India vs Pakistan Asian Games Cricket Final match schedule: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पुरूषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना होणार आहे. भारताने श्रीलंकेचा १२५ धावांनी मोठा पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर पाकिस्तान संघाने बांगलादेशचा पराभव करत सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी धडक मारली. आता या दोन्ही संघांमधील सामना कधी कुठे आणि किती वाजता होणार, जाणून घ्या.

भारताने दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात श्रीलंकेचा धावांनी मोठा पराभव केला. यासह टीम इंडियाने पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. वैभव सूर्यवंशी ३८ तर इशान किशनच्या उत्कृष्ट ८० धावांच्या खेळीच्या बळावर संघाने अवघड खेळपट्टीवर १६९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ फक्त धावा करू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराह व अक्षर पटेल यांनी पॉवरप्लेमध्येच श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत धाडला. त्यानंतर रनआऊट व इतर गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव आटोपला.

तर पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेश संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच सुवर्णपदकाचा सामना खेळणार आहे. पावसामुळे पाकिस्तान व बांगलादेश यांच्यात १३ षटकांचा सामना खेळवला गेला. तौहिद हृदयच्या ४२ धावांच्या खेळीसह १११ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने फलंदाजांच्या चांगल्या खेळींच्या बळावर ११.३ षटकांत ११२ धावा करत सहज विजय मिळवला. यासह आता पाकिस्तान आणि भारत यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

भारत-पाकिस्तान गोल्ड मेडल मॅच किती वाजता सुरू होणार?

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरूषांच्या क्रिकेटमधील अंतिम सामना हा भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना ३ ऑक्टोबर शनिवारी खेळवला जाईल. कोरोगी स्पोर्ट्स पोर्क निशिन या ठिकाणीच हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता खेळवला जाईल. तर सामन्याची नाणेफेक सकाळी ९.३० वाजता होईल. तर या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स या स्पोर्ट्स चॅनेलवर तर सोनी लिव्ह या मोबाईल अॅपवर पाहता येणार आहे. तर श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कांस्यपदकाचा सामना ३ ऑक्टोबरला सकाळी ५.३० वाजता खेळवला जाणार आहे.