INDW vs PAKW Womens Asia Cup 2026: महिला आशिया चषक २०२६ मधील सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाला भारताने अवघ्या ५५ धावांवर सर्वबाद केलं. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना मैदानावर टिकण्याची संधीच दिली नाही. तर प्रत्युत्तरात टीम इंडियाने ५२ चेंडूत ५६ धावांचं आव्हान पूर्ण करत सहज विजय नोंदवला.

Live Updates

India vs Pakistan Live Score womens asia cup 2026:  भारत-पाकिस्तान आशिया चषक सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

22:28 (IST) 5 Sep 2026

भारताच्या लेकींची आशिया कपमध्ये दबदबा! पाकिस्तानचा अवघ्या ५२ चेंडूंत केला लाजिरवाणा पराभव; फिरकीपटूंनी आस्मान दाखवलं

IND vs PAK: भारताने पाकिस्तानस संघावर दणदणीत विजय मिळवला. हरमनप्रीत कौरने विजयी षटकार लगावत विजयावर शिक्कामोर्तब केला. ...सविस्तर वाचा
21:54 (IST) 5 Sep 2026

India Pakistan Asia Cup Live: भारताला तिसरा मोठा धक्का

फातिमा सनाने चौथ्या षटकात स्मृती मानधनाला पायचीत करत भारताला तिसरा मोठा धक्का दिला. महिलांच्या आशिया चषकात रिव्ह्यूची व्यवस्था नसल्याने पंचांच्या निर्णयाला संघाला आव्हान देता आलं नाही.

21:45 (IST) 5 Sep 2026

INDW vs PAKW Live: भारताला एका षटकात दोन धक्के

भारतीय संघाने पहिल्या षटकात चांगली सुरूवात केल्यानंतर दुसऱ्या षटकात संघाला दोन धक्के बसले. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाच्या गोलंदाजीवर शफाली वर्मा आणि नंतर प्रतिका रावल झेलबाद झाले.

21:44 (IST) 5 Sep 2026

INDW vs PAKW Live: शफाली वर्मा झेलबाद

फातिमा सनाने दुसऱ्या षटकात शफाली वर्माला झेलबाद केलं. फातिमाच्या चेंडूवर सरळ फटका खेळताना तिच्याकडूनच झेलबाद झाली. फातिमाने झेलबाद केल्यानंतर शफाली वर्माला मैदानाबाहेर जाण्याचा इशारा केला.

21:41 (IST) 5 Sep 2026

India Pakistan Asia Cup Live: पहिल्याच चेंडूवर षटकारासह सुरूवात

पाकिस्तानने दिलेल्या ५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शफाली वर्माने पहिल्या चेंडूवर षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली आहे. स्मृती मानधनासह तिने पहिल्या षटकात ९ धावा केल्या.

21:23 (IST) 5 Sep 2026

INDW vs PAKW Live: पाकिस्तान ऑल आऊट

दीप्ती शर्माच्या १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रिचा घोषने कमालीचा स्टंपिंग करत पाकिस्तान संघाला ऑलआऊट केलं. पाकिस्तानचा संघ फक्त ५४ धावा करत सर्वबाद झाला. पाकिस्तान महिला संघाची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली. श्रीचरणी व प्रेमा रावत यांनी ३-३ विकेट्स घेतल्या, तर दीप्ती शर्माने २ आणि शफाली वर्माने १ विकेट घेतली.

21:16 (IST) 5 Sep 2026

India vs Pakistan Live: पाकिस्तानने गमावली नववी विकेट

१५व्या षटकात प्रेमा रावतने उम्म-ए-हानीला झेलबाद करत संघाला नववी विकेट मिळवून दिली. प्रेमा रावतच्या या विकेटसह पाकिस्तानने ५४ धावांवर ९ विकेट्स गमावल्या आहेत.

21:14 (IST) 5 Sep 2026
INDW vs PAKW Live: दीप्तीने केला कमालीचा रनआऊट

दीप्ती शर्माने १४व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एमान फातिमा धावबाद झाली. दीप्तीच्या हातातून चेंडू निसटला पण तरीही तिने चेंडूवर नजर ठेवत अखेरीस तिला धावबाद केलं.

20:46 (IST) 5 Sep 2026

India vs Pakistan Live: पाकिस्तानची कर्णधार दीप्ती शर्माची शिकार

दीप्ती शर्माने १०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनाला पायचीत करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. यासह पाकिस्तानची अखेरची आशा असलेली महत्त्वाची खेळाडू माघारी परतली. यासह १० षटकांत पाकिस्तानने ६ विकेट्स गमावत ३६ धावा केल्या आहेत.

20:44 (IST) 5 Sep 2026

INDW vs PAKW Live: प्रेमा रावतचा भेदक चेंडू

प्रेमा रावतने नवव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शदाफ शम्सला क्लीन बोल्ड करत पाचवी विकेट मिळवून दिली. यासह पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी परतला.

20:42 (IST) 5 Sep 2026

India vs Pakistan Live: श्री चरणीच्या खात्यात तिसरी विकेट

श्री चरणीने आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आयेशा जफरला झेलबाद करत तिसरी विकेट घेतली. यासह ८ षटकांत पाकिस्तानने ३२ धावा करत ४ विकेट्स गमावल्या.

20:31 (IST) 5 Sep 2026

INDW vs PAKW Live: श्री चरणीच्या एका षटकात दोन विकेट्स

श्री चरणीने सहाव्या षटकात दोन विकेट्स घेत पाकिस्तानला लागोपाठ धक्के दिले. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर गुल फिरोजा शून्यावर झेलबाद झाली. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर श्री चरणीने सलामीवीर झुल्फिकारला पायचीत करत झेलबाद केलं. यासह पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावत २९ धावा केल्या.

20:27 (IST) 5 Sep 2026
India vs Pakistan Live: शफालीने मिळवून दिला ब्रेकथ्रू

दोन वेळा विकेट्सची संधी हुकल्यानंतर हरमनने शफालीला चेंडू सोपवला आणि तिने पहिल्याच षटकात संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. शफालीच्या दुसऱ्या चेंडूवरही झेल टिपता आला नाही. यानंतर तिने मुनीबा अलीला क्लीन बोल्ड करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली.

https://twitter.com/GautamA53167895/status/2096251261179846998

20:16 (IST) 5 Sep 2026
INDW vs PAKW Live: पहिली विकेट हुकली

नंदनी शर्माच्या दुसऱ्या षटकात भारताला पहिली विकेट मिळता मिळता राहिली. प्रतिका रावलकडून सोपा झेल सुटला. यासह ३ षटकांत पाकिस्तानने १६ धावा केल्या आहेत.

20:03 (IST) 5 Sep 2026

India vs Pakistan Live: सामन्याला सुरूवात

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज लढतीला सुरूवात झाली आहे. भारताकडून क्रांती गौडने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. तर पाकिस्तानकडून मुनीबा अली व शवाल जुल्फिकार सलामीला उतरले आहेत.

19:34 (IST) 5 Sep 2026

India Playing 11: भारताची पाकिस्तानविरूद्ध सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हन

स्मृती मानधना, शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, नंदनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड

19:34 (IST) 5 Sep 2026

IND vs PAK: पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन

मुनीबा अली (यष्टीरक्षक), शवाल जुल्फिकार, गुल फिरोजा, आयेशा जफर, सदफ शमास, फातिमा सना (कर्णधार), उम्म-ए-हानी, आयमान फातिमा, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल

19:31 (IST) 5 Sep 2026

INDW vs PAKW Toss: नाणेफेक

भारत आणि पाकिस्तान महिलांच्या आशिया चषक सामन्याची नाणेफेक पाकिस्तान संघाने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह टीम इंडिया गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.

19:25 (IST) 5 Sep 2026

Pakistan Squad: आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ

मुनीबा अली (यष्टीरक्षक), शावाल झुल्फिकार, गुल फिरोजा, आयशा जफर, सदफ शमास, फातिमा सना (कर्णधार), उम्म-ए-हानी, ईमान फातिमा, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल, सायरा जबीन, मोमिना रियासत, इमान नसीर, वहीदा अख्तर.

19:24 (IST) 5 Sep 2026

Team India: आशिया चषकासाठी भारतीय संघ

स्मृती मानधना, शफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, नंदनी शर्मा, श्री चरणी, क्रांती गौड, जी कमलिनी, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी, राधा यादव.

19:12 (IST) 5 Sep 2026

India vs Pakistan Live: भारत-पाकिस्तान सामना नाणेफेक

महिला टी-२० आशिया चषक २०२६ मध्ये आज भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल; सामना रात्री ८:०० वाजता सुरू होईल आणि नाणेफेक रात्री ७:३० वाजता होईल.

19:10 (IST) 5 Sep 2026

IND vs PAK Live: टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ सध्या उत्कृष्ट लयीत आहे. गट-फेरीतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांत एकतर्फी विजय मिळवून भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या महिला संघानेही आपल्या पहिल्या सामन्यात थायलंडचा ३५ धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली होती, त्यानंतर हाँगकाँग चीन संघाचा १३७ धावांनी विजय साकारला.

IND-W vs PAK-W Womens Asia Cup 2026 Live Updates: महिला आशिया चषक २०२६ मधील भारत-पाकिस्तान सामना आज दुबईत खेळवला जात आहे.