India vs South Africa 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूरच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३५९ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. भारती संघाकडून पहिल्या डावात विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी दमदार शतकी खेळी केली. पण ही खेळी व्यर्थ गेली आहे. भारतीय संघाला या सामन्यात ४ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मारक्रमने दमदार शतकी खेळी केली.यासह दक्षिण आफ्रिकेने ३ वनडे सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
IND vs SA Live: कोण मारणार बाजी? दक्षिण आफ्रिकेला १२ चेंडूत इतक्या धावांची गरज
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२ चेंडूत ८ धावांची गरज आहे.
IND vs SA Live: दक्षिण आफ्रिकेची सामन्यावर मजबूत पकड! विजयासाठी २४ चेंडूत इतक्या धावांची गरज
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २४ चेंडूत १८ धावांची गरज आहे.
IND vs SA Live: कोण मारणार बाजी? दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूत इतक्या धावांची गरज
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूत २७ धावांची गरज आहे.
IND vs SA Live: दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का! विजयासाठी ३३ चेंडूत इतक्या धावांची गरज
मार्को यान्सेन बाद होऊन माघारी परतला आहे. दक्षिण आफ्रिकेला ३३ चेंडूत ३७ धावांची गरज आहे.
IND vs SA Live:यशस्वी जैस्वालचा भन्नाट कॅच! डेवाल्ड ब्रेव्हिस परतला माघारी
अखेर यशस्वी जैस्वालने भन्नाट झेल घेऊन डेवाल्ड ब्रेव्हिसला ५४ धावांवर माघारी धाडलं आहे.
IND vs SA: टीम इंडियाचं दमदार पुनरागमन! हर्षित राणाच्या गोलंदाजीवर एडेन मारक्रम परतला माघारी
दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला आहे. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर एडेन मारक्रम बाद होऊन माघारी परतला आहे.
एडेन मारक्रमचं शतक
धावांचा पाठलाग करताना एडेन मारक्रमने ८८ चेंडूंचा सामना करत दमदार शतकी खेळी केली आहे.
IND vs SA Live: अखेर विकेट मिळाली! प्रसिधचा वेगवान बाऊन्सर अन् तेंबा बावूमा परतला माघारी
धावांचा पाठलाग करताना तेंबा बावूमा आणि एडन मारक्रम यांनी शतकी भागीदारी केली. पण प्रसिध कृष्णाने ही भागीदारी मोडून काढली आहे.
IND vs SA Live: दक्षिण आफ्रिकेला पहिला मोठा धक्का! क्विंटन डी कॉक परतला माघारी
दक्षिण आफ्रिकेला पहिला मोठा धक्का बसला आहे. क्विंटन डी कॉक अवघ्या ८ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs SA Live: भारताचा निम्मा संघ तंबूत! विराटनंतर वॉशिंग्टन सुंदर परतला माघारी
भारताचा निम्मा संघ माघारी परतला आहे. विराट कोहली बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर देखील धावबाद होऊन माघारी परतला आहे.
विराटने झळकावलं वनडेतील लागोपाठ दुसरं शतक
विराटने ९० चेंडूंचा सामना करत दमदार शतकी खेळी केली
iND vs SA: ऋतुराज गायकवाडचं दमदार अर्धशतक! विराटसोबत मिळून सावरला डाव
ऋतुराज गायकवाडने ५२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराट कोहलीनेही लागोपाठ दुसरं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
IND vs SA Live: भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण
भारतीय संघाने १६ व्या षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे. ऋतुराज गायकवाड ३० तर विराट कोहली २१ धावांवर नाबाद आहे.
IND vs SA Live: चांगली सुरूवात मिळाली, पण नको तो फटका मारून यशस्वी परतला माघारी
भारतीय संघाला दुसरा मोठा धक्का बसला आहे. यशस्वी जैस्वाल २२ धावा करून माघारी परतला आहे.
Ind vs Sa live: टीम इंडियाला पहिला मोठा धक्का! रोहित शर्मा स्वस्तात परतला माघारी
गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा रोहित शर्मा या सामन्यात १४ धावा करून माघारी परतला आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
दक्षिण आफ्रिका (Playing XI): क्विंटन डी कॉक(यष्टिरक्षक), एडन मार्करम, टेंबा बावुमा(कर्णधार), मॅथ्यू ब्रीत्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी
भारत (Playing XI): यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल(यष्टिरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा
