India won T20 World Cup by 96 Runs against New Zealand: टी-२० विश्वचषक २०२६ चा विश्वविजेता संघ भारतीय संघ ठरला आहे. भारताने न्यूझीलंड संघाचा ९६ धावांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २५५ धावा केल्या आणि स्पर्धेच्या फायनलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भारताचा विजय सोपा केला.
India vs New Zealand Live, T20 World Cup 2026 Final Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
टी-२० विश्वचषक ट्रॉफी स्वीकारल्यानंतर संघाचा जल्लोष
भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांची विजयानंतर प्रतिक्रिया
india world champion: पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारताच्या विजयानंतर पोस्ट
IND vs NZ Live: भारताच्या विजयानंतर अमित शाह यांची प्रतिक्रिया
IND vs NZ Live: टीम इंडियाचे खेळाडू
जसप्रीत बुमराहने अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. तर संजू सॅमसन हा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट ठरला. सलग तीन सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केल्या आणि भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
अभिषेक शर्माने १९व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर संघाला १०वी विकेट मिळवून दिली आणि यासह भारताने ९६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला आहे. यासह घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत पहिला संघ ठरला आहे.
अर्शदीपचा चेंडू लागताच मिचेल संतापला अन् अंगावर आला धावून, कॅप्टन सूर्याच्या कृतीने मात्र जिंकली मनं; VIDEO मध्ये पाहा काय घडलं?
IND vs NZ Live: बुमराहने घेतली नववी विकेट
जसप्रीत बुमराहने १८व्या षटकात मिचेल सँटनरला क्लीन बोल्ड करत संघाला नववी विकेट मिळवून दिली. यासह आता भारत ऐतिहासिक विजयापासून काही क्षण दूर आहे.
IND vs NZ Live: नीशम क्लीन बोल्ड
बुमराह १६वं षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने या षटकात स्लोअर चेंडूवर जिमी नीशमला क्लीन बोल्ड केलं. यासह संघाला सातवी विकेट मिळाली. यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने मॅट हेन्रीला क्लीन बोल्ड करत सलग दुसरी विकेट मिळाली. या दोन विकेटसह ऐतिहासिक विजयाच्या दिशेने भारताने अजून एक पाऊल टाकलं आहे.
कॅच ऑफ द फायनल मॅच! इशान किशनने पुढे डाईव्ह मारत टिपला अनपेक्षित झेल; सगळेच झाले अवाक्; VIDEO व्हायरल
IND vs NZ Live: अक्षर पटेलच्या खात्यात तिसरी विकेट
अक्षर पटेलने १३व्या षटकात डॅरिल मिचेलला झेलबाद करत संघाला अजून एक महत्त्वाची विकेट मिळवून दिली आहे. यासह १३ षटकांत न्यूझीलंड संघाने १२८ धावा करत ६ विकेट्स घेतल्या आहेत.
वरूण चक्रवर्तीच्या स्पेलमधील पहिल्या षटकात दोन षटकार लगावले. पण वरूणने स्पेलमधील दुसऱ्या षटकात त्याने टीम सेफर्टला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. यासह न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.
IND vs NZ Live: चॅपमन क्लीन बोल्ड
हार्दिक पंड्याचं पहिलं षटक खूप महागडं ठरलं. त्यानंतर स्पेलमधील दुसऱ्या षटकात त्याने जबरदस्त कमबॅक केलं. हार्दिकने चॅपमनला क्लीन बोल्ड करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली.
IND vs NZ Live: टीम सेफर्टचं अर्धशतक
टीम सेफर्टने अंतिम सामन्यात २३ चेंडूत २ चौकार व ५ षटकारांसह अर्धशतक झळकावलं आहे. यासह ७ षटकांत न्यूझीलंड संघाने ३ बाद ६८ धावा केल्या.
IND vs NZ Live: पॉवरप्ले
पॉवरप्लेमधील अखेरचं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं, ज्याने फक्त ५ धावा दिल्या आणि टीम सेफर्टची एक कॅच ड्रॉप झाली. यासह न्यूझीलंड संघाने पॉवरप्लेमध्ये २ बाद ५२ धावा केल्या आहेत.
IND vs NZ Live: ग्लेन फिलिप्स क्लीन बोल्ड
पाचव्या षटकात अक्षर पटेलने ग्लेन फिलिप्सला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली आहे. यासह न्यूझीलंड संघाने ४७ धावांत ३ विकेट्स गमावल्या आहेत.
IND vs NZ Live: जस्सीच्या खात्यात पहिली विकेट
जसप्रीत बुमराह चौथं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या कमालीच्या चेंडूवर रचिनच्या बॅटची कड घेत चेंडू हवेत उंच उडाला. इशान किशनने समोरच्या दिशेला डाईव्ह मारत हा झेल टिपला. .
IND vs NZ Live: भारताच्या खात्यात पहिलं यश
अक्षर पटेलला फिन एलनसमोर तिसरं षटक टाकण्यासाठी पाचारण केलं आणि अक्षरने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. अक्षरच्या चेंडूवर फिन मोठा फटका खेळायला आणि फसला, तिलकने सोपा झेल टिपत संघाला पहिला विकेट मिळवून दिली. सेमीफायनलमध्ये शतक करणारा एलन ९ धावा करत माघारी परतला.
IND vs NZ Live: हार्दिकच्या षटकात सेफर्टची फटकेबाजी
हार्दिक पंड्या दुसरं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकात टीम सेफर्टने सलग दोन षटकार लगावले आणि सलग दोन चौकार लगावले आणि दुसऱ्या षटकात 21 धावा कुटल्या.
IND vs NZ Live: शिवम दुबेने झेल सोडला
अर्शदीपच्या पहिल्या षटकात फिन एलनने मोठा फटका खेळला आणि चेंडू हवेत उंच उडाला. पण चेंडू खूप वर गेल्याने शिवम दुबे चेंडू नीट टाईम करू शकला नाही आणि झेल सुटला. हा संघासाठी मोठा धक्का असू शकतो. यासह पहिल्या षटकात न्यूझीलंडने ४ धावा केल्या.
भारताने दिलेल्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंड संघाची विक्रमी सलामी जोडी फिन एलन व टीम सेफर्ट उतरले आहेत. तर भारताकडून अर्शदीपने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. न्यूझीलंड संघाला जेतेपद पटकावण्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड रनचेस करावा लागेल, टी-२० विश्वचषक फायनलमध्ये इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कोणत्याच संघाने केलेला नाही.
न्यूझीलंड संघाला सामन्यात परत आणलेल्या जिमी नीशमच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. शिवम दुबेने या षटकात २ षटकार व ३ चौकार लगावत २४ धावा कुटल्या आणि टीम इंडियाने २५० धावांचा टप्पा पार केला. भारताने अंतिम सामन्यात फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २५५ धावा केल्या आहेत. यासह टीम इंडियाने टी-२० विश्वचषकाच्या फायनलमधील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. तर पहिल्यांदाच विश्वचषकात सुरूवातीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्या. यासह टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला जेतेपद पटकावण्यासाठी तब्बल २५६ धावांचं आव्हान दिलं आहे.
१९व्या षटकात मॅट हेन्री गोलंदाजीला आला. पहिल्याच चेंडूवर हार्दिकने षटकार खेचला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हार्दिक झेलबाद झाला. यासह भारताने २२६ धावा केल्या आहेत. अजून सामन्यात १० चेंडू शिल्लक आहेत. यासह १९व्या षटकात ११ धावा केल्या.
IND vs NZ Live: भारताच्या धावांना ब्रेक
१५व्या षटकानंतर पुढच्या दोन षटकांमध्ये संघाने फक्त ९ धावा केल्या आहेत. त्यामुळे भारताच्या धावांन ब्रेक लागला आहे. सलग तीन विकेट्स गेल्याने संघाच्या धावांची गती कमी झाली. जिमी नीशमने कमालीची फलंदाजी केली आहे. यासह १६व्या षटकात १ धाव, १७व्या षटकात ७ धावा आणि १८व्या षटकात ९ धावा केल्या आहेत. यासह संघाने १८ षटकांत ४ बाद २२० धावा केल्या आहेत.
IND vs NZ Live: दोन चेंडूत दोन विकेट
इशान किशन १५व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तर सहाव्या चेंडूवर सूर्यकुमार यादव स्कूप शॉट खेळताना झेलबाद झाला. रचिन रवींद्र कमालीचा झेल टिपला. यासह १६ षटकांत भारताने ४ बाद २०४ धावा केल्या आहेत.
संजू सॅमसनचं सलग तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकातील अर्धशतक हुकलं आहे. संजू १६व्या षटकात जिमी नीशमच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ झेलबाद झाला. संजू ४६ चेंडूत ५ चौकार ८ षटकारांसह ८९ धावा करत बाद झाला.
IND vs NZ Live: इशान किशनचं अर्धशतक
इशान किशनने अंतिम सामन्यात वादळी फटकेबाजी करत २३ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केलं.
भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी करत टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये १५ षटकांत २०० अधिक धावा केल्या आहेत. इशानने षटकातील अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत २०३ धावा केल्या. इशान ५४ धावा तर संजू ८९ धावांवर खेळत आहे.
IND vs NZ Live: १४ षटकांत किती धावा?
संजू सॅमसन व इशान किशनच्या जोडीने संघाचा डाव सावरत ९३ धावांची भागीदारी रचली आहे. संजू ८८ धावा तर इशान ४३ धावांवर खेळत आहे. यासह भारताने १४ षटकांत १ बाद १९१ धावा केल्या आहेत.
Sanju Samson Fifty: संजू सॅमसनचं अर्धशतक
संजू सॅमसनने ३३ चेंडूत ३ षटकार ४ चौकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे संजू सॅमसनचं सलग तिसरं अर्धशतक आहे. यासह भारताने ११ षटकांत १ बाद १३७ धावा केल्या आहेत.

India vs New Zealand Live, ICC Men’s T20 World Cup 2026 Final Live: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना आज खेळवला जात आहे, या सामन्याचे लाईव्ह अपडेट्स.....
