भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघाला धक्का बसला आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विनच्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्याने Essex विरुद्धच्या सराव सामन्यात सहभाग घेतला नाही. सरावादरम्यान नेट्समध्ये गोलंदाजी करत असताना आश्विनच्या उजव्या हातावर चेंडूचा जोरदार फटका बसला आहे. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून आश्विनने गोलंदाजी करणं टाळलं आहे. सध्या भारतीय संघाचे डॉक्टर आणि फिजीओथेरपिस्ट आश्विनच्या दुखापतीवर लक्ष ठेऊन आहेत. १ ऑगस्टपासून बर्मिंगहॅमच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी आश्विनची दुखापत बरी होते की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.