Team India Squad, India vs New Zealand: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघ ५ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या मालिकेसाठी भारतीय खेळाडू न्यूझीलंडमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान मालिका सुरू होण्याआधीच भारतीय सुरूवातीच्या ३ वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात मोठे बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज आकिब नबीला मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. पण आता वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे बाहेर झाल्याने सुरूवातीच्या ३ सामन्यांसाठीही आकिब नबीला संघात स्थान देण्यात आलं आहे.

बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करून आकिब नबीचा वनडे संघात समावेश करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे. बीसीसीआयने ५ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी दोन वेगवेगळ्या संघांची घोषणा केली होती. सुरूवातीच्या ३ वनडे सामन्यांसाठी वेगळा आणि शेवटच्या २ वनडे सामन्यांसाठी वेगळ्या संघाची घोषणा करण्यात आली होती. आकिब नबीला चौथ्या आणि पाचव्या सामन्यासाठी संघात स्थान दिलं गेलं होतं. पण आता तो पाचही सामन्यात खेळताना दिसून येणार आहे.

प्रसिध कृष्णा दुखापतीमुळे बाहेर

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या वनडे मालिकेदरम्यान प्रसिध कृष्णा दुखापतग्रस्त झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीही त्याला संघात स्थान देण्यात आलं होतं. पण त्याचं खेळणं हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून होतं. पण तो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. यासह नितीश रेड्डी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळताना दिसून येणार आहे. त्यानंतर तो कसोटी मालिकेसाठी सराव करताना दिसेल.

पहिल्या ३ वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, आकिब नबी आणि कुलदीप यादव.

चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव