India vs New Zealand 3rd T20I Highlights Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर १६८ धावांनी मात करताना ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम शुबमन गिलच्या (१२६*) शतकाच्या जोरावर २० षटकात ४ गडी गमावून २३४ धावा केल्या होत्या. त्याचबरोबर न्यूझीलंड २३५ धावांचे लक्ष्ये दिले होते. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १२.१ षटकांत ६६ धावांवर आटोपला. त्यामुळे भारतीय संघाने २-१ अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.

तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा १६८ धावांनी पराभव करताना एक मोठा विक्रम केला आहे. टीम इंडियाचा टी-२० इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्याने आयर्लंडचा १४८ धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा टी-२० इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी २०१० मध्ये पाकिस्तानने त्याचा १०३ धावांनी पराभव केला होता.

२३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ १२.१ षटकांत ६६ धावांवर सर्वबाद झाला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २५ चेंडूत ३५ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर कर्णधार मिचेल सँटनरने १३ धावांचे योगदान. या दोघां व्यतिरिक्त न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी या वेगवान गोलंदाजी त्रिकुटाने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. ज्यामुळे न्यूझीलंड संघाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडणे सेपे झाले.

Live Updates

India vs New Zealand 3rd T20

Highlights

Match Score Updates: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी टी२० हायलाइट्स अपडेट

22:12 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: भारताचा न्यूझीलंडवर १६८ धावांनी विजय; २-१ ने मालिका घातली खिशात

भारताचा न्यूझीलंडवर १६८ धावांनी विजय

२-१ ने मालिका घातली खिशात घातली.

22:09 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: टीम इंडिया विजयापासून अवघं एक पाऊल दूर

न्यूझीलंडचे नऊ गडी बाद

21:58 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: भारतीय संघ विजयापासून फक्त २ पावलं दूर; न्यूझीलंडला आठवा धक्का

१० षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या ८ बाद ५६

डॅरिल मिचेल २५ (१७)

ब्लेअर टिकनर १(१)

किवी संघ २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे, मात्र १० षटकात ५६ धावा केल्या आहेत. यावेळी डॅरिल मिचेल आणि ब्लेअर टिकनर क्रीजवर आहेत.

21:52 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: न्यूझीलंडला सातवा धक्का; शिवम मावीने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स

शिवम मावीने एकाच षटकात घेतल्या दोन विकेट्स.

21:49 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: न्यूझीलंडला सहावा धक्का; सूर्याने घेतला सँटनरचा अप्रतिम झेल

न्यूझीलंडला सहावा धक्का शिवम मावीने मिचेल सँटनरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

कर्णधार मिचेल सँटनर १३ धावा करुन बाद झाला.

21:45 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: आठ षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ४९

आठ षटकानंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ४९

डॅरिल मिचेल २३ (१५)

मिचेल सँटनर १३(१२)

किवी संघ २३५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे, मात्र ८ षटकात ५० धावाही पूर्ण झाल्या नाहीत. कारण संघाने ५ विकेट गमावल्या आहेत. यावेळी डॅरिल मिचेल आणि मिचेल सँटनर क्रीजवर आहेत.

21:32 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: पावरप्लेच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ३०

पावरप्लेच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद ३०

डॅरिल मिचेल १३ (८)

मिचेल सँटनर १(४)

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना अर्शदीप सिंग आणि उमरान मलिकने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर हार्दिक पांड्याने १ विकेट घेतली.

21:23 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला पाचवा धक्का

न्यूझीलंड संघाला पाचवा धक्का

मायकेल ब्रेसवेल ८ चेंडूत ८ धावा काढून बाद.

त्याला उमरान मलिकने बोल्ड केले.

21:21 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: चार षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद २१

चार षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद २१

डॅरिल मिशेल ६

मायकेल ब्रेसवेल 8

21:15 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: अवघ्या सात धावांवर न्यूझीलंडला चौथा धक्का

भारतीय गोलंदाजांनी जोरदार धुमाकूळ घातला आहे.

तीन षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ४ बाद १४

सूर्यकुमार यादवने २ शानदार झेल पकडले.

21:08 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: न्यूझीलंड तिसरा धक्का; मार्क चॅपमनला आपला भोपळाही फोडता आला नाही

डेव्हान कॉनवे पाठोपाठ मार्क चॅपमन बाद

मार्क चॅपमनला आपला भोपळाही फोडता आला नाही.

अर्शदीप सिंगने आपल्या एकाच षटकांत दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

21:03 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: न्यूझीलंड दुसरा धक्का

न्यूझीलंड दुसरा धक्का

फिन एॅलन पाठोपाठ डेव्हान कॉनवे झेलबाद.

21:00 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: न्यूझीलंड पहिला धक्का

सूर्याने पकडला फिन एॅलनचा अप्रतिम झेल.

फिन एॅलन ३ धावांवर बाद झाला.

20:51 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: शुबमन गिलचे शानदार शतक; टीम इंडियाचे न्यूझीलंडला २३५ धावांचे लक्ष्य

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या (६३ चेंडूत नाबाद १२६) झंझावाती शतकी खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर २३५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. भारताने २० षटकात ४ गडी गमावून २३४ धावा केल्या.

इशान किशनच्या रूपाने भारताला सुरुवातीचा पहिला धक्का बसला, मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी पॉवरप्लेमध्ये दमदार खेळ दाखवला. पॉवरप्लेमध्ये भारताने १ गडी गमावून ५८ धावा केल्या होत्या. राहुल त्रिपाठी ४४ (२२) धावांची धडाकेबाज खेळी खेळून बाद झाला. सूर्यानेही वेगवान खेळी खेळली. त्याच वेळी, शुबमन गिलने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले.

त्याचबरोबर त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. त्याने टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली. शुबमन गिलने सर्वाधिक नाबाद १२६ धावा केल्या. त्याने ६३ चेंडूंच्या खेळीत १२ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याचा स्ट्राइक रेट २००.०० होता. गिलच्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांनंतर आता टी-२० मध्येही शतक झळकावले आहेत.

20:44 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: शुबमन गिलचे शानदार शतक; टीम इंडियाचे न्यूझीलंडला २३५ धावांचे लक्ष्य

शुबमन गिल १२६ (६३)

दीपक हुड्डा २(२)

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २३४ धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर न्यूझीलंड संघासमोर २३५ धावांचे ठेवले आहे.

20:38 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: अहमदाबादमध्ये शुबमन गिलचे वादळ! शतकांची मालिका सुरुच, न्यूझीलंडला फोडला घाम

IND vs NZ 3rd T20I: अहमदाबादमध्ये शुबमन गिलचे वादळ! शतकांची मालिका सुरुच, न्यूझीलंडला फोडला घाम
20:36 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: भारतीय संघाला चौथा धक्का

हार्दिक पांड्या १७ चेंडूत ३० धावा करुन बाद झाला.

20:34 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध नोंदवली सर्वोच्च धावसंख्या

१९ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद २२८

शुबमन गिन १२३

हार्दिक पांड्या ३०

20:25 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: शुबमन गिलने झळकावले पहिले टी-२० शतक

शुबमन गिलने चेंडूचा ५४ सामना करताना १० चैकार आणि ५ षटकार लगावत आपले शतक पूर्ण केले.

१७.२ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद २०३

20:17 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: १६ षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद १७०

१६ षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद १७०

शुबमन गिल ८०

हार्दिक पांड्या १७

20:09 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: १४ षटकानंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ बाद १४४

शुबमन गिलचे या मैदानावरील सलग तिसरे अर्धशतक आहे.

शुबमन गिल ६१(४१)

हार्दिक पांड्या १०(५)

20:05 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: भारताला तिसरा धक्का बसला

भारताला १३व्या षटकात तिसरा धक्का बसला. ब्लेअर टिकनरच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला. त्याचा झेल मायकल ब्रेसवेलने घेतला. सूर्यकुमारने १३ चेंडूत २४ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर क्रीझवर आला आहे. ब्लेअर टिकनरच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला. त्याचा झेल मायकल ब्रेसवेलने घेतला. सूर्यकुमारने १३ चेंडूत २४ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार आणि दोन षटकार मारले. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर क्रीझवर आला आहे.

19:57 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: शुबमन गिलचे ३५ चेंडूत अर्धशतक

शुबमन गिलने ३५ चेंडूत ७ चौकाराच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले.

१२ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या २ बाद ११८

19:53 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: ११ षटकानंतर टीम इंडिया २ बाद ११२

११ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या २ बाद ११२

शुबमन गिल ४७ (३२)

सूर्यकुमार यादव १६ (९)

19:48 (IST) 1 Feb 2023
Women U19 WC: विश्वविजेत्या शफाली वर्माच्या संघाचा क्रिकेटच्या देवाकडून झाला गुणगौरव, अहमदाबादच्या स्टेडीयमवर रंगला कौतुक सोहळा

Women U19 WC: विश्वविजेत्या शफाली वर्माच्या संघाचा क्रिकेटच्या देवाकडून झाला गुणगौरव, अहमदाबादच्या स्टेडीयमवर रंगला कौतुक सोहळा
19:45 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: नऊ षटकानंतर टीम इंडिया २ बाद ९४

टीम इंडियाला दुसरा धक्का ९व्या षटकात बसला. २२चेंडूत ४४ धावा करून राहुल त्रिपाठी लेगस्पिनर ईश सोधीचा बळी ठरला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. षटक संपल्यानंतर धावसंख्या २ बाद ९४ धावा. शुबमन गिल ४० आणि सूर्यकुमार यादव ६ धावांवर खेळत आहेत.

19:42 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: भारतीय संघाला दुसरा धक्का;

राहुल त्रिपाठीचे फक्त ६ धावांनी हुकले अर्धशतक

राहुल त्रिपाठीने २२ चेंडूत ४४ धावांचे योगदान देऊन बाद झाला.

19:35 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: सात षटकानंतर टीम इंडिया १ बाद ६९

टीम इंडियाने एका विकेटवर ६९ धावा केल्या आहेत. शुभमन गिल ३८ आणि राहुल त्रिपाठी २७ धावा करून नाबाद आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारीही केली आहे.

19:30 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: पावरप्लेच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या १ बाद ५८

पावरप्लेच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या १ बाद ५८

शुबमन गिल ३४

राहुल त्रिपाठी २०

19:23 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: टीम इंडिया ४ षटकानंतर १ बाद ३०

राहुल त्रिपाठी ८ आणि शुबमन गिल १९ धावा करून क्रीझवर

टीम इंडियाने ४ षटकानंतर १ बाद ३० धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठी ८ आणि शुभमन गिल १९ धावा करून क्रीझवर. बेन लिस्टरच्या षटकात ७ धावा आल्या.

19:16 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: इशान सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी

इशान किशनने ३ चेंडूत एक धाव केली आणि ऑफस्पिनर मायकेल ब्रेसवेलकडे एलबीडब्ल्यू झाला. भारताला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात बसला. ३ षटकांनंतर १ गडी बाद २५ धावा. राहुल त्रिपाठी ७ आणि शुभमन गिल १५ धावांवर खेळत आहेत. टी-२० मालिकेत ईशान सपशेल अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याने ४ तर दुसऱ्या सामन्यात १९ धावा केल्या.

19:12 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: दोन षटकानंतर भारत १ बाद १४

दोन षटकानंतर भारतीय संघांची धावसंख्या १ बाद १४

19:09 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: भारतीय संघाला पहिला धक्का; इशान एक धाव काढून बाद

भारतीय संघाला पहिला धक्का

इशान एक धाव काढून बाद

19:06 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: इशान-शुबमनकडून भारतीय संघाच्या डावाला सुरुवात

पहिल्या षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या बिनबाद ६

इशान किशन १

शुबमन गिल ५

19:01 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: सचिन म्हणाला – तरुणांना प्रेरणा मिळेल

सचिन तेंडुलकर म्हणाला की महिला संघाच्या विजयाचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला तेव्हा मी १० वर्षांचा होतो. आता महिला संघाने प्रथमच अंडर-१९ T20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. यामुळे अनेक युवा महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. ट्रॉफी जिंकणाऱ्या संघाला बोर्डाने ५ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. तिसर्‍या टी-२० पूर्वी सर्व खेळाडूंचा बोर्डाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

18:54 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: १९ वर्षांखालील महिला संघाचा गौरव

१९ वर्षांखालील महिला संघाचा अहमदाबादमध्ये सत्कार करण्यात आला. १९ वर्षांखालील महिला संघाने दक्षिण आफ्रिकेत इंग्लंडचा पराभव करून टी-२० विश्वचषकावर कब्जा केला होता. या सत्कार समारंभात भारतरत्न आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि इतर अधिकारी उपस्थित होते. बीसीसीआयने १९ वर्षांखालील महिला संघाला ५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले.

18:49 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: लिस्टरचे आंतरराष्ट्रीय पदार्पण

न्यूझीलंडनेही संघात एक बदल केला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज बेन लिस्टरला संधी मिळाली आहे. जेकब डफीला वगळण्यात आले आहे.

संघाचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे आहे.

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मिचेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, ब्लेअर टिकनर.

18:46 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ : उमरान मलिकला मिळाली संधी

भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. युजवेंद्र चहलच्या जागी उमरान मलिक संधी मिळाली आहे.

भारतीय संघ – शुबमन गिल, ईशान किशन, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

18:42 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: आजच्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन

18:38 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: आजच्या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

18:34 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:30 (IST) 1 Feb 2023
Ind vs NZ: या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग करणे योग्य

खेळपट्टीच्या अहवालाबाबत, माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजेरकर ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले की येथे १७० धावा केल्या जाऊ शकतात. खेळपट्टी कठीण आहे. अशा स्थितीत खूप धावा केल्या जातील. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला लक्ष्याचा पाठलाग करायला आवडेल.

18:26 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: नाणेफेकीपूर्वी दोन्ही संघ मैदानावर सराव करत आहेत

नाणेफेकीपूर्वी दोन्ही संघ मैदानावर सराव करत आहेत

18:20 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी

टी-२० विश्वचषकानंतर हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाची कमान आली आहे. त्याने आतापर्यंत १० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली ७ टी-२० सामने जिंकले आहेत, तर २ सामन्यात पराभव झाला आहे. एक सामना बरोबरीत आहे. म्हणजेच पांड्याने कर्णधार म्हणून ७० टक्के सामने जिंकले आहेत.

18:15 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: ६ डावात १७० हून अधिक धावा केल्या आहेत

येथे आतापर्यंत ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान १२ पैकी ६ डावात १७० हून अधिक धावा केल्या आहेत. सर्वात मोठी धावसंख्या २२४ धावांची आहे. ही कामगिरी भारताने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती.

18:09 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: भारताने ६ पैकी ४ सामने जिंकले

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी भारतीय संघाने येथे आतापर्यंत ६ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यापैकी ४ सामने जिंकले आहेत, तर दोन सामने गमावले आहेत

18:02 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरील भारतीय संघांची कामगिरी

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर बोलायचे झाले तर टीम इंडियाने टी-२० मध्ये २ संघांना पराभूत केले आहे. त्यात इंग्लंड आणि पाकिस्तानचा समावेश आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध एक तर इंग्लंडविरुद्ध तीन सामने जिंकले आहेत. सूर्याने येथे पदार्पण केले होते. अशा परिस्थितीत त्यांना हा सामना संस्मरणीय बनवायचा आहे.

17:54 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: महिला विश्वविजेत्या संघाचा होणार भव्य सत्कार

भारतीय महिलाच्या अंडर-१९ विश्वचषकातील विजयी कामगिरी नंतर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. न्यूझीलंड सोबत सुरू असलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी२० आधी नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

17:50 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

भारत: शुबमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल/उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर.

17:35 (IST) 1 Feb 2023
IND vs NZ: निर्णयाक सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज

आजचा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या नावावर करेल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आज निर्णायक सामना (फोटो-ट्विटर)

India vs New Zealand 3rd T20I Highlights Updates: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर १६८ धावांनी मात करताना ऐतिहासिक विजय नोंदवला. त्यामुळे भारतीय संघाने २-१अशा फरकाने मालिका आपल्या नावावर केली.