नवख्या जपानचा धुव्वा उडवत भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सेमी फायनलमध्ये धडक मारली. भारतीय संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फिरकीपटूंसमोर जपानच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. त्यांचा डाव ५७ धावांतच आटोपला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शफाली वर्माच्या नाबाद ४० धावांच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने लक्ष्य गाठलं.
INDIA VS JAPAN WOMENS T20 INTERNATIONAL ASIAN GAMES 2026 LIVE SCORE UPDATES: भारत विरुद्ध जपान टी२० सामना आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ लाईव्ह स्कोअर अपडेट्स
भारत सेमी फायनलमध्ये
जपानच्या दिलेल्या ५८ धावांचं लक्ष्य झटपट गाठत भारतीय संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली. शफाली वर्माने १५ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४० धावांची खेळी केली.
कमालिनी, भारती तंबूत
जपानने दिलेल्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना कमालिनी आणि भारती फुलमाळी तंबूत परतल्या आहेत.
शफालीची आक्रमक सुरुवात
तडाखेबंद शैलीसाठी प्रसिद्ध शफाली वर्माने जपानविरुद्ध आक्रमक सुरुवात केली आहे.
जपानचा ५७ धावांवर ऑलआऊट
भारताच्या फिरकीपटूंसमोर जपानच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. जपानचा डाव ५७ धावांतच आटोपला. श्री चरणीने ४ तर शफाली वर्माने २ विकेट्स घेतल्या.
श्री चरणीने पटकावल्या ४ विकेट्स
श्री चरणीच्या फिरकीसमोर जपानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. तिने ४ विकेट्स घेत जपानच्या डावाला खिंडार पाडले.
जपानला जाणवतेय अनुभवाची कमतरता
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसणं जपानच्या खेळात दिसून येत आहे. धाव घेताना पडणं, दोन्ही फलंदाजांत समन्वय नसणं, कॉलिंगचा अभाव अशा गोष्टी दिसून येत आहेत. जपानने ७ विकेट्स गमावल्या आहेत.
जपानचा निम्मा संघ तंबूत
चांगल्या सुरुवातीनंतर जपानची घसरगुंडी उडाली आहे. त्यांचे ५ फलंदाज तंबूत परतले आहेत.
शफाली वर्माच्या गोलंदाजीवर हरमनप्रीत कौरने सुरेख झेल टिपला आणि शिमाको काटोला परतीचा दाखवला.
जपानने गमावल्या दोन विकेट्स
चांगल्या सुरुवातीनंतर जपानने झटपट दोन विकेट्स गमावल्या आहेत.
जपानची सावध सुरुवात
जपानच्या फलंदाजांनी अनुभवी भारतीय गोलंदाजीविरुद्ध सावध सुरुवात केली आहे.
भारतीय संघ असा आहे
भारतीय संघ
स्मृती मानधना, शफाली वर्मा, भारती फुलमाळी, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष, गुनालन कमालिनी, दीप्ती शर्मा, श्रेयांका पाटील, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांती गौड
हरमनप्रीत कौरने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने जपानविरुद्ध टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
[caption id="attachment_6135494" align="alignnone" width="670"]
INDIA VS JAPAN WOMENS T20 INTERNATIONAL ASIAN GAMES 2026: भारत आणि जपान महिला टी२० सामना आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६
