IND vs IRE Live Score Updates भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना आज डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) येथे झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही आपल्या नावे केली आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत यजमानांना २२८ धावांचे आव्हान दिले होते. दीपक हुडाचे धडाकेबाज शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने २० षटकांमध्ये सात गडी गमावून २२७ धावा केल्या होत्या.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Highlights in Marathi
PBKS vs MI Highlights, IPL 2024 : रोमहर्षक सामन्यात मुंबईचा पंजाबवर ९ धावांनी निसटता विजय, आशुतोष शर्माची वादळी खेळी ठरली व्यर्थ
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा
Live Updates
00:26 (IST) 29 Jun 2022
आयर्लंडचा पाचवा गडी बाद

हॅरी टेक्टर ३९ धावा करून बाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर दीपक हुडाने त्याचा झेल टीपला. यजमानांना १७ चेंडूंत ३७ धावांची आवश्यकता आहे.

00:06 (IST) 29 Jun 2022
उमरान मलिकचा पहिला आंतरराष्ट्रीय बळी

लोर्कन टकर पाच धावा करून बाद झाला. उमरान मलिकच्या चेंडूबर बदली क्षेत्ररक्षक म्हणून आलेल्या युझवेंद्र चहलने त्याचा झेल टिपला.

23:49 (IST) 28 Jun 2022
कर्णधार बलबर्नीच्या रुपात यजमानांना तिसरा झटका

आयर्लंडचा कर्णधार बलबर्नी अर्धशतक करून बाद झाला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रवी बिश्नोईने त्याचा झेल टिपला.

23:46 (IST) 28 Jun 2022
कर्णधार बलबर्नीचे अर्धशतक पूर्ण

आयर्लंडचा कर्णधार बलबर्नीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३४ चेंडूत ५० धावा केल्या.

23:29 (IST) 28 Jun 2022
आयर्लंडला दुसरा झटका

गॅरेथ डेलानी शून्यावर धावबाद झाला. त्यानंतर हॅरि टॅक्टर मैदानात आला आहे.

23:23 (IST) 28 Jun 2022
आयर्लंडचा पहिला गडी बाद

आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग रवी बिश्नोईच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने केवळ १८ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या.

22:52 (IST) 28 Jun 2022
आयर्लंडच्या डावाला सुरुवात

आयर्लंडच्या डावाला सुरुवात झाली असून त्यांना २२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.

22:35 (IST) 28 Jun 2022
अक्षर पटेलच्या रुपात भारताला सहावा झटका

कार्तिक पाठोपाठ अक्षर पटेलदेखील शून्यावर बाद झाला. क्रेग यंगच्या गोलंदाजीवर जॉर्ज डॉकरेलने त्याचा झेल टिपला.

22:33 (IST) 28 Jun 2022
दिनेश कार्तिक शून्यावर बाद

भारताचा धडाकेबाज फलंदाज दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. क्रेग यंने त्याला स्वस्तात माघारी धाडले.

22:29 (IST) 28 Jun 2022
दीपक हुड्डा बाद

भारताचा शतकवीर दीपक हुड्डा १०४ धावांवर बाद झाला. जोशुआ लिटीलच्या चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात आला आहे.

22:25 (IST) 28 Jun 2022
सुर्यकुमार यादवच्या रुपात भारताचा तिसरा गडी बाद

सुर्यकुमार यादव १५ धावा करून माघारी परतला आहे. आता भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या मैदानात उतरला आहे.

22:23 (IST) 28 Jun 2022
दीपक हुड्डाचे धडाकेबाज शतक

भारतीय फलंदाज दीपक हुड्डाने धडाकेबाज शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने अवघ्या ५५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

21:59 (IST) 28 Jun 2022
संजू सॅमसनचे अर्धशतक पूर्ण

दीपक हुड्डा पाठोपाठ सलामीवीर संजू सॅमसननेदेखील अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३१ चेंडूमध्ये ५० धावा पूर्ण केल्या.

21:47 (IST) 28 Jun 2022
दीपक हुड्डाचे शानदार अर्धशतक

दीपक हुड्डाने शानदार अर्धशतक झळकावले आहे. २७ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.

21:30 (IST) 28 Jun 2022
पावर प्ले अखेरीस भारताच्या १ बाद ५४ धावा

पावर प्ले अखेरीस भारताने १ बाद ५४ धावांपर्यंत मजल मारली आहे. संजू सॅमसन आणि दीपक हुड्डा भारतीय डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत.

21:10 (IST) 28 Jun 2022
भारताला पहिला झटका

भारताचा सलामीवीर ईशान किशन तीन धावा करून बाद झाला. मार्क अडायरच्या चेंडूवर तो बाद झाला.

21:01 (IST) 28 Jun 2022
भारतीय फलंदाजीला सुरुवात

ईशान किशन आणि संजू सॅमसन भारतीय डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

20:36 (IST) 28 Jun 2022
भारतीय संघात तीन बदल

भारतीय संघ - ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पंड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, हर्षल पटेल, रवी बिश्नोई

आयर्लंड संघ - पॉल स्टर्लिंग, अँड्रयू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलानी, हॅरी टेक्टर, लोर्कन टकर (यष्टिरक्षक), जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्राईन, मार्क अडायर, क्रेग यंग, जोशुआ लिटील, कोनोर ओल्फर्ट

20:33 (IST) 28 Jun 2022
नाणेफेक जिंकून भारताची फलंदाजी

भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम गोलंदाजीसाठी निमंत्रण दिले आहे.