India vs New Zealand 2nd T20 Highlights Score Updates: भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर ६ गडी राखून मात केली. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून कर्णघार हार्दिक पांड्या १५ आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव २६ धावांवार नाबाद राहिले.

न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ बाद ९९ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून १०१ धावा करत विजय मिळवला.

न्यूझीलंड संघाकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २३ चेंडूत नाबााद १९ धावा केल्या. इतर किवी फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे सपशेल अपयशी ठरले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. त्याचबरोबर शिवम मावी वगळता प्रत्येक गोलंदाजांने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Live Updates

India vs New Zealand 2nd T20 Highlights Match Score Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टी२० हायलाइट्स अपडेट्स

22:32 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: भारताचा न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय

न्यूझीलंड संघाने निर्धारित २० षटकांत ८ बाद ९९ धावा केल्या होत्या.

त्यामुळे भारतीय संघाला १०० धावांचे लक्ष्य मिळाले होते.

भारतीय संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून १०१ धावा करत विजय मिळवला.

22:22 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला ७ चेंडूत ७ धावांची गरज

भारतीय संघाला ७ चेंडूत ७ धावांची गरज

22:18 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १८ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ४ बाद ८७

भारतीय संघाला विजयासाठी १३ धावांची गरज

सूर्यकुमार यादव २० (२६)

हार्दिक पांड्या ७(१४)

22:11 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १६ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ४ बाद ७७

१६ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ४ बाद ७७

सूर्यकुमार यादव १५ (२२)

हार्दिक पांड्या ३(६)

22:04 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला वाशिंग्टन सुंदरच्या रुपाने चौथा धक्का

भारतीय संघाला वाशिंग्टन सुंदरच्या रुपाने तिसरा धक्का बसला

वाशिंग्टन सुंदर १० धावांवर धावबाद झाला.

१४.३ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ४ बाद ७०

21:56 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १३ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ६६

१३ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ६६

सूर्यकुमार यादव १० (१४)

वाशिंग्टन सुंदर ८(५)

21:47 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: ११ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ५१

११ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ५१

भारतीय संघाला तिसरा झटका राहुल त्रिपाठीच्या रुपाने बसला

भारताला विजयासाठी ४९धावांची गरज

21:41 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १० षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या २ बाद ४९

१० षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या २ बाद ४९

राहुल त्रिपाठी १३(१५)

सूर्यकुमार यादव २ (४)

21:33 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: इशान किशनच्या रुपाने भारतीय संघाला दुसरा धक्का

इशान किशन ३२ चेंडूत १९ धावा करुन धावबाद झाला.

९ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या २ बाद ४६

21:27 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: आठ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या १ बाद ४३

आठ षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या १ बाद ४३

इशान किशन १६(२७)

राहुल त्रिपाठी १२(१२)

21:18 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: पावरप्लेच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या १ बाद २९

पावरप्लेच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या १ बाद २९

इशान किशन ११(१९)

राहुल त्रिपाठी ४(७)

21:12 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला पहिला झटका

शुबमन गिलच्या रुपाने भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे.

शुबमन गिल ११ धावा करुन झेलबाद झाला.

चार षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या १ बाद १७

21:04 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: दोन षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या बिनबाद ९

दोन षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या बिनबाद ९

शुबमन गिल ७

इशान किशन २

20:59 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: शुबमन गिल आणि इशान किशनकडून भारतीय डावाची सुरुवात

शुबमन गिल आणि इशान किशनने भारतीय डावाची सुरुवात केली आहे.

दोघेही युवा खेळाडू आहेत.

पहिल्या षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या बिनबाद ८

शुबमन गिल ७

इशान किशन

20:56 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला १०० धावांचे लक्ष्य

भारत आणि न्यूझीलंड संघात लखनऊमध्ये तिसरा टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना, निर्धारित २० षटकांत ८ बाद ९९ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी १०० धावांचे लक्ष्य मिळाले.

न्यूझीलंड संघाकडून कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने २३ चेंडूत नाबााद १९ धावा केल्या. इतर किवी फलंदाज भारतीय गोलंदाजांपुढे अपयशी ठरले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंगने सर्वाधिक २ विकेट घेतल्या. त्याचबरोबर शिवम मावी वगळता प्रत्येक गोलंदाजांने प्रत्येकी १ विकेट घेतली.

20:46 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंडचे भारतीय संघाला १०० धावांचे लक्ष्य

निर्धारित २० षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ८ बाद ९९. न्यूझीलंडची ही धावसंख्या भारताविरुद्धची सर्वात निच्चांकी आहे.

भारतीय संघाला १०० धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

20:34 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला आठवा झटका

न्यूझीलंड संघाला आठवा झटका

अर्शदीपने लॉकी फर्ग्युसनला बाद केले.

१८.२ षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या ८ बाद ८८

20:31 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला सातवा झटका

इश सोधी एक धाव काढून बाद झाला.

20:26 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: एम ब्रेसवेलच्या रुपाने न्यूझीलंड संघाला सहावा झटका

एम ब्रेसवेलच्या रुपाने न्यूझीलंड संघाला सहावा झटका

हार्दिक पांड्या एम ब्रेसवेल १४(२१) धावांवर झेलबाद केले. हार्दिकच्या गोलंदाजीवर अर्शदीपने शानदार झेल घेतला.

20:18 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १६ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ७६

१६ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ७६

मिचेल सँटनर ८(१०)

एम ब्रेसवेल १२(१८)

20:14 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १५ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ७१

१५ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ७१

मिचेल सँटनर ६(७)

एम ब्रेसवेल ९(१५)

20:04 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत

न्यूझीलंड संघाला मार्क चॅपमनच्या रुपाने पाचवा धक्का बसला.

मार्क चॅपमन १४ धावांवर धावबाद झाला.

19:59 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १२ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद ५८

१२ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद ५८

मार्क चॅपमन १३(१८

एम ब्रेसवेल ४(७)

19:52 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: १० षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद ४८

१० षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद ४८

न्यूझीलंड संघाला डॅरिल मिशेलच्या रुपाने चौथा झटका बसला.

त्याला फिरकीपटू कुलदीप यादवने बाद केले. डॅरिल ८ धावा काढून बाद झाला.

19:43 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: आठ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद ४०

IND vs NZ: आठ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद ४०

मार्क चॅपमन ३

डॅरिल मिशेल ५

19:35 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला तिसरा धक्का

दीपक हुड्डाने ग्लने फिलिप्सला ५ धावांवर बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला.

19:33 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: पावरप्लेच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ३३

पावरप्लेच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ३३

19:29 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले

वॉशिंग्टन सुंदरने टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले आहे. डेव्हॉन कॉनवे रिव्ह्यू घेतला पण त्याचा फायदा झाला नाही. न्यूझीलंडची धावसंख्या ४.४ षटकात २ बाद २८ अशी आहे. मार्क चॅपमन ० धावांवर क्रीजवरआहे.

19:24 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: युझवेंद्र चहल टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला

युझवेंद्र चहलने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. त्याचबरोबर तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ९१ विकेट्स घेतल्या आहे.

त्याने विकेट मेडन ओव्हर केली. न्यूझीलंडने ४ षटकात १ गडी बाद २१धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे १०आणि मार्क चॅपमन क्रीजवर.

19:17 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला पहिला धक्का

फिन एॅलन ११ धावांवर बाद झाला.

युझवेंद्र चहलला पहिली विकेट मिळाली.

19:14 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: तीन षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद २१

IND vs NZ: तीन षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद २१

फिन ऍलन ११

डेव्हॉन कॉनवे १०

19:10 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: फिन एॅलन जीवनदान

इशान किशनकडून फिन एॅलनचा झेल सुटला.

19:09 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: दोन षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंड धावसंख्या बिनबाद १०

दोन षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंड धावसंख्या बिनबाद १०

फिन ऍलन १

डेव्हॉन कॉनवे ९

19:05 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: पहिल्या षटकांत ६ धावा आल्या

पहिल्या षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद ६

फिन ऍलन १

डेव्हॉन कॉनवे ५

19:01 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: हार्दिक पांड्या पहिले षटक टाकत आहे

कर्णधार हार्दिक पांड्या पहिले षटक टाकण्यासाठी आला आहे.

न्यूझीलंडकडून फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे सलामीला आले आहेत

18:56 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: २०१६ पासून भारताने १० निर्णायक सामने जिंकलेत

२०१६ पासून भारताने निर्णायक १० सामने जिंकलेत

२०१६ पासून आतापर्यंत १३ निर्णायक सामने झाले आहेत. त्यापैकी १०मध्ये भारताने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर एका सामन्यात पराभव झाला आहे.

18:50 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघात कोणताही बदल नाही

न्यूझीलंड संघात कोणताही बदल केलेला नाही.

न्यूझीलंड संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

18:48 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: टीम इंडियात एक बदल

दुसऱ्या टी-२०सामन्यात टीम इंडियामध्ये एक बदल करण्यात आला आहे. स्टार वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या जागी फिरकीपटू युजवेंद्र चहलला संधी मिळाली. न्यूझीलंड संघात कोणताही बदल झालेला नाही.

भारतीय संघ: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग</p>

18:42 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: भारताच्या प्लेइ्ंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळाली संधी? पाहा

या खेळाडूंना मिळाली प्लेइ्ंग इलेव्हनमध्ये संधी

18:39 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा न्यूझीलंड संघाची प्लेइंग

पाहा न्यूझीलंड संघाची प्लेइंग

18:38 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; पाहा भारतीय संघाची प्लेइंग

भारतीय संघाची प्लेइंग

18:33 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:30 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: या मैदानावर भारतीय संघाने दोन सामने जिंकलेत

सलखनऊच्या मैदानावर भारतीय संघाने दोन सामने जिंकले आहेत. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि इशान किशन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.

18:24 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: मास्टरकार्ड क्रिकेट लाइव्ह शो अभिनेता कार्तिक आयर्नची उपस्थिती

स्टार स्पोर्ट्सच्या मास्टरकार्ड क्रिकेट लाइव्ह शोमध्ये अभिनेता कार्तिक आयर्न आला आहे.

18:16 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: दोन्ही संघ सामन्यापूर्वी सराव करत आहेत

दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड संघांतील खेळाडू सराव करत आहेत.

18:08 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: लखनऊ पिच रिपोर्ट

एकना क्रिकेट स्टेडियमच्या सपाट खेळपट्टीमुळे येथे फलंदाजांना खूप मदत मिळते. त्याचबरोबर दव असल्याने संघ प्रथम गोलंदाजी करण्यास पसंती देतात.

18:03 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: आज सूर्यकुमारच्या रडारवर असणार एबी डिव्हिलियर्सचा विक्रम

सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात केवळ ४४ डावात १६२५ धावा केल्या आहेत. यासह सूर्यकुमार टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत टॉप-५ मध्ये सामील झाला आहे. मात्र, जर सूर्यकुमारने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ४७ धावा केल्या, तर तो या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकेल.

एबी डिव्हिलियर्स १६७२ धावा

सूर्यकुमार यादव १६२५ धावां

17:51 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर (कर्णधआर), मायकेल ब्रेसवेल, जेकब डफी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

17:42 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: लखनऊमध्ये टॉस ठरणार बॉस?

या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा सामना जिंकणेही जवळपास निश्चित मानले जात आहे.

वास्तविक, या मैदानावर आतापर्यंत झालेल्या सर्व टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच विजय मिळवला आहे. या मैदानावर आतापर्यंत ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.

17:37 (IST) 29 Jan 2023
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड संघातील हेड टू हेड आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण २३ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १०, तर किवी संघाने १० सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत आहेत. दोन्ही संघ भारतात नऊ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील टीम इंडियाने पाचवेळा, तर न्यूझीलंडने चार सामने जिंकले. लखनऊच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच भिडणार आहेत.

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टी२० लाइव्ह अपडेट

India vs New Zealand 2nd T20 Highlights Match Score Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टी२० मॅच हायलाइट्स स्कोर अपडेट्स

IND vs NZ 2nd T20 Match Updates : भारत आणि न्यूझीलंड संघातील दुसरा टी-२० सामना लखनऊमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ६ गडी राखून विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.