India vs New Zealand 5th T20 Highlights in Marathi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिका संपली असून भारताने ही मालिका 4-1 च्या फरकाने आपल्या नावे केली आहे. पाचव्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४६ धावांनी दारूण पराभव केला. इशान किशन शतकी खेळीनंतर या सामन्याचा सामनावीर ठरला. तर सूर्यकुमार यादव मालिकावीर ठरला.

Live Updates

India vs New Zealand 5th T20 Highlights: भारत आणि न्यूझीलंड पाचव्या टी-२० सामन्याचे हायलाईट्स

22:31 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: न्यूझीलंड ऑल आऊट

रिंकू सिंगने २०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ईश सोधीला झेलबाद केल्याने न्यूझीलंडचा संघ २२५ धावांवर सर्वबाद झाला. यासह भारताने हा सामना ४६ धावांनी जिंकला आहे.

22:18 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: अक्षर पटेलच्या खात्यात तिसरी विकेट

अक्षर पटेलने लॉकी फर्ग्युसनला क्लीन बोल्ड करत सामन्यातील तिसरी विकेट मिळवली.

22:13 (IST) 31 Jan 2026
IND vs NZ live: अर्शदीप सिंगने घेतल्या ५ विकेट्स

अर्शदीपने १६व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर काईल जेमिसनला क्लीन बोल्ड करत चौथी विकेट मिळवली. तर पाचव्या चेंडूवर त्याने डॅरिल मिचेलला क्लीन बोल्ड करत टी-२० इतिहासात पहिल्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

22:08 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: बुमराहच्या षटकात चौकार-षटकारांचा पाऊस

बुमराह १४वं षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या षटकात डॅरिल मिचेलने २ षटकार व १ चौकार लगावला. तर जेकब्सनेही एक चौकार लगावला. यासह बुमराहने या षटकात २२ धावा दिल्या. बुमराहच्या टी-२० कारकिर्दीतील हे महागडं षटक आहे.

22:06 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: बेव्हन जेकब्स क्लीन बोल्ड

वरूण चक्रवर्तीने १५व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बेव्हन जेकब्सला क्लीन बोल्ड करत संघाला सहावी विकेट मिळवून दिली. जेकब्सने बुमराहच्या षटकात चौकार लगावला होता आणि तो ७ धावा करत झेलबाद झाला.

21:54 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: अर्शदीपच्या एका षटकात दोन विकेट्स

अर्शदीप सिंगची आधीच्या षटकांमध्ये धुलाई झाल्यानंतर त्याने स्पेलमधील तिसऱ्या षटकात शानदार पुनरागमन केलं. १२व्या षटकात त्याने पहिल्या चेंडूवर रचिन रवींद्रला झेलबाद करत माघारी धाडलं. तर तिसऱ्या चेंडूवर त्याने सँटनरला झेलबाद करत संघाला अजून एक मोठी विकेट मिळवून दिली. यासह १२ षटकांत न्यूझीलंडने ५ बाद १३८ धावा केल्या आहेत.

21:46 (IST) 31 Jan 2026

धोकादायक ग्लेन फिलीप्स तंबूत

वादळी खेळीसाठी प्रसिद्ध ग्लेन फिलीप्स मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अक्षर पटेलनेच त्याला बाद केलं. रिंकू सिंहने चांगला झेल टिपला.

21:38 (IST) 31 Jan 2026

Ind vs New: अक्षर पटेलने संपुष्टात आणली फिनची फटकेबाजी

अक्षर पटेलच्या फिरकीने धडाकेबाज सलामीवीर फिन अ‍ॅलनची खेळी संपुष्टात आणली. त्याने ३८ चेंडूत ८० धावा केल्या.

21:23 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: फिन एलनचं अर्धशतक

फिन एलनने २३ चेंडूत अर्धशतक झळकावत भारताच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. एलनने २३ चेंडूत ७ चौकार व ३ षटकारांसह हे अर्धशतक पूर्ण केलं आहे. यासह न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्ये २ बाद ७८ धावा केल्या आहेत.

21:21 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: फिन एलनची फटकेबाजी

फिन एलनने अर्शदीपच्या षटकात २३ धावा कुटल्या आणि वादळी फटकेबाजीचा नमुना सादर केला. एलनच्या फटकेबाजीच्या बळावर न्यूझीलंडने ५ षटकांत २ बाद ६६ धावा केल्या आहेत.

20:59 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: पहिल्याच षटकात विकेट

भारताने दिलेल्या २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कऱण्यासाठी न्यूझीलंडचा संघ उतरला आहे. तर भारताकडून अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली. टीम सेफर्ट व फिन एलन यांनी पहिल्याच चेंडूपासून चौकाराने सुरूवात केली. पण अर्शदीपने अखेरच्या चेंडूवर सेफर्टला झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली.

20:42 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: भारताने उभारला धावांचा डोंगर

भारतीय संघाने वादळी फटकेबाजीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद २७१ धावा केल्या आहेत. भारताकडून इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यांनी वादळी फटकेबाजी केली. इशानने १०३ धावा, सूर्यकुमार ६३ धावा तर हार्दिकने १७ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. यासह न्यूझीलंडने भारताला विजयासाठी २० षटकांत विजयासाठी २७२ धावांचं आव्हान दिलं आहे.

20:40 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: हार्दिक पंड्या झेलबाद

हार्दिक पंड्या जेमिसनच्या २०व्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. हार्दिकने १७ चेंडूत १ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या.

20:30 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: इशान किशनचं शतक

इशान किशनने शानदार फटकेबाजी करत अवघ्या 42 चेंडूत शतक झळकावलं आहे. इशानचं हे टी-20 मधील पहिलं शतक आहे. पण पुढच्या षटकात तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

20:20 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: भारताच्या २०० धावा पूर्ण

भारतीय संघाने १६ षटकांत ४ विकेट्स गमावत २०० धावांचा पल्ला गाठला आहे. इशान किशन व हार्दिक पंड्याची जोडी मैदानावर आहे. इशान ९१ धावा तर हार्दिक ६ धावांवर खेळत आहे.

20:12 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: सूर्यादादा झेलबाद

सूर्यादादा मिचेल सँटनरच्या १५व्या षटकात मोठा फटका खेळण्यासाठी स्टेप आऊट करत पुढे गेला, पण स्टंपिंग होत माघारी परतला. यासह ईशान-सूर्याची १३७ धावांची भागीदारी तुटली. सूर्यकुमार ३० चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांसह ६३ धावा करत बाद झाला.

20:08 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: सूर्यादादाचं अर्धशतक

ईशान किशननंतर सूर्यकुमार यादवने सलग दोन षटकार खेचत २६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. सूर्याने ४ चौकार ४ षटकारांसह अर्धशतकाचा आकडा गाठला. यासह भारताने १४ षटकांत २ बाद १७८ धावा केल्या आहेत.

19:57 (IST) 31 Jan 2026
IND vs NZ live: ईशानने ईश सोधीची केली धुलाई

ईशान किशनने २ षटकार व ४ चौकारांसह ईश सोधीच्या षटकात त्याची धुलाई केली. पहिला चेंडू वाईड टाकल्यानंतर सोधीच्या सलग तीन चेंडूंवर त्याने चौकार लगावला. चौथ्या, सहाव्या चेंडूवर षटकार तर पाचव्या चेंडूवरही चौकार लगावला. यासह त्याने २९ धावा कुटल्या. यासह सूर्या व ईशानने शतकी भागीदारी रचली आहे.

19:55 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ live: ईशान किशनचं अर्धशतक

ईशान किशनने न्यूझीलंडविरूद्ध पाचव्या टी-२० सामन्यात शानदार अर्धशतक केलं आहे. ईशानने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत २८ चेंडूत ३ चौकार ४ षटकारांसह अर्धशतक झळकावलं.

19:49 (IST) 31 Jan 2026

IND v NZ live: अर्धशतकी भागीदारी

भारताने १० षटकांत १०० धावांचा आकडा गाठला आहे. यासह सूर्या व इशान यांनी चौकार-षटकारांच्या मदतीने अर्धशतकी भागीदारी रचली आहे.

19:29 (IST) 31 Jan 2026

IND v NZ live: पॉवरप्ले

भारतीय संघाने पॉवरप्लेमध्ये २ विकेट्स गमावत ५४ धावा केल्या आहेत. भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले असून सूर्यकुमार यादव व इशान किशनची जोडी मैदानावर आहे.

19:26 (IST) 31 Jan 2026

IND v NZ live: अभिषेक शर्मा आऊट

लॉकी फर्ग्युसनने त्याच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात अभिषेक शर्माच्या रूपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. फर्ग्युसनने पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कमालीच्या चेंडूवर अभिषेकला क्लीन बोल्ड केलं आहे. अभिषेक १६ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ३० धावा करत बाद झाला.

19:15 (IST) 31 Jan 2026

IND v NZ live: भारताला पहिला धक्का

संजू सॅमसनच्या घरच्या मैदानावर म्हणजेच तिरूवनंतपुरममध्ये हा सामना खेळवला जात आहे. त्यामुळे संजूला सपोर्ट करण्यासाठी मोठा चाहतावर्ग स्टेडियममध्ये उपस्थित होता. पण एका चौकारासह ६ धावा करत संजू सॅमसन झेलबाद झाला. लॉकी फर्ग्युसनने तिसऱ्या षटकात भारताला पहिला धक्का दिला. यासह टीम इंडियाने ३ षटकांत १ बाद ३१ धावा केल्या.

19:10 (IST) 31 Jan 2026

IND v NZ live: पहिल्या षटकात अभिषेकने केल्या इतक्या धावा

पहिल्या षटकातील सुरूवातीचे दोन्ही बॉल निर्धाव राहिले. यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने दणदणीत षटकार लगावला. तर अखेरच्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावत १४ धावा कुटल्या. तर दुसऱ्या षटकात चौकार लगावत संजू सॅमसनने खातं उघडलं.

19:08 (IST) 31 Jan 2026
IND v NZ live: सामन्याला सुरूवात

भारत आणि न्यूझीलंड पाचव्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली असून भारताकडून अभिषेक शर्मा व संजू सॅमसनची जोडी उतरली आहे. तर जेकब डफीने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

18:39 (IST) 31 Jan 2026

India new zealand live: न्यूझीलंड प्लेईंग इलेव्हन:

टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), फिन ऍलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, बेव्हॉन जेकब्स, मिचेल सँटनर (कर्णधार), काइल जेमिसन, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी

18:37 (IST) 31 Jan 2026

IND vs NZ Live: भारत प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह</p>

18:33 (IST) 31 Jan 2026
IND vs NZ: नाणेफेक

भारत आणि न्यूझीलंड अखेरच्या टी-20 सामन्याची नाणेफेक भारताने जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतला आहे. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ बदल झाले असून इशान किशन, अक्षर पटेल खेळणार आहेत. तर न्यूझीलंडच्या संघात कॉन्वेच्या जागी फिन एलन, फर्ग्युसन, जिमी नीशम खेळताना दिसतील.

India vs New Zealand 5th T20 Highlights: भारताचा संघ न्यूझीलंडविरूद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा टी-२० सामना आज खेळवला गेला, ज्यात भारताने 46 धावांनी दणदणीत विजय नोंदवला.