कोलंबो टेस्टमध्ये चौथ्या दिवसअखेर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. श्रीलंकेने फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात २२९ धावांची मजल मारली आहे. त्यांच्याकडे फक्त १६ धावांची आघाडी आहे आणि त्यांच्या ४ विकेट्स बाकी आहेत.
पावसाचं आगमन
श्रीलंकेने दुसऱ्या डावात २२९/६ अशी मजल मारली आहे. त्यांच्याकडे १६ धावांची आघाडी आहे. पासिंदू सूरियाबंदाराचं शतक हुकलं. पावसाचं आगमन झाल्यामुळे दिवसाचा खेळ पूर्ण होण्याची शक्यता मावळली आहे.
निरोशन डिकवेला तंबूत
सारांश जैनने श्रीलंकेचा विकेटकीपर बॅट्समन निरोशन डिकवेलाला बाद करत श्रीलंकेला अडचणीत टाकलं आहे. श्रीलंकेने पिछाडी भरून काढली पण त्यानंतर त्यांनी झटपट विकेट्स गमावल्या आहेत.
पासिंदू सूरियाबंदाराची विकेट ठरू शकते निर्णायक
मानव सुथारच्या गोलंदाजीवर शतकाच्या दिशेने कूच करणारा पासिंदू सूरियाबंदारा बाद झाला. ऋषभ पंतने शिताफीने स्टंपिंग करत त्याला माघारी धाडलं.
श्रीलंकेने मिळवली आघाडी
श्रीलंकेने फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात झुंजार खेळ करत पिछाडी भरून काढली आहे. यादरम्यान त्यांनी ५ विकेट्स गमावल्या आहेत.
श्रीलंकेचा संघ २०० धावांच्या दिशेने
कामिंदू मेंडिस बाद झाल्यावनंतर आलेल्या धनंजय डिसिल्वाने पसिंदू सूर्याबंदाराची चांगली साथ देत संघाचा डाव सावरला आहे. यासह श्रीलंकेचा संघ २०० धावांच्या दिशेने जात आहे. यासह भारताची आघाडी मोडून काढत मोठी धावसंख्या उभारण्याचं संघाचं लक्ष्य आहे.
कामिंदू मेंडिस तंबूत
श्रीलंकेने दुसऱ्या डावात खणखणीत प्रतिकार करत पिछाडी ५०च्या आत आणली आहे. यादरम्यान प्रसिध कृष्णाच्या उसळत्या चेंडूवर कामिंदू बाद झाला. त्याने ५५ धावांची खेळी केली.
श्रीलंका शंभरीपार
उपाहारानंतर संयमी खेळ करत श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात शंभर धावांचा टप्पा ओलांडला आहे.
श्रीलंका शंभरीच्या दिशेने
चौथ्या दिवशी श्रीलंकेने फॉलोऑन मिळाल्यानंतर दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत २ विकेट्सच्या मोबदल्यात ८३ धावांची मजल मारली आहे.
कामिल मिशारा तंबूत
रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीपचा प्रयत्न श्रीलंकेचा कामिल मिशारासाठी अपयशी ठरला. पंचांनी त्याला बाद ठरवलं. त्याने रिव्ह्यूचा निर्णय घेतला. मात्र तिसऱ्या पंचांनीही निर्णय कायम ठेवला.
सिराजला दुखापत
मानव सुथारच्या गोलंदाजीवर सूरियाबंदाराचा स्वीपचा फटका हवेत उडाला. मोहम्मद सिराजने खूप अंतर पार करून सूर मारला. झेल घेण्याच्या प्रयत्नात त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. सिराज उपचारांसाठी डगआऊटमध्ये परतला आहे.
सिराजला मिळवून दिलं पहिलं यश
मोहम्मद सिराजने लहिरू उदानाला बाद करत भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं. सिराजच्या उसळत्या चेंडूवर पूलचा फटका खेळण्याचा उदानाचा प्रयत्न सारांश जैनच्या हातात जाऊन विसावला.
टीम इंडियाने श्रीलंकेला दिला फॉलोऑन
श्रीलंकेला पहिल्या डावात २९० धावांत गुंडाळल्यामुळे भक्कम आघाडी हातात असलेल्या भारतीय संघाने फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंका सर्वबाद २९०
प्रसिध कृष्णा आणि मानव सुतार यांनी घेतलेल्या प्रत्येकी ३ विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांत गुंडाळला. सोनल दिनूशाने १०३ धावांची खेळी साकारली.
सारांश जैनने पटकावली पहिलीवहिली विकेट
३३व्या वर्षी भारताकडून खेळण्याचं स्वप्न साकार झालेल्या सारांश जैनने लहिरू कुमाराला बाद करत पहिलीवहिली विकेट पटकावली. २० षटकं गोलंदाजी केल्यानंतर सारांशला हे यश मिळालं. लहिरूने १२ धावा केल्या.
सोनल दिनूशाचं शतक
मालिकेत अफलातून फॉर्मात असलेल्या सोनल दिनूशाने आणखी एक शतक झळकावलं. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर चौकार खेचत दिनूशाने शतकाला गवसणी घातली.
