लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विजयी तिरंगा फडकावला आहे. अंत्यत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला १५७ धावांनी हरवले आणि ५० वर्षांचा दुष्काळ संपवला. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला २९१ धावांची गरज होती, शिवाय त्यांच्याकडे संपूर्ण संघ फलंदाजीसाठी शिल्लक होता. पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त आक्रमण करत इंग्लंडच्या फलंदाजांना एकामागोमाग एक तंबूत धाडले. लंचनंतर खेळपट्टीने आपला रंग बदलला आणि जडेजासह बुमराहने आपले कौशल्य दाखवायला सुरुवात केली. १९७१मध्ये भारताने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात या मैदानावर शेवटचा कसोटीविजय नोंदवला होता. भारताने या विजयासह मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

भारताकडून जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर उमेश यादवने ३ गडी बाद केले. आता कसोटी मालिकेतील पाचवा सामना अनिर्णित किंवा भारताने जिंकल्यास मालिका जिंकणार आहे. तर इंग्लंडपुढे आता फक्त मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे त्यांना पाचवा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे.

Live Blog

21:16 (IST)06 Sep 2021
ओव्हल कसोटीत इंग्लंडचा सुपडा साफ; भारताचा १५७ धावांनी ऐतिहासिक विजय

लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय क्रिकेट संघाने विजयी तिरंगा फडकावला आहे. अंत्यत रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत विराटसेनेने इंग्लंडला १५७ धावांनी हरवले आणि ५० वर्षांचा दुष्काळ संपवला.

20:55 (IST)06 Sep 2021
इंग्लंडचा नववा गडी बाद; भारत विजयाच्या उंबरठ्यावर

भारताला विजयासाठी एका गड्याची आवश्यकता आहे.

20:17 (IST)06 Sep 2021
इंग्लंडला आठवा धक्का; ख्रिस वोक्स १८ धावा करून तंबूत

भारताला विजयासाठी २ गड्यांची आवश्यकता आहे. उमेश यादवने ख्रिस वोक्सला बाद केल्याने इंग्लंडचे आठ गडी बाद झाले आहेत. 

19:54 (IST)06 Sep 2021
भारताची विजयाकडे वाटचाल; जो रूट ३६ धावांवर बाद

इंग्लंडचा कर्णधार ३६ धावा करून बाद झाला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

18:54 (IST)06 Sep 2021
इंग्लंडचे सहा गडी बाद; भारताची विजयाकडे वाटचाल

इंग्लंडचे सहा गडी बाद झाल्याने आता भारताची विजयाकडे वाटचाल सरु झाली आहे. जसप्रीत बुमराहने दोन गडी बाद केल्यानंतर जडेजाच्या गोलंदाजावर मोईन अली बाद झाला आहे. त्यालाही आपलं खातं खोलता आलं नाही. कर्णधार जो रूटची एकाकी झुंज सुरु आहे.

18:48 (IST)06 Sep 2021
इंग्लंडला पाचवा धक्का; जॉनी बेअरस्टो शून्यावर बाद

इंग्लंडचे आतापर्यंत ५ गडी बाद झाले आहेत. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो बाद शून्यावर क्लीन बोल्ड झाला आहे. त्यामुळे भारताच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत.

18:40 (IST)06 Sep 2021
इंग्लंडला चौथा धक्का; ओली पोप २ धावांवर बाद

ओली पोप २ धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. त्याने ११ चेंडूत २ धावा केल्या. बुमराहनं या गड्यासह कसोटीत १०० वा बळी घेतला आहे.

18:24 (IST)06 Sep 2021
इंग्लंडला तिसरा धक्का; जडेजाच्या गोलंदाजीवर हमीद त्रिफळाचीत

हसीब हमीद ६३ धावा करून जडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आहे. त्याने १९३ चेंडूवर ६ चौकाराच्या मदतीने ६३ धावा केल्या.

17:58 (IST)06 Sep 2021
लंचपर्यंत इंग्लंडचे दोन फलंदाज तंबूत; विजयासाठी हव्यात २३७ धावा

इंग्लंडचा हमीद ६२ धावांवर तर जो रूट ८ या धावसंख्येवर नाबाद खेळत आहे.

17:25 (IST)06 Sep 2021
अर्धशतक ठोकून पुढे फलंदाजी करणाऱ्या इंग्लिश फलंदाजाचा सोपा झेल सिराजनं सोडला.
17:10 (IST)06 Sep 2021
इंग्लंडचा दुसरा गडी बाद; डेविड मलान धावचीत

इंग्लंडचा दुसरा गडी बाद करण्यात भारताला यश आलं आहे. डेविड मलान ५ या धावसंख्येवर असताना धावचीत झाला आहे. 

17:08 (IST)06 Sep 2021
...आणि मोहम्मद सिराजने हमीदचा झेल सोडला

रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद सिराजने हसीब हमीद झेड सोडला. 

16:29 (IST)06 Sep 2021
ओव्हल कसोटीचा निकाल काय लागणार?
16:16 (IST)06 Sep 2021
हसीब हमीदची अर्धशतकी खेळी

निर्णायक अशा चौथ्या दिवशी हसीब हमीदने अर्धशतकी खेळी केली. त्याने १२३ चेंडून अर्धशतक झळकावलं.

16:15 (IST)06 Sep 2021
भारताला पहिलं यश, बर्न्स अर्धशतक झळकावून तंबूत

इंग्लंडने पहिल्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी केली. ही भागिदारी मोडण्यासाठी भारतीय गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. मात्र ही जोडी फोडण्यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला यश आलं. अर्धशतक ठोठावल्यानंतर रॉरी बर्न्सला शार्दुल ठाकुरनं तंबूचा रस्ता दाखवला. शार्दुलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पंतने झेल घेत बाद केलं. बर्न्सने १२५ चेंडूत ५० धावा केल्या.