Ind vs Eng: ओव्हल कसोटीपूर्वी विराट कोहली म्हणाला, “सर्वच टीम…”

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी आजपासून ओव्हल येथे सुरू होत आहे

ind vs eng virat kohlis reaction after test ended in a draw
विराट कोहली

भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी त्यांचे संबंध परस्पर आदर आणि विश्वासावर आधारित आहेत, ज्यामुळे त्यांना एक संघ तयार करण्यात मदत झाली. त्यामुळे भारतीय संघाला जगातील सर्व संघ हरवू इच्छितात. आज (गुरुवार) ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीच्या आधी कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ताज हॉटेलमध्ये सदस्यांसाठी ‘द चेंबर्स’ या नवीन विशेष क्लबचे उद्घाटन करण्यात आले.

कोहली म्हणाला, “आमच्यात मैदानाबाहेर देखील परस्पर आदर आणि विश्वासाचे नाते आहे. आमची सामायिक दृष्टी, एक सामान्य ध्येय यावर आधारित आहे. भारतीय क्रिकेटला आम्हाला उंच आणि चांगल्या ठिकाणी न्यायचे आहे. संपूर्ण टीमच्या चांगल्या खेळामुळे आम्ही हे साध्य करू. आम्ही एक संघ म्हणून अशा जागी उभे आहोत. जीथे जगभरातील सर्व संघ आम्हाला  हरवू इच्छितात आणि आमच्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे.”

या दरम्यान, रवी शास्त्री यांचे ‘स्टारगॅझिंग: द प्लेयर्स इन माय लाईफ’ हे पुस्तकही प्रकाशित झाले. शास्त्रींचे हे पहिले पुस्तक आहे. कोहली म्हणाला, “हे त्यांचे पहिले पुस्तक आहे आणि मला आशा आहे की ते आणखी काही लिहितील कारण त्यांच्याकडे बरेच काही सांगण्यासारखे आहे.” सध्याच्या कसोटी मालिकेबद्दल विचारले असता त्याने सांगितले की शेवटचे दोन सामने रोमांचक असतील.

India vs England 4th Test : कोण आत कोण बाहेर? विराट समोर प्रश्नच प्रश्न; अशी असू शकते Playing 11

भारताकडे असणारे पर्याय कोणते?

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर.

ओव्हलवरील एकंदरित परिस्थिती, खेळपट्टी पाहता भारत पाच फलंदाज, दोन फिरकी तर तीन जलदगती गोलंदाज या समिकरणासहीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पुढील ११ खेळाडूंना आज भारतीय संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. रविंद्र जडेला संधी देण्यात आली नाही तर त्याच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची शक्यता आहे.

अशी असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग ११ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, के. एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रित बुमरा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India vs england 4th test captain virat kohli statement before match srk