India vs Japan Historic T20 Match Details: भारतीय क्रिकेट संघाचं पुढील लक्ष्य २०२६ मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यावर असणार आहे. भारतीय संघ रँकिंगमुळे थेट उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टर-फायनलमध्ये) खेळणार आहे, मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अद्याप निश्चित झालेला नाही. दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा जपानमधील आयची-नागोया येथे खेळवली जाणार असल्याने भारत आणि जपान यांच्यात टी-२० सामना खेळवला जाणार आहे, हा सामना किती वाजता सुरू होणार आणि लाईव्ह कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.
भारत आणि जपान यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. भारतीय संघ जपानविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल, त्यामुळे हा सामना ऐतिहासिक होणार हे निश्चित आहे. हा सामना कधी होणार आहे आणि भारतीय प्रमाणवेळेनुसार तो किती वाजता सुरू होईल, याची माहिती आता जाणून घेऊया.
कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून पदक निश्चित केलं आहे; श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यास भारताचा महिला संघ पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपलं नाव कोरेल, तर पराभव झाल्यास रौप्यपदकावर समाधान मानावं लागेल. महिला संघानंतर आता भारतीय पुरूष संघ सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशाने उतरणार आहे.
भारत-जपान टी-२० सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि जपान संघांमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. हा सामना मंगळवार, २२ सप्टेंबरला सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी, म्हणजेच सकाळी ९:०० वाजता होईल. जपान संघ अलीकडच्या काळात चांगला खेळ करत असला, तरी भारताला आव्हान देण्याची त्यांची शक्यता खूपच कमी आहे; तरीही, हा सामना रंजक ठरेल अशी अपेक्षा आहे. हा सामना दुपारी १:०० वाजेपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, इशान किशन, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, विप्रज निगम, वैभव सूर्यवंशी
जपान संघ
केंडल फ्लेमिंग (कर्णधार), शिराय पाटमोर (यष्टीरक्षक), ॲलिस्टर फ्लेमिंग, बेंजामिन इटो-डेव्हिस, रिओ साकुरानो-थॉमस, कोहेई कुबोटा, वाटारू मियाउची, डेक्लान सुझुकी, इब्राहिम ताकाहाशी, माकोटो तानियामा, लाचलान यामामोटो-लेक, त्सुयोशी ताकाडा, चार्ली हारा-हिंझे, शोमा स्लेटर, जेक कुसुदा-नायर्न.
