Harshit Rana Ruled Out: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी भारताचा वनडे संघ बर्मिंगहॅममध्ये दाखल झाला आहे. ही मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज हर्षित राणा वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे.

हर्षित राणा दुखापतग्रस्त झाल्यानंतर ४ महिने संघाबाहेर होता. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धाही खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून पुनरागमन केलं होतं. त्यानंतर तो आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसून आला होता. हर्षित राणा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.

हर्षित राणाला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पण स्पर्धा सुरु होण्याआधीच तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं. इंग्लंडविरुद्ध झाले्ल्या टी-२० मालिकेतील सुरुवातीच्या ३ सामन्यांमध्ये तो प्लेईंग ११ चा भाग होता. पण चौथ्या सामन्याआधी तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला चौथ्या सामन्यातून बाहेर पडावं लागलं होतं. दुखापतीमुळे तो पाचवा सामनाही खेळू शकलेला नाही. हर्षित राणासह वरुण चक्रवर्ती देखील दुखापतीमुळे बाहेर पडला होता. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत गोलंदाजी करताना त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने या मालिकेत ३ गडी बाद केले. पण त्याने शेवटी फलंदाजीला येऊन योगदान दिलं.

असं आहे वनडे भारत- इंग्लंड मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला वनडे सामना- १४ जुलै
दुसरा वनडे सामना- १६ जुलै
तिसरा वनडे सामना- १९ जुलै

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली*, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.