India vs New Zealand 1st T20 Highlights Score Updates: भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला टी-२० सामना एमएस धोनीचे होम ग्राउंड असलेल्या झारखंड स्टेट क्रिकेट असोसएशन मैदानावर खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला १७७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युतरात भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाने २१ धावांनी शानदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने ५२ आणि डॅरिल मिशेलने नाबाद ५९ धावा केल्या. भारतीय संघ २० षटकात विकेट गमावून केवळ १५५ धावा करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४७ आणि वॉशिंग्टन सुंदरने ५० धावा केल्या. अर्शदीप सिंगने २०व्या षटकात दिलेल्या २७ धावांनी न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावला.

त्यानंतर पाहुण्यांच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना पळताभुई थोडी केली. ३ फलंदाज १५ धावांवर माघारी परतले होते आणि ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या यांनी सामन्यात पकड घेतली होती. पण, ४ चेंडूंनी सामना फिरला अन् त्यानंतर भारताचा डाव गडगडला. वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्ससह अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केला.

Live Updates

India vs New Zealand 1st T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० हायलाइट्स अपडेट

17:54 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: दोन्ही संघाचे कर्णधार काही वेळात नाणेफेकीसाठी मैदानात हजर होणार

कर्णधार हार्दिक पांड्या आणि मिचेल सँटनर नाणेफेकीसाठी थोड्याच वेळात मैदानात उपस्थित राहणार.

17:37 (IST) 27 Jan 2023
India vs New Zealand 1st T20: हार्दिक पांड्या आणि मिचेल सँटनरच्या हाती दोन्ही संघाची कमान

या सामन्यात भारतीय संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या आणि न्यूझीलंडची धुरा मिचेल सँटनरच्या हाती असणार आहे.

17:31 (IST) 27 Jan 2023
भारत आणि न्यूझीलंड संघातील पहिल्या टी-२० सामन्याची नाणेफेक साडे सहाला होणार

संभाव्य प्लेइंग इलेव्हन: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव

संभाव्य प्लेइंग इलेव्हन: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, बेन लिस्टर/जेकब डफी

India vs New Zealand 1st T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० हायलाइट्स अपडेट

India vs New Zealand 1st T20I Highlights Updates: न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १७७ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला, निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. ज्यामुळे न्यूझीलंड संघाने २१ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली