न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध तीन टी २० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. टी २० संघाचं नेतृत्व रोहित शर्मा, तर पहिल्या कसोटी सामन्याचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे देण्यात आलं आहे. तर दुसरा कसोटी सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली होणार आहे. दुसरा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये असणार आहे. या सामन्यासाठी १०० टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

“हो, सरकारने एमसीएला वानखेडेवरील दुसऱ्या कसोटीसाठी १०० टक्के क्षमतेची परवानगी दिली आहे. खेळाडूंना मालिकेसाठी सज्ज होण्याची योग्य संधी देण्यासाठी आम्ही सोमवारपासून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये तयारी शिबिराचे आयोजन करणार आहोत.”, असं एमसीएच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. पहिला कसोटी सामना २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमध्ये होणार आहे. दुसरा कसोटी सामना ३ डिसेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमध्ये होणार आहे. दोन कसोटी सामन्याची मालिका वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असणार आहे.

T20 WC : टीम इंडियाच्या खराब कामगिरीनंतर ICCचे उघडले डोळे; उचलणार ‘मोठं’ पाऊल!

न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:

अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशात शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

कसोटी सामने

  • पहिला कसोटी सामना- २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर, कानपूर
  • दुसरा कसोटी सामना- ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर, मुंबई