India vs South Africa 2nd Test, Day 2 Live Score: भारत दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना गुवाहाटीत सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव ४८९ धावांवर आटोपला. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाअखेर ९ धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका ऑलआऊट! मुथूसॅमीचं शतक,यान्सनचं दमदार अर्धशतक

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४८९ धावांवर आटोपला आहे.

विकेट मिळाली! सिराजच्या बाउन्सरवर मुथूसॅमी बाद, भारतीय संघाला दिलासा

भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. मुथूसॅमी १०९ धावा करून माघारी परतला आहे.

सेनुरन मुथूसॅमीचं दमदार शतक! लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेने किती धावा केल्या?

लंचपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ७ गडी बाद ४१८ धावा केल्या आहेत. मुथूसॅमी शतकी खेळी करून नाबाद आहे.

सेनुरन मुथूसॅमीचं दमदार शतक! दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत

सेनुरन मुथूसॅमीने १९२ चेंडूंचा सामना करत दमदार शतक झळकावलं आहे. दक्षिण आफ्रिका सध्या मजबूत स्थितीत आहे.

मुथूसॅमीला बाद करण्याची संधी थोडक्यात हुकली! दक्षिण आफ्रिकेच्या ४०० धावा पूर्ण

मुथूसॅमी या डावात भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे. तो ८५ धावांवर असताना झेलबाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण बुमराहच्या गोलंदाजीवर सिराजकडून झेल घेण्याची संधी हुकली. दक्षिण आफ्रिकेने ४०० धावा पूर्ण केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या ३५० धावा पूर्ण!

दक्षिण आफ्रिकेच्या ३५० धावा पूर्ण झाल्या आहेत.

गोलंदाज विकेट्ससाठी ‘तरसले’! दक्षिण आफ्रिकेने टी ब्रेक पर्यंत किती धावा केल्या?

दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेने ६ गडी बाद ३१६ धावा केल्या आहेत. मुथुसामी ५६ धावांवर नाबाद आहे. तर वेरेन ३८ धावांवर नाबाद आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या ३०० धावा पूर्ण! भारतीय गोलंदाज विकेट्स घेण्याच्या प्रयत्नात

दक्षिण आफ्रिकेने या डावात ३०० धावांचा पल्ला गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून मुथुसामी ४७ धावांवर नाबाद आहे. तर वेरेन ३२ धावांवर नाबाद आहे.