India vs South Africa 4th T20 Highlights: भारतीय संघाने जोहान्सबर्ग येथे शुक्रवारी झालेल्या चौथ्या टी२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विक्रमी १३५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने चार सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन (नाबाद १०९) आणि तिलक वर्मा (नाबाद १२०) यांच्या विक्रमी शतकी खेळीच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ १८.२ षटकांत केवळ १४८ धावाच करू शकला. भारताकडून अर्शदीपने ३, वरुण-अक्षरने २-२ विकेट घेतले.

२८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने ११ चेंडूंत दोन विकेट गमावल्या. रायन १ आणि रीझा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले. अर्शदीपने आपल्या दुसऱ्याच षटकात एडन मारक्रमला बाद केलं आणि हेनरिक क्लासेनला गोल्डन डकवर बाद केलं. डेव्हिड मिलर ३६ धावा करून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने ४३ धावा केल्या. सिमेलेन केवळ २, गेराल्ड १२ आणि केशव केवळ ६ धावा करू शकले. रमणदीपने लुथो सिपामाला बाद करून आफ्रिकेला सर्वबाद केले.

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघाने चौथ्या टी-२० सामन्यात २० षटकांत १ गडी गमावून २८३ धावा केल्या आहेत. भारताकडून संजू सॅमसनने १०९ आणि तिलक वर्माने १२० धावा केल्या. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २१० धावांची विक्रमी भागीदारी झाली. भारतीय डावात एकूण २३ षटकार मारले गेले. विदेशात ही भारताची सर्वात मोठी संख्या आहे.

Live Updates

IND vs SA 4th t20i: भारत वि दक्षिण आफ्रिका यांच्याचील चौथ्या टी-20 सामन्याचे हायलाईट्स

00:35 (IST) 16 Nov 2024
भारताचा १३५ धावांनी मोठा विजय

भारताने दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांनी पराभव करत चार सामन्यांची टी-२० मालिका ३-१ अशी जिंकली. भारताने दिलेल्या २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १८.२ षटकांत केवळ १४८ धावाच करू शकला. रमणदीपने सिपामाला बाद करून आफ्रिकेला ऑल आऊट केलं.

00:27 (IST) 16 Nov 2024

अक्षऱ पटेलची फिरकी

वेगवान गोलंदाजांनंतर अक्षर पटेलने २ विकेट्स घेत आफ्रिकेची जान्सेन आणि कोएत्झीची भागीदारी तोडली.

00:06 (IST) 16 Nov 2024
स्टब्स-मिलर-सिमेलेन बाद

ट्रिस्टन स्टब्स, वरूण चक्रवर्ती, डेव्हिड मिलर, सिमेलेन यांना वरूण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांनी बाद केलं.

23:44 (IST) 15 Nov 2024

ट्रिस्टन स्टब्स आणि मिलरने उचलून धरला संघाचा डाव

१० षटकांनंतर आफ्रिकेने ४ बाद ७३ धावा केल्या आहेत. स्टब्स आणि मिलरच्या जोडीने संघाचा डाव उचलून धऱला आहे. झटपट गेलेल्या विकेटनंतर आफ्रिकेने डाव सावरला आहे.

23:28 (IST) 15 Nov 2024

७ षटकांनंतर आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्स गमवल्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड मिलरची जोडी मैदानावर आहे. ७ षटकांत आफ्रिकेने ४ बाद ४१ धावा केल्या आहेत.

23:00 (IST) 15 Nov 2024

डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर खेळताना दक्षिण आफ्रिकेने गमावल्या तीन विकेट्स

भारताने दिलेल्या प्रचंड अशा २८४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने तीन षटकात ३ विकेट्स गमावल्या आहेत. कर्णधार एडन मारक्रम, रायन रिकलटन आणि रीझा हेंड्रिक्स तंबूत परतले आहेत.

22:25 (IST) 15 Nov 2024

टीम इंडियाचा २८३ धावांचा डोंगर; संजू सॅमसन आणि तिलक वर्माची तडाखेबंद शतकं आणि भागीदारी

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी झळकावलेल्या तडाखेबंद शतकांच्या आणि भागीदारीच्या बळावर टीम इंडियाने २८३ धावांचा डोंगर उभारला. या दोघांनी शतकं झळकवतानाच दुसऱ्या विकेटसाठी ८६ चेंडूत नाबाद २१० धावांची अविश्वसनीय भागीदारी केली.

22:12 (IST) 15 Nov 2024

तिलक वर्माचं सलग दुसरं शतक

तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या तिलक वर्माने सलग दुसऱ्या सामन्यात झंझावाती शतकी खेळी साकारली. तिलकने अवघ्या ४१ चेंडूत शतकाला गवसणी घातली.

22:08 (IST) 15 Nov 2024

संजू सॅमसनचं शतक

दोन डावात भोपळाही फोडताही न आलेल्या संजू सॅमसनने ५८ चेंडूतच शतक पूर्ण केलं. गेल्या पाच डावात संजूचं हे तिसरं शतक आहे.

22:06 (IST) 15 Nov 2024

तिलक वर्माला जीवदान

तडाखेबंद खेळी करणाऱ्या तिलक वर्माला ९५ धावांवर जीवदान मिळालं. मार्को यान्सनने त्याचा सोप झेल सोडला.

21:58 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: १५ षटकांत २०० धावा

कोएत्झीच्या १५व्या षटकात तिलक वर्मा आणि संजू दोघेही बाद बाद होता वाचले. यासह भारताने १५ षटकांत २०० धावा केल्या. १५ षटकं पूर्ण होईपर्यंत भारताने १ बाद २१९ धावा केल्या आहेत. यासह संजू आणि तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १५० धावांची सर्वात मोठी भागीदारी रचली आहे.

21:46 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: तिलक वर्मा

तिलक वर्माने अवघ्या २२ चेंडूत ५ षटकार आणि ४ चौकारांसह दणदणीत अर्धशतक झळकावले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलक वर्माने जबरदस्त फटकेबाजीचे प्रदर्शन केले आहे. संजू आणि तिलकने मिळून १४ षटकांत षटकारांचा पाऊस पाडत २०० धावा केल्या आहेत.

21:37 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: १० षटकांनंतर भारताची धावसंख्या

भारताने १० षटकांत १ बाद १२९ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये १० षटकांनंतर भारताची ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे.

21:24 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: संजू सॅमसनचे अर्धशतक

संजू सॅमसनने दोन डक नंतर आता चौथ्या टी-20 सामन्यात दणदणीत षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. सॅमसनने २८ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावा केल्या.

21:08 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: पॉवरप्ले

पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर अभिषेक शर्मा झेलबाद झाला आहे. अभिषेकच्या बॅटची कड घेत चेंडू क्लासेनच्या हातात गेला. यासह अभिषेक शर्मा १८ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारत बाद झाला. यासह भारताने पॉवरप्लेमध्ये १ बाद ७३ धावा केल्या.

21:01 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: ५व्या षटकात कुटल्या २४ धावा

अभिषेक शर्माने सिमेलेनच्या पाचव्या षटकात २४ धावा केल्या. ज्यात २ वाईड बॉलचा समावेश आहे. ३ षटकार आणि एका चौकारासह भारताची धावसंख्या ५ षटकांत बिनबाद ६८ वर पोहोचली आहे.

20:58 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: अभिषेक शर्मा-संजूची तुफान फटकेबाजी

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने तुफान फटकेबाजी करत आहेत. चार षटकांत संजू आणि अभिषेकने मिळून ४४ धावा केल्या आहेत. तर ५व्या षटकात अभिषेकने पहिल्या चेंडूवर षटकार खेचताच भारताने ५० धावा पूर्ण केल्यात.

20:50 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनला जीवदान मिळाल्यानंतर दोघांनी चांगली फटकेबाजी केली. पहिल्या षटकात ४ धावा केल्यानंतर ३ षटकांमध्ये भारताने ३० धावा केल्या आहेत. संजू १४ धावा तर अभिषेक ९ धावांवर खेळत आहे.

20:39 (IST) 15 Nov 2024
IND vs SA: पहिले षटक

पहिले षटक मार्काे यान्सेन टाकत होता. पहिल्याच षटकात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा दोघेही बाद होता होता वाचले. संजू सॅमसनने तिसऱ्या चेंडूवर फटका मारला पण स्लिपमध्ये झेलबाद होता होता तो वाचला. तर चौथ्या चेंडूवर रिझा हेंड्रिक्सने अभिषेक शर्माचा झेल सोडला.

20:33 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत-आफ्रिका सामन्याला सुरूवात

भारत दक्षिण आफ्रिका चौथ्या टी-20 सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत असून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची जोडी मैदानावर आहे. तर मार्काे यान्सेन गोलंदाजी करत आहे.

20:29 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघ मैदानात

मालिरकेतील अखेरच्या टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरले आहेत. तीन सामन्यांनंतर चौथा टी-२० सामना निर्णायक ठरणार आहे.

20:05 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):

रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, अँडीले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला

20:05 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत (प्लेइंग इलेव्हन):

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती

20:05 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):

रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, अँडीले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामला

20:02 (IST) 15 Nov 2024
IND vs SA Pitch Report:नाणेफेक

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अनेकदा विजय मिळवला आहे. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही.

19:35 (IST) 15 Nov 2024

IND vs SA Pitch Report: धावांचा पडणार पाऊस

जोहान्सबर्गची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असल्याने या मैदानावर मोठ्या प्रमाणावर धावा होण्याची शक्यता आहे. भारताने या मालिकेत दोन्ही वेळा प्रथम फलंदाजी करत सामना जिंकला आहे. अशा स्थितीत चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यास संघ मोठा धावा करू शकतो

19:04 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड

भारत आणि दक्षिण आफ्रिका आतापर्यंत २९ टी-२० सामने एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. भारत १६ विजयांसह आघाडीवर आहे, तर दक्षिण आफ्रिकेने १२ विजय मिळवले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

18:57 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: अर्शदीप सिंग

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ५९ टी-२० सामन्यात ९२ विकेट घेतले आहेत. त्याला या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनण्याची संधी आहे. या सामन्यात अर्शदीप पाच विकेट घेण्यात यशस्वी ठरला तर तो युझवेंद्र चहलचा (९६ विकेट) सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मागे टाकेल.

18:43 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: कर्णधार सूर्यकुमार यादव

भारतीय संघाला सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाची चांगली संधी आहे. रोहित शर्माच्या टी-२० मधील निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर दिली आहे. भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे.

18:37 (IST) 15 Nov 2024

IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांची टी-२० मालिका आफ्रिकेत खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले ३ सामने झाले असून त्यातील दोन सामने भारताने तर आफ्रिकेने १ सामना जिंकला आहे. टीम इंडियाला ही मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. भारत सध्या २-१ ने आघाडीवर आहे आणि किमान मालिका गमावण्याच्या स्थितीत नाही. यजमान मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतील

India vs South Africa 4th T20I Highlights in Marathi: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या टी-२० सामन्यात १३५ धावांनी पराभव करत मालिका आपल्या नावे केली आहे.

Story img Loader