India vs New Zealand 3rd T20 Live Cricket Score Updates in marathi: सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या वादळी खेळींच्या बळावर भारतीय संघाने न्यूझीलंडने दिलेलं १५४ धावांचं लक्ष्य १० षटकातच पूर्ण केलं. कर्णधार सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत ५७ तर अभिषेक शर्माने २० चेंडूत ६८ धावांची अविश्वनसीय खेळी साकारली. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Live Updates

India vs New Zealand 3rd T20 Highlights: भारत आणि न्यूझीलंड तिसऱ्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स 

21:48 (IST) 25 Jan 2026

सूर्यकुमार-अभिषेकची अद्भुत फटकेबाजी

सूर्यकुमार यादव (२६ चेंडूत ५७) आणि अभिषेक शर्मा (२० चेंडूत ६८) या दोघांच्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडने दिलेलं १५४ धावांचं लक्ष्य १० षटकातच गाठलं.

21:40 (IST) 25 Jan 2026

भारताने मालिका जिंकली

अफलातून सांघिक प्रदर्शनाच्या बळावर भारतीय संघाने गुवाहाटी इथे झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात न्यूझीलंडवर ८ विकेट्स आणि ६० चेंडू राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली.

21:39 (IST) 25 Jan 2026

भारतीय संघाचा दणदणीत विजय

सूर्यकुमार यादव आणि अभिषेक शर्मा यांच्या वादळी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने अवघ्या १० षटकात न्यूझीलंडने दिलेलं लक्ष्य गाठलं.

21:22 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: अभिषेक शर्माचं अर्धशतक

अभिषेक शर्माने अवघ्या १४ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं आहे. त्याने ५ चौकार व ४ षटकारांसह त्याने ५० धावांचा आकडा गाठला.

21:14 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: ईशान किशन झेलबाद

चौथ्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केल्यानंतर ईशान किशन त्याच षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. ईश सोधीने संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. यासह ४ षटकांत टीम इंडियाने २ बाद ६० धावा केल्या आहेत.

21:12 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: ३.१ षटकांत ५० धावा

ईशान किशन व अभिषेक शर्मा यांनी ३.१ षटकांत चौकार-षटकारांचा पाऊस पाडत अर्धशतक पूर्ण केलं. दोघांची अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली व संघालाही ५० धावांच्या पलीकडे नेलं.

20:58 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ: संजू सॅमसनचं नशीब खराब

संजू सॅमसन सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला आहे. तिसऱ्या सामन्यात तर सॅमसन गोल्डन डकवर क्लीन बोल्ड झाला आहे.

20:39 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: भारताला विजयासाठी मिळालं इतक्या धावांचं लक्ष्य

जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंड संघाला कमी धावांवर रोखलं आहे. न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ९ बाद १५३ धावा करू शकला. न्यूझीलंडकडून फिलिप्स ४८ धावा, चॅपमन ३२ धावा व सँटनर २७ धावा यांनी चांगली फलंदाजी केली. भारताकडून बुमराहने ४ षटकांत १७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय रवि बिश्नोई, हार्दिक पंड्या यांनी २-२ विकेट्स तर हर्षित राणाने १ विकेट घेतली. यासह भारताला विजयासाठी १५४ धावांचं लक्ष्य दिलं.

20:33 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: बुमराहच्या खात्यात तिसरी विकेट

२०वं षटक टाकण्यासाठी आलेल्या बुमराहने कर्णधार मिचेल सँटनरला झेलबाद करत तिसरी विकेट मिळवली आहे. यासह न्यूझीलंडने नववी विकेट गमावली.

20:27 (IST) 25 Jan 2026

बुमराहच्या खात्यात दोन विकेट

जसप्रीत बुमराहने १८व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जेमिसनला क्लीन बोल्ड करत सामन्यातील दुसरी विकेट घेतली. तर पाचव्या चेंडूवर एक धाव घेण्याच्या नादात मॅट हेन्री धावबाद झाला आहे.

20:26 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: रवी बिश्नोईच्या खात्यात दुसरी विकेट

रवी बिश्नोईने १६व्या षटकातील पहिल्या चेंडूवर फिलिप्सला झेलबाद करत संघाला अजून एक मोठी विकेट मिळवून दिली. फिलिप्स ४८ धावांवर झेलबाद झाल्याने त्याचं अर्धशतक हुकलं.

20:17 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ Live:डॅरिल मिचेल माघारी

हार्दिक पंड्याच्या १५व्या षटकात डॅरिल मिचेलला झेलबाद केलं. हार्दिकने व टीमने प्लॅन करत मिचेलची विकेट घेतली.

20:00 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ Live: रवी बिश्नोईची भेदक गोलंदाजी

रवी बिश्नोईने १२व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर मार्क चॅपमनला झेलबाद करत अर्धशतकी भागीदारी तोडली आहे. रवी बिश्नोई बऱ्याच काळानंतर संघात पुनरागमन करत उत्तम गोलंदाजी केली आहे. ३ पैकी एकाही षटकात बाऊंड्री दिलेली नाही.

19:57 (IST) 25 Jan 2026
IND vs NZ 3rd T20 Live: १० षटकांत न्यूझीलंडने किती धावा केल्या

मार्क चॅपमन व ग्लेन फिलिप्स यांनी संघाचा डाव सावरला आणि १० षटकांत संघाने ३ बाद ७५ धावा केल्या आहेत.

19:28 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ Live: बुमराहने सेफर्टला केलं क्लीन बोल्ड

जसप्रीत बुमराहने पॉवरप्लेचं अखेरचं षटक टाकण्यासाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर त्याने टीम सेफर्टला क्लीन बोल्ड केलं. सेफर्टला काही कळण्याआत तो बोल्ड झाला आणि स्टंप हवेत कोलांट्या खात उडाला. यासह न्यूझीलंडने तिसरी विकेट गमावली.

19:10 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: भारताच्या खात्यात दुसरी विकेट

हार्दिक पंड्याने दुसऱ्या षटकात चांगल्या फॉर्मात असलेल्या रचिन रवींद्रला झेलबाद करत माघारी पाठवलं. रवी बिश्नोईने सीमारेषेजवळ शानदार झेल टिपला.

19:05 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ Live: पहिल्याच षटकात भारताला मिळाली विकेट

हर्षित राणाने भारताकडून गोलंदाजीला सुरूवात करत पहिल्या षटकातील तिसऱ्याच चेंडूवर झेलबाद केल. हार्दिक पंड्याने कमालीची उडी मारत शानदार झेल टिपला. यासह हर्षित राणाने डेव्हॉन कॉन्वेला पाच वेळा बाद केलं आहे. तिन्ही वनडे सामने, दोन टी-२० सामन्यांमध्ये हर्षित राणासमोर कॉन्वे फार काळ टिकू शकला नाही.

18:53 (IST) 25 Jan 2026

भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची बातमी, रोहित शर्मा-हरमनप्रीत कौरला पद्मश्री पुरस्कार जाहीर

Padma Shri Award:भारतीय क्रिकेट संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. भारताचे दोन्ही वर्ल्डकप विजेत्या कर्णधारांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
18:40 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ Live: भारताची प्लेईंग इलेव्हन

संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह

अर्शदीप सिंग व वरूण चक्रवर्तीला विश्रांती देत बुमराह व रवी बिश्नोईला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

18:39 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन

डेव्हॉन कॉनवे, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, मॅट हेन्री, ईश सोधी, जेकब डफी

न्यूझीलंडने झॅक फॉल्क्सच्या जागी काईल जेमिसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केलं आहे.

18:38 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ Live: नाणेफेक

भारतीय संघाने तिसऱ्या टी-२० सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. तर न्यूझीलंडचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.

18:02 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ 3rd T20 Live: किती वाजता होणार नाणेफेक?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच ६.३० ला होईल. तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणते बदल होणार का, यावर सर्वांच्या नजरा आहेत.

18:00 (IST) 25 Jan 2026

IND vs NZ Live: आज तिसरा टी-२० सामना

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज खेळवला जात आहे. हा सामना गुवाहाटीमधील बारसपारा स्टेडियम होत आहे. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर आता सलग तिसरा टी-२० सामना जिंकत संघ मालिका आपल्या नावे करण्याच्या उद्देशाने उतरणार आहे.

India vs New Zealand 3rd T20 Highlights: