Mohammed Siraj, India vs England Squad: भारतीय संघ येत्या काही दिवसात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये १४ जुलैपासून ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. तर काही धक्कादायक निर्णय देखील घेण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यासाठी मोहम्मद सिराजला संधी दिली गेली होती. त्यानंतर वनडे मालिकेतून त्याला विश्रांती देण्यात आली होती. जेव्हा त्याला संघात स्थान दिलं गेलं नव्हतं, त्यावेळी त्याला इंग्लंडविरूद्धच्या मालिकेसाठी विश्रांती दिली गेली आहे, अशी चर्चा होती. पण आता इंग्लंडविरूद्धच्या वनडे संघात त्याला स्थान दिलं गेलेलं नाही.

नेमकं कारण काय?

मोहम्मद सिराजला संघात स्थान न देण्याची किंवा संघाबाहेर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीही सिराजचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. पण त्यानंतर अचानक त्याला संघाबाहेर करण्यात आलं.

सिराजला बाहेर का केलं? यामागचं कारण बीसीसीआयने आधीच सांगितलं आहे. सिराज दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला नाही. बीसीसीआयची मेडिकल टीम आणि टीम मॅनेजमेंटने मिळून हा निर्णय घेतला आहे.

जर वर्कलोड मॅनेज करायचं होतं, तर अफगाणिस्तानविरूद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी सिराजला भारतीय संघात स्थान का दिलं गेलं? या सामन्यात त्याला विश्रांती देता आली असती. तसेच वर्कलोडचं कारण देऊन सिराजला आधी टी-२० आणि आता वनडे क्रिकेटमधून बाहेर करणं, हे अनेकांना पटलेलं नाही. सिराजसारखा अनुभवी गोलंदाजाला संघातून बाहेर ठेवल्याने आता क्रिकेट चाहत्यांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे.

इंग्लंडविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार