दुबई : सलामीच्या लढतीतील पराभवानंतर दमदार पुनरागमनास उत्सुक असलेल्या भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान असेल. पहिल्या साखळी लढतींतील निकालांनंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीत चुरस निर्माण झाली असून भारतीत संघासाठी उर्वरित लढतींत विजय मिळवणे महत्त्वाचे झाले आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला शुक्रवारी सलामीच्या लढतीत न्यूझीलंडकडून ५८ धावांनी हार पत्करावी लागली. या मोठ्या पराभवामुळे भारताची निव्वळ धावगती -२.९९ अशी झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित साखळी सामने जिंकण्यासह भारताला निव्वळ धावगतीत सुधारणा करण्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Pakistan Surpassed India And Holds Record of Most ODI Wins by Asian Team in Australia After AUS vs PAK match
पाकिस्तानने मोडला भारताचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या विजयासह अशी कामगिरी करणारा पहिला ठरला आशियाई संघ
Mohammed Rizwan Takes DRS After Consulting With Adam Zampa and Loses Review Watch Video AUS vs PAK 2nd ODI
PAK vs AUS: हा काय प्रकार? मोहम्मद रिझवानने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू अन् सापडला अडचणीत; पाहा VIDEO
Pakistan Beats Australia by 9 Wickets in Marathi
Pakistan Beat Australia by 9 Wickets: पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलिया चारी मुंड्या चीत! वर्ल्ड चॅम्पियन संघाविरूद्ध पाकिस्तानने नोंदवला वनडेमधील सर्वात मोठा विजय

न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांत भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. फलंदाजांच्या हाराकिरीचा भारताला मोठा फटका बसला. भारताची एकही फलंदाज २० धावांचा टप्पाही ओलांडू शकली नाही.

हेही वाचा >>> युवा खेळाडूंच्या कौशल्याचा कस; भारत-बांगलादेश पहिली ट्वेन्टी२० लढत आज

तसेच भारताला संघनिवडीचा पेचही सोडवावा लागेल. सलामीच्या लढतीत वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीला संधी देताना भारताने एक अतिरिक्त फलंदाज खेळवणे टाळले. त्यामुळे फलंदाजी क्रमातही मोठा बदल करावा लागला. आता भारतीय संघ दयालन हेमलताला संधी देण्याबाबत विचार करू शकेल.

हरमनप्रीतला या वर्षी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळलेल्या १६ डावांत केवळ एक अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे ती कामगिरी उंचावण्यात यशस्वी ठरते का, याकडेही चाहत्यांचे लक्ष असेल.

गोलंदाजांची अनुभवी फळी

पाकिस्तानची फलंदाजी तितकीशी मजबूत नसली, तरी त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाज आहेत. निदा दार, कर्णधार फातिमा सना आणि सादिया इक्बाल यांसारख्या गोलंदाज प्रभावी मारा करण्यात सक्षम आहेत. सलामीच्या लढतीत पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय साकारला होता.

● वेळ : दुपारी ३.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अॅप