India vs Pakistan, Asian Games 2026 Highlights: आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघानंतर भारताच्या पुरूष क्रिकेट संघानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा १९ धावांनी पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावलं. भारताकडून अभिषेक शर्मा व तिलक वर्मा यांनी अर्धशतकी खेळी केल्या. तर गोलंदाजीत अक्षर पटले, वॉशिंग्टन सुंदर व शिवम दुबे यांनी प्रत्येक २ विकेट्स घेतल्या.
India vs Pakistan Highlights: भारत आणि पाकिस्तान सामन्याचे Highlights
Ind vs Pak Live: भारतीय संघाचा विजय
या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला १९२ धावांपर्यंत मजल मारता आली.
IND vs PAK: पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत परतला असून, भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
पाकिस्तानचा चौथा फलंदाज तंबूत परतला आहे. जिंकण्यासाठी अजूनही ८३ धावांची गरज आहे.
IND vs PAK Live: पाकिस्तानचं दमदार पुनरागमन! विजयासाठी इतक्या धावांची गरज
२१२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानला देखील विजयाची संधी आहे. ४० चेंडूत ९४ धावा करायच्या आहेत.
Ind vs pak live: पाकिस्तानच्या १०० धावा पूर्ण
२१२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने १३ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे.
१० षटकांचा खेळ पूर्ण
या डावातील १० षटकांचा खेळ पूर्ण झाला असून पाकिस्तानने ३ गडी बाद ७६ धावा केल्या आहेत.
IND vs PAK Live: वॉशिंग्टन सुंदरचा भन्नाट कॅच! पाकिस्तानचा तिसरा फलंदाज तंबूत
पाकिस्तानला तिसरा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदरने घेतलेल्या भन्नाट कॅचमुळे सदाकत अवघ्या २३ धावांवर माघारी परतला आहे.
IND vs PAK Live: उस्मान खान परतला माघारी
पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आहे. उस्मान खान अवघ्या १० धावांवर माघारी परतला आहे.
IND vs PAK Live: भारतीय संघाची दमदार सुरूवात
भारतीय संघाने दमदार सुरूवात केली आहे. कर्णधार साहिबजादा फरहान अवघ्या १० धावा करून माघारी परतला आहे.
IND vs PAK: अभिषेक शर्माची वेगवान सुरूवात, तिलक वर्माचा दमदार शेवट; भारताने पाकिस्तानसमोर ठेवलं इतक्या धावांचं आव्हान
या डावात अभिषेक शर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्माने शेवटी फलंदाजी करताना नाबाद अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर २११ धावा केल्या आहेत. पाकिस्तानला जिंकण्यासाठी २१२ धावांचं आव्हान दिलं आहे.
IND vs PAK Live: शिवम दुबे- तिलक वर्माची तुफान फटकेबाजी!
शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी मिळून भारतीय संघाला दमदार पुनरागमन करून दिलं आहे. भारतीय संघ २०० धावांच्या जवळ पोहोचला आहे.
IND vs PAK Live: भारताचा निम्मा संघ तंबूत! कर्णधार श्रेयस अय्यर स्वस्तात परतला माघारी
भारतीय संघाला पाचवा धक्का बसला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर २१ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs PAK Live: इशान किशन परतला माघारी
भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. इशान किशन २० धावा करून माघारी परतला आहे.
इशान - श्रेयसची जोडी जमली! टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल
भारतीय संघाला चांगली सुरूवात मिळाली होती. पण अभिषेक शर्मा बाद झाल्याने धावसंख्या मंदावली. त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यरने मिळून संघाची धावसंख्या १२८ वर पोहोचवली आहे.
IND vs PAK Live: भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का! अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्मा परतला माघारी
अभिषेक शर्माने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. पण तो ६१ धावांवर माघारी परतला आहे.
IND vs PAK Live: फायनलमध्ये अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी! अवघ्या इतक्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक
फायनलमध्ये अभिषेक शर्माच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने अवघ्या २० चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs PAK Live: भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का! संजू सॅमसन परतला माघारी
भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का! संजू सॅमसन अवघ्या २ धावा करून माघारी परतला आहे.
IND vs PAK Live: अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी! टीम इंडियाच्या ५० धावा पूर्ण
अभिषेक शर्माने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली आहे. भारतीय संघाने ३.२ षटकात ५० धावांचा पल्ला गाठला आहे.
IND vs PAK Live: नको तो फटका मारण्याच्या प्रयत्नात वैभव सूर्यवंशी परतला माघारी
भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. वैभव सूर्यवंशी नको तो फटका मारण्याच्या प्रयत्नात १५ धावांवर माघारी परतला आहे.
IND vs PAK Live: सामन्याला सुरूवात
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामन्याला सुरूवात झाली आहे. वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात उतरली आहे.
IND vs PAK Live: भारतीय संघाचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
[caption id="attachment_6144745" align="alignnone" width="670"]
India vs Pakistan: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पाकिस्तानला नमवत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
