊ बाद १५९ धावा झाल्या आहेत.

19:03 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचा आठवा गडी बाद

डेव्हिड विलीच्या रुपात इंग्लंडचा आठवा गडी बाद झाला आहे. युझवेंद्र चहलने सूर्यकुमार यादवकरवी विलीला बाद केले.

18:43 (IST) 17 Jul 2022
४० षटकांमध्ये इंग्लंडच्या सात बाद २१४ धावा

४० षटकांमध्ये इंग्लंडच्या सात बाद २१४ धावा झाल्या आहेत. भारताच्या हार्दिक पंड्याने चार बळी घेतले आहेत.

18:33 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण

३८ व्या षटकामध्ये इंग्लंडच्या २०० धावा पूर्ण झाल्या आहेत. क्रेग ओव्हरटन आणि डेव्हिड विली मैदानावरती उपस्थित आहेत.

18:31 (IST) 17 Jul 2022
कर्णधार जोस बटलर बाद

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ६६ धावा करून बाद झाला आहे. हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर जडेजाने शानदार टिपला.

18:29 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचा सहावा गडी बाद

लियाम लिव्हिंगस्टोनच्या रुपात इंग्लंडचा सहावा गडी बाद झाला आहे. रवींद्र जडेजाने सीमारेषेवर त्याचा शानदार झेल टीपला. इंग्लंडच्या सहा बाद १९९ धावा झाल्या आहेत.

18:06 (IST) 17 Jul 2022
जोस बटलरचे अर्धशतक

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने डाव सावरण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. या दरम्यान त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

17:59 (IST) 17 Jul 2022
३० षटकांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद १६२ धावा

३० षटकांमध्ये इंग्लंडच्या चार बाद १६२ धावा झाल्या आहेत. जोस बटलर ४४ तर लियाम लिव्हिंगस्टोन ८ धावांवर खेळत आहेत.

17:48 (IST) 17 Jul 2022
मोईन अलीच्या रुपात इंग्लंडचा पाचवा गडी बाद

खेळपट्टीवर जम बसवलेला मोईन अली रवींद्र जडेजाच्या चेंडूवर बाद झाला. इंग्लंडच्या पाच बाद १४९ धावा झाल्या आहेत.

17:37 (IST) 17 Jul 2022
२५ षटकांमध्ये इंग्लंडच्या चार बाद १३१ धावा

२५ षटकांमध्ये इंग्लंडच्या चार बाद १३१ धावा झाल्या आहेत. जोस बटलर ३२ तर मोईन अली २४ धावांवर खेळत आहेत.

17:25 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचा धावफलक शंभरीपार

२२ व्या षटकामध्ये इंग्लंडचा धावफलक शंभरीपार गेला आहे. कर्णधार जोस बटलर आणि मोईन अलीने आपला जम बसवला आहे.

17:16 (IST) 17 Jul 2022
इंग्लंडचा सावध पवित्रा

सुरुवातीचे चार गडी लवकर गमावल्यामुळे इंग्लंडने आता सावध पवित्रा घेतला आहे. कर्णधार जोस बटलर आणि मोईन अली इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. २० षटकांमध्ये इंग्लंडच्या चार बाद ९१ धावा झाल्या आहेत.

16:49 (IST) 17 Jul 2022
१५ षटकांमध्ये इंग्लंडच्या चार बाद ८० धावा

१५ षटकांमध्ये इंग्लंडच्या चार बाद ८० धावा झाल्या आहेत. पंधराव्या षटकामध्ये जोस बटलरला जीवदान मिळाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Web Title: India vs england 3rd odi live match score ind vs eng match at old trafford manchester cricket stadium live news update vkk

First published on: 17-07-2022 at 14:22 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×