रोहितच्या शतकामुळे आघाडी

अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची परदेशातील पहिल्या कसोटी शतकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपुष्टात आली.

अनुभवी सलामीवीर रोहित शर्माची परदेशातील पहिल्या कसोटी शतकाची प्रतीक्षा अखेर शनिवारी संपुष्टात आली. रोहितने (२५६ चेंडूंत १२७ धावा) साकारलेल्या शतकाला चेतेश्वर पुजाराच्या (१२७ चेंडूंत ६१ धावा) अर्धशतकाची बहुमूल्य साथ लाभल्यामुळे भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात १७१ धावांची आघाडी घेतली.

तिसऱ्या दिवशी अंधूक सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला, तेव्हा भारताने ३ बाद २७० धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार विराट कोहली २२, तर अष्टपैलू रवींद्र जडेजा ९ धावांवर खेळत आहे.

शुक्रवारच्या बिनबाद ४३ धावांवरून पुढे खेळताना रोहित-राहुलच्या जोडीने ८३ धावांची सलामी दिली. जेम्स अँडरसनने राहुलला ४६ धावांवर बाद केले. त्यानंतर रोहित आणि पुजारा यांनी दुसऱ्या गडय़ासाठी १५३ धावांची भागीदारी रचली. रोहितने मोईन अलीला षटकार लगावून दिमाखात शतकाची वेस ओलांडली. एकंदर आठवे शतक झळकावणाऱ्या रोहितने कसोटी कारकीर्दीतील ३,००० धावांचा टप्पाही गाठला. ऑली रॉबिन्सनने रोहित आणि पुजाराला एकाच षटकात बाद केले.

संक्षिप्त धावफलक

’ भारत (पहिला डाव) : १९१

’ इंग्लंड (पहिला डाव) : २९०

’ भारत (दुसरा डाव) : ९२ षटकांत ३ बाद २७० (रोहित शर्मा १२७, चेतेश्वर पुजारा ६१; ऑली रॉबिन्सन २/६७)

भारत-इंग्लंड कसोटी मालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: India vs england test series rohit sharma century akp

ताज्या बातम्या