IND vs SA 2nd ODI : कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज; ‘अशी’ असू शकते दोन्ही संघांची Playing 11

दक्षिण आफ्रिकेचा संघ वनडे मालिकेत १-०ने आघाडीवर आहे.

India vs South Africa 2nd ODI match preview and Playing 11
टीम इंडिया

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या शुक्रवारी (२१ जानेवारी) होणार आहे. पार्लच्या मैदानावर दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघावर दबाव असेल. पहिला सामना गमावल्यामुळे टीम इंडियाला मालिकेत आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मालिकेत आघाडीचा फायदा होणार आहे. त्यांचे फलंदाज आणि गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

गेल्या सामन्यात भारतीय संघाची मधली फळी अपयशी ठरली. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात सुधारणा करण्याची गरज आहे. याशिवाय गोलंदाजांचीही कामगिरी सरासरी राहिली. मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेणे खूप महत्त्वाचे असेल. गेल्या सामन्यातील या दोन चुकांमुळे टीम इंडियाला ३१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. यावेळी टीम इंडियाला सुधारावे लागेल. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा कसोटी मालिकेपासूनच लयीत आहे. त्याच्याशिवाय रूसी व्हॅन डर डुसेन आणि क्विंटन डी कॉक यांनीही चांगली फलंदाजी केली. त्यामुळे यावेळीही त्यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा केली जाऊ शकते.

हेही वाचा – Legends League Cricket : टीम इंडियाला मोठा धक्का; कॅप्टन वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन सामन्यातून OUT!

दोन्ही संघांची संभाव्य Playing 11

दक्षिण आफ्रिका – टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जानेमन मलान, रुसी व्हॅन डर डुसेन, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, अँडिले फेलुक्वायो, मार्को जानसेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, लुंगी एनगिडी.

भारत – केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, यजुर्वेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर हा सामना पाहता येईल.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India vs south africa 2nd odi match preview and playing 11 adn

Next Story
Legends League Cricket : टीम इंडियाला मोठा धक्का; कॅप्टन वीरेंद्र सेहवाग पहिल्या दोन सामन्यातून OUT!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी