IND vs IRE Live Score Updates भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. यातील दुसरा सामना आज डबलिनमधील 'द व्हिलेज स्टेडियम'वर (मालाहाइड) येथे झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने ४ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही आपल्या नावे केली आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत यजमानांना २२८ धावांचे आव्हान दिले होते. दीपक हुडाचे धडाकेबाज शतक आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने २० षटकांमध्ये सात गडी गमावून २२७ धावा केल्या होत्या.